ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
हातात बंदूक घेत शिल्पा शेट्टीचा धाकड अंदाज, पाहा तिचा कॉप लुक

हातात बंदूक घेत शिल्पा शेट्टीचा धाकड अंदाज, पाहा तिचा कॉप लुक

बॉलीवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी नेहमीच्या त्याच्या चित्रपटांमधील नव्या स्टाईलमुळे चर्चेत असतो. त्याचे पोलिसांच्या जीवनावर आधारीत चित्रपट तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. आता रोहित शेट्टी हाच धमाका ओटीटी माध्यमावर करण्यास सज्ज झाला आहे. लवकरच त्याची कॉप सिरिज इंडियन पुलिस फोर्स Indian Police Force प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे त्याच्या या पोलिस फोर्समध्ये आता एका नव्या महिला अधिकारीची भरती होणार आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी या वेबसिरिजमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या रोहित शेट्टी आणि शिल्पा शेट्टीचा हा धाकड अंदाजमधील व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

शिल्पा शेट्टीचा ओटीटी डेब्यू 

शिल्पा शेट्टीने आजवर बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमधून स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. तिच्या फिटनेस आणि सौंदर्याने ती आजही अनेकांना घायाळ करते. लग्न आणि मुलं या जबाबदाऱ्या सांभाळताना तिने काही काळ तिच्या कामामधून ब्रेक घेतला होता. मात्र हंगामा 2 या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत ती पुन्हा अभिनयासाठी सज्ज झाली आहे. आता तर शिल्पा चक्क डिजीटल डेब्यू करत आहे. रोहित शेट्टीच्या आगामी कॉप सिरिजमधील ती पहिली महिली आधिकारी असणार आहे. नुकताच तिने तिचा या वेबसिरिजमधील फर्स्ट लुक शेअर केला. या पोस्टसोबत शिल्पाने शेअर केलं आहे की, ” पहिल्यांदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर आग लावण्यासाठी तयार, दी अॅक्शन किंग रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये सहभागी होताना खूपच रोमांचक वाटत आहे.”

याच सोबत तिने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती रोहित शेट्टीसोबत वॉक करत आहे. या पोस्टसोबत शेअर केलं आहे की, रेडी. शेट्टी. गो…

शिल्पा शेट्टीचा नवा धाकड अंदाज

शिल्पा शेट्टीने आजवर अनेक भूमिका पदड्यावर साकारल्या आहेत. मात्र हा तिचा लुक सर्वांचं लक्ष वेधून घेणारा आहे. कारण यात तिच्या हातात बंदूक आहे शिवाय तिने पोलिसांचा गणवेश परिधान केला आहे. शिल्पा शेट्टीच्या या लुकची त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामाला पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. मात्र या वेबसिरिजमध्ये पहिल्यांदाच शिल्पाच्या लुकची उत्सुकता जास्त दिसत आहे. शिल्पा यासोबत आणखी अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिचा सुखी आणि निक्कमा सारखे चित्रपट रांगेत आहेत. यासोबतच ती इंडियाज गॉट टॅलेंटंमधूनही परिक्षकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

25 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT