चर्चेत राहायला शिल्पा शेट्टीला फारच आवडते. इन्स्टाग्रामवर तिच्यासारखी अॅक्टिव्ह अभिनेत्री सापडणार नाही. सध्या शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. आता या व्हिडिओमध्ये शिल्पा एकटी नाही तर तिचे संपूर्ण कुटुंब यामध्ये दिसत आहे. पहिल्यांदाच तिच्या व्हिडिओमध्ये तिचा मुलगा चक्क अॅक्टींग करताना दिसला आहे. त्यामुळेच तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जुना असला तरी हा व्हिडिओ फारच खास आहे बरं का!
‘तारक मेहता’मधील अभिनेत्री प्रिया अहुजाच्या घरी आला नवा पाहुणा, शेअर केला फोटो
हा तर टिकटॉक
आता तुम्हाला टिकटॉकबद्दल काही नव्याने सांगायला नको. या अॅपच्या माध्यमातून व्हिडिओ तयार केले जाते. कित्येक सेलिब्रिटीही याच्या माध्यमातून आपले व्हिडिओ तयार करतात. शिल्पा शेट्टीने तिचे इन्स्टा फॉलोअर्स 14 मिलियन झालेत म्हणून आभार मानणारा हा व्हिडिओ केला आहे. हा व्हिडिओ थोडा विनोदी आहे. कारण यामध्ये अमिताभ बच्चनच्या दिवार या चित्रपटाचा डायलॉग वापरण्यात आला आहे. यामध्ये सगळ्यात शेवटी ती खूशखबर सांगताना दिसत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सचे धन्यवाद मानले आहे. पाहा व्हिडिओ
पुन्हा येतेय चित्रपटात
चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात असल्यामुळे शिल्पा शेट्टी चित्रपटात काम करत नव्हती हे तर आता सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे ती फिटनेस आणि मॉम व्हिडिओजच्या माध्यमातून सगळ्यांना इंटरटेन करत होती. पण चित्रपटांमध्ये पुन्हा काम करण्याची तिची इच्छा होती. तिला तिच्या आवडीची स्क्रिप्ट मिळाली असे म्हणायला हवे कारण तिच्या ‘निकम्मा’ या चित्रपटाचे शुटींग सध्या सुरु आहे. या चित्रपटात अभिन्यू दासानीसोबत दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीजची तारीख निश्चित नसली तरी हा चित्रपट 2020मध्ये रिलीज होणार आहे इतकं कळत आहे.
अजयची भेट झाली नसती तर शाहरूखसोबत लग्न….
नुकतीच साजरी केली 10 वी अॅनिर्व्हसरी
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या लग्नाला नुकतीच 10 वर्षे पूर्ण झाली. त्यावेळीही शिल्पाने राज कुंद्रासोबतची एक छान पोस्ट शेअर केली होती. या पोस्टसोबत तिने बुमरँग व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओलाही खूप चांगले व्ह्यूज मिळाले आहेत. शिल्पा कायचमम असं काही तरी आवर्जुन करते.
शिल्पा शेट्टीचे फिटनेस प्रेम
शिल्पा शेट्टीच्या अभिनयाची प्रशंसा तर नेहमीच केली जाते. बाजीगरमधील तिचा रोल छोटासा वाटत असला तरी देखील तिने सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती. पण या सोबतच तिचा जास्त कल हा फिटनेसकडे आहे. पावर योगा पासून ते डाएटपर्यंतचे सगळे सल्ले ती कायम तिच्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असते. या शिवाय लहान मुलांच्या आरोग्याची काळजी नेमकी कशी घ्यायची हे देखील ती कायम सांगत असते.
आता शिल्पा शेट्टीच्या फॅन्समध्ये वाढ झाल्यामुळे तिच्या फॅन्सना आनंद झाला असेल हे नक्की!
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.