आर माधवन सध्या त्याच्या ‘रॉकेट्री:: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. माधवनला या चित्रपटासाठी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्टँडिंग ओव्हेशन मिळाले आहे. शाहरुख खानही ‘रॉकेट्री’ मध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. शाहरुखला या चित्रपटात काम करण्याची अगदी मनापासून इच्छा होती. आणि तो बॅकग्राउंडमध्येही अगदी लहानशी भूमिका करण्यासाठी देखील तयार होता. त्याला या चित्रपटाचा भाग होण्याची खूप इच्छा होती. म्हणून त्याने स्वतः माधवनला या चित्रपटातील भूमिकेसाठी विचारले होते आणि त्यासाठी त्याने कोणते शुल्कही घेतले नाही.
रॉकेट्री: द नंबी इफेक्ट लवकरच होणार रिलीज
रॉकेट्री: नंबी इफेक्ट हा विशेष चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आर माधवन सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान माधवनने सांगितले की, शाहरुखला या चित्रपटाचा भाग व्हायचे होते. शाहरुखने माधवनला सांगितले होते की, तो बॅकग्राउंडमध्ये कोणतीही भूमिका साकारण्यास तयार आहे आणि विशेष म्हणजे शाहरुखने त्याच्या भूमिकेसाठी कोणतेही शुल्क आकारले नाही.आर माधवनने सांगितले की, “एका बर्थडे पार्टीदरम्यान शाहरुख खानने मला चित्रपटाची स्थिती विचारली आणि चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली की कोणतीही भूमिका करायला मी तयार आहे, पण मला या चित्रपटाचा भाग व्हायचे आहे.” त्यावेळी आर माधवनला वाटले की शाहरुख विनोद करत आहे. पत्नी सरिताच्या सांगण्यावरून त्याने शाहरुखच्या मॅनेजरला धन्यवाद देण्यासाठी मेसेज केला. त्यावर उत्तर आले की खान साहेब तारखा मागत आहेत. त्यामुळे तो या चित्रपटाचा एक भाग बनला.

इतकेच नव्हे तर या चित्रपटात कॅमिओ करणारा अभिनेता सूर्यानेही कोणतेही शुल्क घेतलेले नाही. माधवनने सांगितले की, दोन्ही कलाकारांनी त्यांच्या वेशभूषा आणि सहाय्यकांसाठी कोणतेही शुल्क आकारले नाही.’रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ हा शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट 1 जुलै रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलर रिलीज होताच नंबी नारायणन आले चर्चेत
आर माधवनच्या रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच रॉकेट वैज्ञानिक नंबी नारायणन चर्चेत आले आहेत. नंबी नारायणन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) शास्त्रज्ञ होते, ज्यांना देशाचा विश्वासघात केल्याच्या खोट्या आरोपाखाली गोवण्यात आले होते. 26 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आणि पोलिस-प्रशासनाशी लढा देऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. रॉकेट शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात पाठवले नसते तर आज भारतीय अवकाश मोहिमेची कहाणी वेगळी राहिली असती. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आपण इतर देशांच्या तुलनेत आपण अजूनही मागे आहोत. कारण अशाच चांगल्या व्यक्तींना विनाकारण त्रास दिला जातो. कधी कधी एका व्यक्तीवर अन्याय हा संपूर्ण देशाचा विश्वासघात असतो हे सत्य या चित्रपटात सांगितले आहे. शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची कथाही अशीच आहे. आर माधवन ही कथा रुपेरी पडद्यावर दाखवणार आहे, जो या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनातही पदार्पण करत आहे आणि मुख्य भूमिकेत आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अंतराळ विज्ञानावर भाष्य करणारा हा चित्रपट देशातील पहिलाच अस्सल चित्रपट आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. या चित्रपटात आर माधवन वैज्ञानिक नंबी नारायणन यांची भूमिका साकारत आहे. यामध्ये शाहरुख खानची खास भूमिका आहे, त्याची झलकही चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. लवकरच नंबी नारायणन यांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर आपल्याला बघायला मिळेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक