ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
शाहरूख खानने मेडिकल स्टाफच्या सुरक्षेसाठी 25 हजार पीपीई किट्सची केली मदत

शाहरूख खानने मेडिकल स्टाफच्या सुरक्षेसाठी 25 हजार पीपीई किट्सची केली मदत

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. कोरोना व्हायरसच्या कहरापासून वाचवण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, मेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी आणि पोलीस प्रशासन सर्वांनीच अगदी रात्रीचा दिवस केला आहे. अगदी प्रत्येक जण त्यांच्यासाठी काही ना काही मदत करतच आहे. देशातील नागरिक तसेच अगदी बॉलीवूडमधील अनेक कलाकारही यासाठी स्वतःहून मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. आता कोरोना वॉरियर्सच्या  मदतीसाठी शाहरूख खाननेही आपल्याकडून जमेल तितकी मदत कधीच चालू केली आहे. यापूर्वी क्वारंटाईन सेंटरसाठी आपले ऑफिस बीएमसीला शाहरूखने दिले असून अन्य लोकांना पैशाची मदत तर त्याने केली आहेच. पण आता पुन्हा एकदा शाहरूख खानने महाराष्ट्रासाठी फ्रंटलाईनला काम करणाऱ्या मेडिकल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 25 हजार पीपीई किट्स (Personal Protetive Equipment) दिले आहेत. याची माहिती खुद्द महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली असून हेल्थकेअर कर्मचाऱ्यांसाठी ही खूप मोठी मदत असल्याचेही म्हटले आहे. 

शाहरूखचा मेडिकल कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हात

शाहरूख खान हा केवळ पडद्यावर मनोरंजन करत नाही तर सध्याच्या घडीला आपल्या कंपनी आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्स, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि रेड चिलीज वीएफएक्स आणि एनजीओ मीर फाऊंडेशनद्वारे कोरोना व्हायरसच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबईतील क्वारंटाईन व्यक्तींसाठी त्याने आपले चार मजली ऑफिसही बीएमसीला दिला. आता वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठीही मदतीचा हात शाहरूखने पुढे केला आहे. 25 हजार पीपीई किट्स देऊन शाहरूखने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांचं  मन जिंकून घेतलं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याबाबत शाहरूख स्वतः कोणताही उल्लेख करत नाही. तर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या ट्विटमधून ही माहिती मिळाली आहे. 

लॉकडाऊनमध्ये चित्रिकरण करत असल्याचा सोनाक्षी सिन्हावर आरोप, दिले सडेतोड उत्तर

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मानले शाहरूखचे आभार

शाहरूखच्या या मदतीची प्रशंसा करून महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत त्याचे आभार मानले आहेत. राजेश टोपे यांनी लिहिले, ‘शाहरूख, तुझे खूप खूप आभार, तुम्ही 25 हजार पीपीई किट्सचे योगदान दिल्याबद्दल आभार. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी याची आम्हाला अगदी बराच काळ मदत होईल आणि फ्रंटलाईनवर आघाडी घेतलेल्या आपल्या वैद्यकीय सुरक्षा रक्षकांची सुरक्षा होईल.’ 

ADVERTISEMENT

या कारणामुळे रखडला ‘मिर्झापूर 2’ सिझन

शाहरूखनेही दिला ट्विटला रिप्लाय

यावर शाहरूख खाननेही राजेश टोपे यांना रिप्लाय दिला आहे. शाहरूखने ट्विटला रिप्लाय देत म्हटले, ‘हे किट्स मागविण्यासाठी आपण मला जी काही मदत केलीत त्यासाठी मी आपला आभारी आहे सर. या प्रयत्नात आपण सर्वच स्वतःला आणि मानवतेला वाचवण्यसाठी नक्कीच एकत्र आहोत. सेवेची संधी मिळाली त्याबद्दल भरून पावलो आहे.  आपले कुटुंब आणि टीम सगळेच सुरक्षित आणि निरोगी राहो.’ शाहरूख खानने अडीअडचणीत नेहमीच महाराष्ट्राची मदत केली आहे. त्याचबरोबर बॉलीवूडमधील अनेक कलाकार सध्या मदतीसाठी स्वतःहून पुढे येत आहेत. सलमान खान, आमीर खान, कार्तिक आर्यन, कपिल शर्मा, अर्जुन कपूर, वरूण धवन, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, कतरिना कैफ, विकी कौशल, करण जोहर अशा बऱ्याच जणांनी कोरोना व्हायरसग्रस्त लोकांसाठी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

लॉकडाऊनमध्ये ‘यामिनी’ परत येतेय, मौनी रॉयचा पुन्हा एकदा ‘नागिन’अंदाज

14 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT