शम्मी कपूर हे नाव बॉलीवूडसाठी नवं नाही. आजही शम्मी कपूर यांचे अनेक चाहते आहेत. त्यांची संवादफेक आणि डान्सिंग स्टाईल तर सर्वांचीच आवडती आहे. आज शम्मी कपूर यांची 88 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने शम्मी कपूर यांच्या काही गोष्टींबद्दल आपण जाणून घ्यायला हवं. शम्मी कपूर हे पृथ्वीराज कपूर यांचे पुत्र. त्यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि आपल्या चार्मने सर्वांनाच आपलं केलं. शम्मी कपूरच्या अनेक महिला चाहत्या होत्या आणि आहेत. शम्मी कपूर हे असा एक अभिनेता होते ज्यांचा प्रत्येक चित्रपट मोठ्या पडद्यावर कमाल दाखवायचा आणि प्रत्येक चित्रपटाची गोल्डन ज्युबिली ही ठरलेलीच असायची.
शम्मी कपूरबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?
वास्तविक शम्मी कपूर यांचं खरं नाव होतं शमशेर राज कपूर. सुरुवातीला शम्मी हे पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये काम करत होते. त्याना यावेळी 50 रूपये मानधन मिळायचं. त्यानंतर त्यांनी चित्रपटांंमध्ये काम करणं सुरू केलं. शम्मी कपूर यांची शैली ही हॉलीवूड अभिनेत्यांशी मिळतीजुळती होती असं म्हटलं जायचं. शम्मी कपूर यांचं गीता बालीवर प्रेम होतं आणि त्यांनी त्यांच्याशी लग्नही केलं. पण गीता बाली यांना कांजण्या झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यांच्या मृत्यूनंतर शम्मी कपूर एकटे पडले होते. त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात मुमताज आली. गीता बाली नंतर मुमताज शम्मी कपूर यांना आवडू लागल्या होत्या. मुमताज या त्यांच्यापेक्षा जवळजवळ 20 वर्षांनी लहान होत्या. मुमताज यांचे शम्मी कपूर पहिले क्रश होते. ब्रम्हचारी यासारख्या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं. यावेळी हे दोघं एकमेकांच्या अधिक जवळ आले. शम्मी कपूर यांनी मुमताज यांच्याकडे लग्नाचा प्रस्तावदेखील ठेवला होता. पण या प्रस्तावासह त्यांनी एक अट घातली ज्यामुळे या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. मुमताज त्यावेळी केवळ 18 वर्षांच्या होत्या. मुमताज यांनी लग्न झाल्यानंतर केवळ घर सांभाळायचं आणि मुलांचा सांभाळ करायचा असं शम्मी कपूर यांचं म्हणणं होतं, जे मुमताज यांना पटलं नाही. त्यांना ही अट ऐकून धक्काच बसला होता. त्यांनी प्रेमाचा स्वीकार न करता करिअर निवडलं आणि दोघांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर शम्मी कपूर यांनी आपली चाहती नीला देवी यांच्याशी लग्न केलं.
हार्दिक पांड्याही अडकणार लग्नाच्या बेडीत, या अभिनेत्रीसोबत लग्नाच्या चर्चा
शम्मी कपूर कधीही विवादात नाही
शम्मी कपूर हे बऱ्याच जणांचे आवडते अभिनेता होते. आज त्यांची 88 वी जयंती आहे. शम्मी हे कधीही कोणत्याही विवादात पडले नाहीत. आपलं काम बरं आणि आपण बरं हा त्यांचा स्वभाव होता. शम्मी कपूर हे अप्रतिम अभिनेता होता. आजही अनेक कलाकार त्यांंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करताना दिसतात. इतकंच नाही तर त्यांनी आपला एक वेगळा ठसा बॉलीवूडमध्ये उमटवला. पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा अशी त्यांची ओळख न राहता त्यांनी स्वतःची एक अशी वेगळी ओळख निर्माण केली. इतकंच नाही शम्मी कपूर ज्या चित्रपटात काम करतील तो प्रत्येक चित्रपट हिट ठरणार असंच समीकरण होतं.
आता मराठी मालिकेमध्येही ‘इच्छाधारी नागीण’चा ड्रामा
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.