ADVERTISEMENT
home / Uncategorized
चार वर्षांनंतर ‘पठाण’मधून परत येण्यासाठी शाहरूखने घेतली  मेहनत, ट्रेनरने केला खुलासा

चार वर्षांनंतर ‘पठाण’मधून परत येण्यासाठी शाहरूखने घेतली मेहनत, ट्रेनरने केला खुलासा

शाहरूख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी तो पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. 2018 मधील झिरोच्या अपयशानंतर तो पुन्हा चित्रपटात दिसला नव्हता. शाहरूखने पठाणमधील त्याचा लुक जाहीर केला तेव्हा चाहते त्याला पाहून थक्कच झाले. कारण शाहरूखचे सिक्स पॅक अॅब्स चाहत्याना नक्कीच आश्चर्यचकित करणार आहेत. पण हा फिटनेस मिळवण्यासाठी शाहरूख गेले दोन वर्षे प्रचंड मेहनत घेतली आहे. शाहरूखच्या फिटनेस ट्रेनरने शाहरूखची ही ट्रान्सफॉर्मेशन जर्नी शेअर केली आहे.

दोन दशकांपासून आहेत दोघं एकत्र

शाहरूखचा फिटनेस ट्रेनर सुभाष सावंतने त्याची ही ट्रान्सफॉर्मेशन जर्नी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शाहरूख हा नेहमीच फिट अभिनेता म्हणून चाहत्यांसमोर आला आहे. पण गेल्या चार वर्षात तो चित्रपटसृष्टीपासून काहीसा दूरावला होता. पण आता शाहरूखने पुन्हा हा फिटनेस मिळण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. सुभाष सावंत शाहरूखसोबत गेली चोवीस वर्षे एकत्र काम करत आहेत. ते शाहरूखचे फिटनेस ट्रेनर असून गेली चार वर्षे ते फक्त पठाणमधील लुकसाठी शाहरूखला ट्रेनिंग देत आहेत. कोविडच्या काळात थोडा व्यत्यय आला. पण शाहरूखने जिद्दीने मेहनत घेत स्वतःमध्ये बदल केले असं त्याचं म्हणणं आहे. सुभाष सावंत यांच्या मते शाहरूखने या लुकसाठी शाहरूखने हेव्ही लिफ्टिंग केलं आहे. सर्किट ट्रेनिंग आणि कार्डिओ वर्कआऊट केलं आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंगने त्याने स्वतःसा फिट केलं आहे. स्क्रीनवर पठाणमध्ये शाहरूखचा जो फिटनेस दिसणार आहे त्यासाठी जवळजवळ दोन वर्ष कठीण मेहनत घेतली आहे. 

फिटनेस आयकॉन किंग खान

सुभाष सावंत यांच्या मते शाहरूख नुसताच किंग खान नसून फिटनेस आयकॉनही आहे. कारण पठाणमधील या नव्या लुकसाठी त्याने प्रचंड मेहनत आणि डाएट केलं आहे. वयाच्या 56 वर्षी शाहरूखने घेतलेली ही मेहनत नवोदित कलाकारांना लाजवेल अशीच आहे. त्यामुळे त्याला फिटनेस आयकॉन म्हणण्यास काहीच हरकत नाही. शाहरूखने जेव्हा मार्चमध्ये त्याचा लुक जाहीर केला होता तेव्हा त्याने कॅप्शन मध्ये लिहीलं होतं की, “शाहरूख जरा जरी थांबला तर पठाणला कसं थांबवाल, एप्स आणि एब्स सर्व काही करणार”

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
21 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT