ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
शर्वरी वाघला बनायचं आहे माधुरी दीक्षित, घेतेय कथ्थकचे प्रशिक्षण

शर्वरी वाघला बनायचं आहे माधुरी दीक्षित, घेतेय कथ्थकचे प्रशिक्षण

यशराज फिल्मच्या ‘बंटी और बबली 2’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री शर्वरी वाघ लवकरच एका नव्या वेबसिरिजमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. अमेझॉन प्राईमच्या ‘दी फॉरगॉटन आर्मी’  या वेबसिरिजमधून आणि आमीर खानच्या मुलाच्या जुनैदच्या ‘महाराजा’ चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येण्यास ती सज्ज झाली आहे. मात्र बॉलीवूडमध्ये आपले पाय भक्कम रोवण्यासाठी तिला नक्कीच कठीण मेहनत घ्यावी लागणार आहे. शर्वरी बॉलीवूडमध्ये धक धक गर्ल माधुरी दीक्षितला आपला आदर्श मानते. त्यामुळे तिला माधुरी दीक्षितसारखं बनायचं आहे. विशेष म्हणजे तिला लवकरच एका भूमिकेत नृत्य सादरीकरण करायचं आहे. यासाठी शर्वरी सध्या कथ्थकचे धडे गिरवत आहे. नृत्य सादरीकरणाची भूमिका करायला मिळणं हे शर्वरीचं सर्वात मोठं स्वप्न होतं.

शर्वरी माधुरी दीक्षितची आहे खूप मोठी फॅन

शर्वरीच्या मते ती नेहमीच माधुरी दीक्षितच्या अभिनय, नृत्य आणि सौंदर्याने प्रभावित होते. तिच्यासाठी माधुरी तिची प्रेरणास्थान आहे. वास्तविक शर्वरीला नेहमीच कथ्थक नृत्य शिकायचं होतं. अनेक वर्षांपासून असलेली ही इच्छा तिला आता पूर्ण करता येत आहे. जेव्हा जेव्हा शर्वरी माधुरीचे इन्स्टाग्रामवरील गाणी अथवा एखादा डान्स शो बघत असे तेव्हा तेव्हा ती गूगलवर कथ्थक डान्स टिचर्ससाठी सर्च करत असे. माधुरी दीक्षित शर्वरीसाठी आदर्श आहे. एक ना एक दिवस तिला माधुरी दीक्षित सारखं व्हायचं आहे आणि माधुरीसोबत डान्स करण्याची संधी मिळवायची आहे. असं घडलं तर शर्वरीसाठी हा खूप मोठा सन्मान असेल.

शर्वरी आणि माधुरीमधील एकसमान दुवा

माधुरी दीक्षितप्रमाणेच शर्वरी वाघदेखील महाराष्ट्रीयन आहे. त्यामुळे तिला माधुरीप्रमाणे महाराष्ट्राची मुलगी अशी ओळख मिळवायला खूप आवडेल. शिवाय तिच्या मते एक कलाकार म्हणून तुम्हाला आयुष्यात कधी कोणती भूमिका साकारण्याची संधी मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही शक्य तितक्या कला साध्य करायलाच हव्या. यासाठी एखादा वेगळा नृत्यप्रकार शिकणं तुमच्या हातात नक्कीच आहे. कारण डान्स केल्यामुळे शरीराला एक ताल आणि लय प्राप्त होते. शर्वरीसाठी कथ्थक शिकणं म्हणजे माधुरी दीक्षितवरील प्रेम व्यक्त करण्यासारखं आहे. माधुरीसारखा सुंदर परफॉर्मन्स देण्यासाठी शर्वरीलाही योग्य पद्धतीने कथ्थकचे धडे गिरवायला हवेत. ही एक अशी गोष्ट आहे जी शर्वरीला माधुरी दीक्षितवर प्रभावित झाल्यामुळे शिकाविशी वाटत आहे.

22 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT