Advertisement

बॉलीवूड

कार्तिक- क्रितीच्या ‘लिव्ह ईन रिलेशन’वर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप

Leenal GawadeLeenal Gawade  |  Feb 27, 2019
कार्तिक- क्रितीच्या ‘लिव्ह ईन रिलेशन’वर सेन्सॉर  बोर्डाचा आक्षेप

बी टाऊनमध्ये अफेअर्सच्या चर्चा कायम रंगत असतात. पण कार्तिक आणि क्रितीच्या नात्यामध्ये चक्क सेन्सॉर बोर्डाने हस्तक्षेप केला आहे. त्यांचे लिव्ह-इन-रिलेशनशीप सेन्सॉर बोर्डाला खटकले आहे. आता यात सेन्सॉर बोर्डाचा काय संबंध असे म्हणत असाल तर आम्ही त्यांच्या रिअललाईफ नात्याबद्दल काहीच सांगत नाही आहोत तर रिल लाईफ नात्याविषयी सांगत आहोत. कारण कार्तिक आणि क्रितीचा ‘लुका छुपी’ हा चित्रपट १ मार्चला रिलीज होणार आहे. पण रिलीज आधी चित्रपटात दाखवण्यात आलेल्या लिव्ह- इन- रिलेशनशीपवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह सीन्सना कात्री लावण्यात आली आहे.

#Surgicaclstrike2 – अवघ्या बॉलीवूडनं केलं वायुदलाचं कौतुक

kirti-kartik

 लिव्ह-इन रिलेशनशीपचा समाजावर विपरित परिणाम

२१ व्या शतकात आपण राहात असलो. सेक्शुअली किंवा नात्यांविषयी कितीही उघड बोलत असलो तर काही गोष्टींचे विपरित परिणाम समाजावर होत असतात. चित्रपटाच्या माध्यमातून चुकीचा संदेश जाऊ नये. म्हणून चित्रपटात बदल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटातील ४ आक्षेपार्ह सीन काढून टाकण्यात आले आहे. यात ३ ऑडिओ आणि एका विज्युअल सीनमध्ये बदल करण्यात आला आहे. कट नंतर चित्रपट १२६ मिनिटे ६ सेंकद इतका झाला आहे. त्यामुळे आता चित्रपट २ तास ६ मिनिटे ६ सेंकद इतका झाला आहे. शिवाय या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र मिळाले आहे.

श्रीदेवीचा ‘मॉम’ चीनमध्ये होणार रिलीज

kartik kriti 2

 कोका-कोला गाण्याची क्रेझ

लुका छुपी या चित्रपटातील एका गाण्याची सगळीकडे क्रेझ पाहायला मिळत आहे ते गाणं म्हणजे  ‘कोका-कोला’. पण हे गाणे नवीन नाही. तर टोनी कक्करने गायलेल्या या गाण्याचा एक व्हिडिओ या आधीच तयार करण्यात आला आहे. त्या गाण्याची लोकप्रियता पाहता या चित्रपटात हे गाणे घेण्यात आले आहे. कार्तिक आणि क्रितीवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. या शिवाय या चित्रपटातील आणखी काही गाणीही रिलीज करण्यात आली असून ती देखील सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे.

अंबानी वेडिंग- जेव्हा सून धरते सासू-सासऱ्यांसोबत ठेका

‘सोनचिडियाला’ आणि ‘लुका छुपी’ आमने सामने

१ मार्चला रिलीज होणारा ‘लुका छुपी’ हा एकमेव चित्रपट नाही तर त्याला स्पर्धा देण्यासाठी ‘सोनचिडिया’हा चित्रपट सुद्धा आहे. दोन वेगवेगळ्या विषयांचे हे चित्रपट आहेत. चंबल घाटातील डाकूंवर आधारीत हा चित्रपट असून अभिषेक चौबे यांनी दिग्दर्शनाचे काम केले आहे. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत, भूमी पेडणेकर,मनोज वाजपेयी आणि रणवीर शौरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता लोक कोणत्या चित्रपटाला पसंती देतात. ते येणारा वीकेंडच सांगेल. लुका छुपी या सिनेमाआधी कार्तिक आर्यन ‘सोनू टिटू की स्वीटी’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने १०० कोटींवर गल्ला जमवला होता. त्यामुळे आता लुका छुपीकडून निर्मात्याला बॉक्स ऑफिसवर कोटीचा गल्ला जमेल अशी आशा आहे.

 

साराला आवडतो कार्तिक

सैफ आली खानची मुलगी सारा अली खान हिने प्रसारमाध्यमांना दिलेल्या अनेक मुलाखतीत कार्तिक आवडतो असा उल्लेख केला आहे. शिवाय त्याच्यासोबत डेटवर जायला आवडेल असे देखील सांगितले आहे. स्टार किड असूनही आपल्या विचारांना मोकळी वाट देणाऱ्या साराचे त्यावेळी सगळ्यांनी कौतुक केले. ज्यावेळी कार्तिकला या संदर्भात विचारणा केली तेव्हा तो ही साराच्या या स्पष्ट बोलण्यावर लाजला होता. पण कार्तिक आर्यन चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेला डेट करत असल्याच्या चर्चा सध्या आहेत.

(सौजन्य- Instagram,Youtube)