सर्वसामान्यपणे रियालिटी शोजच्या परीक्षकांची एक सौम्य बाजू आपल्याला नेहमी बघायला मिळते. पण सुपर डान्सरमध्ये शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty Kundra) एक अगदीच वेगळी आणि अनपेक्षित अशी बाजू दिसून आली. अनुराग बसूने त्याला ‘बदले की आग’ असं म्हटले आहे. सध्या सुपर डान्सरचा (Super Dancer 4) चौथा सीझन चालू आहे आणि याआधीच्या तीन सीझनमध्ये कोरिओग्राफर आणि गुरू वैभव घुगे (Vaibhav Ghuge) याने शिल्पाला लक्ष्य बनवून तिला सतत घाबरवले, सतावले आहे. शिल्पा शेट्टीला भूत आणि पिशाच्च अशा गोष्टींची भीती वाटते. तिला अशा प्रकारच्या अॅक्टचीही भीती वाटते. इतकंच नाही तर ती कधीही भयपटही पाहत नसल्याचे तिने सांगितले होते. पण त्यामुळे तिला सतत घाबरवण्यात येते. आता वेळ आली आहे ती शिल्पाने त्याची ‘सव्याज परतफेड’ करण्याची आणि वैभवची चाल त्याच्यावरच उलटवण्याची! या शनिवार आणि रविवारच्या भागात ही धमाल पाहायला मिळणार आहे.
अभिनेत्री मंदिरा बेदीने केले पतीवर अत्यंसंस्कार, सोशल मीडियावर हळहळ व्यक्त
शिल्पाने घेतला भूताचा अवतार
अलीकडेच सुपर डान्सर 4 चे चित्रीकरण सुरू असताना शिल्पाला एक नामी संधी मिळाली. तिने असा काही सापळा रचला की, त्यात अडकलेल्या वैभवसकट सर्व सुपर गुरूंनी तिला ‘साष्टांग दंडवत प्रणाम’ केला आहे.
शिल्पा म्हणाली, “सुपर डान्सरच्या सगळ्या सीझन्समध्ये प्रत्येक वेळी वैभवने मला त्रास दिला आहे, घाबरवले आहे. त्यामुळेच मी मनोमन याची परतफेड करण्याचे ठरवले होते. आम्ही दमणमध्ये या शो चे चित्रीकरण करत आहोत, यावेळी मला पलटवार करण्याची नामी संधी मिळाली आहे. मी अशा तयारीने निघाले, की दमणला एक दिवस आधी पोहोचता येईल. माझ्या टीमने माझ्या मेकअपचा खूप बारकाईने विचार केला होता, आणि मी स्वतःला आरशात पाहिले, तेव्हा तो मेकअप पाहून स्वतः मी देखील दचकले होते!” ती पुढे म्हणाली, “मी हे यापूर्वीही सांगितले आहे की, सुपर डान्सरचा संपूर्ण क्रू माझ्या कुटुंबासारखा आहे. त्यामुळे, अशावेळी मला खूप मजा येते.”
रणवीर सिंहच्या या लुकची सगळीकडे चर्चा, आता केलाय असा अवतार
मेकअपसाठी लागले 3 तास
संपूर्ण मेकअप करण्यासाठी शिल्पाला जवळजवळ 3 तास लागले. हॉटेलच्या मुख्य दारापाशी ती लपून बसली आणि दारातून आत येणार्या सगळ्या कोरिओग्राफर्सना तिने त्यांच्यावर झडप घालून घाबरवले. वैभवला शेवटी त्याच्या तोडीचा सव्वाशेर भेटला! यावर वैभव म्हणाला, “सुपर डान्सरशी निगडीत असलेल्या माझ्यासहित सगळ्यांसाठी शिल्पा शेट्टी या एक प्रेरणा आहेत. मी त्यांना इतक्या वेळा घाबरवले आणि त्यांच्या खोड्या काढल्या, पण त्यांनी यावेळी आम्हाला जे घाबरवले तो प्रकार त्या सगळ्यावर कुरघोडी करणारा होता. एक दिवस आधी येऊन, तासन् तास चिकाटीने बसून मेक करून आमच्यासाठी त्यांचे हे करणे आम्हाला आम्ही त्यांच्यासाठी विशेष असल्याची जाणीव करून देणारे आहे. मला नाही वाटत की यापूर्वी कोणत्याही सेलिब्रिटी परीक्षकाने असे काही केले असेल. मी घाबरलो का? या प्रश्नाचं उत्तर अर्थातच हो, घाबरलो! असं आहे”
याला पुस्ती जोडत फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनीचे निर्माते रणजीत ठाकूर म्हणाले, “असे पहिल्यांदाच झाले आहे की एका परीक्षकाने इतके परिश्रम घेऊन असे काही केले आणि गेल्या 4 सीझन्सचा सूड उगवला आणि शिल्पाने स्वतःच पद्धतशीरपणे हा सापळा रचला आणि त्यासाठी 4 तासांपेक्षा जास्त वेळ देऊन अपेक्षित तो मेकअप करून घेतला. सुपर डान्सरच्या इतिहासातील हा एक संस्मरणीय किस्सा आहे. येत्या शनिवारी आणि रविवारच्या भागामध्ये ही धमाल प्रेक्षकांना आणि शिल्पाच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
‘जून’ – नवी सुरूवात करून देणारा, मनाची घालमेल ओळखणारा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक