ADVERTISEMENT
home / मनोरंजन
super dancer shilpa shetty

‘सुपर डान्सर’ च्या मंचावर शिल्पा शेट्टी आता दिसणार नाही, वेगवेगळ्या सेलिब्रिटींची हजेरी

‘सुपर डान्सर’ हा मुलांचा डान्स रियालिटी शो ज्याप्रमाणे त्यांच्या उत्तम कलेमुळे ओळखला जातो. त्याचप्रमाणे या शो ची परीक्षक म्हणून शिल्पासाठीही ओळखला जातो. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Kundra) सध्या काही काळ या शो पासून दूर आहे. तिच्या व्यक्तिगत आयुष्यात आलेल्या वादळामुळे आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या तुरूंगात असल्यामुळे तिला या शो चे परीक्षण करणे शक्य नाही. त्यामुळे आता शिल्पा शेट्टीची या मंचावर हजेरी लागणार नाही. त्यामुळे निर्मात्यांनी ‘Show must go on’ अवलंबत वेगवेगळ्या सेलिब्रिटींना आमंत्रित करण्याची तयारी सुरू केली आहे. 

अधिक वाचा – “भेटली ती पुन्हा 2” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या आठवड्यात दिसणार रितेश – जेनेलिया

मागच्या आठवड्यात करिश्मा कपूरने या शो ला हजेरी लावल्यानंतर आता या आठवड्यात प्रेक्षकांना रितेश आणि जेनेलियाची जोडी दिसणार असल्याचे कळून येते आहे. काही वृत्तपत्रांनीही याबाबत माहिती दिली आहे. मात्र दरवेळेप्रमाणे यावेळी कोणतेही प्रोमो दाखवण्यात आलेले नाहीत. शनिवार आणि रविवार हा शो प्रसारित होतो आणि साधारणतः बुधवारपासून याचे प्रोमो दाखविण्यात येतात. मात्र यावेळी असं काहीही झालेले नाही. शिल्पा या शो मध्ये अत्यंत मिसळून गेली होती. कारण गेल्या चार सीझनपासून ती हा शो करत आहे. मात्र आता अचानक आलेल्या संकटामुळे शिल्पाची या शो मधून गच्छंती झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत निर्मात्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. तर रितेश आणि जेनेलिया हेदेखील अत्यंत प्रसिद्ध असून येणाऱ्या भागात काय धमाल पाहायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. गीता कपूर आणि अनुराग बासू यांच्यासह रितेश आणि जेनेलियानेही खूपच धमाल केली आहे असं सांगण्यात येत आहे. 

अधिक वाचा – मैत्रीवर आधारित नवी वेबसिरिज, शांतीत क्रांती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ADVERTISEMENT

मौसमी चटर्जी आणि सोनाली बेंद्रेचेही नाव 

पुढचे काही आठवडे शिल्पा नसेल त्यामुळे आता काही भागांसाठी मौसमी चटर्जी आणि सोनाली बेंद्रेंचेही नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात आले आहे. पुढच्या भागांसाठी या दोघींनाही आमंत्रित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पण आता दुसरी कोणतीही परीक्षक आणण्यापेक्षा अशा प्रकारे गेस्ट जज आणणे निर्मात्यांना बरे वाटत आहे असे दिसून आले आहे. याआधीही शिल्पाला कोरोना झाला तेव्हा परीक्षकाची धुरा मलायका अरोराने सांभाळली होती. मात्र आता पुन्हा एकदा शिल्पाच्या जागी मलायका येणार का असा प्रश्नही या शो च्या चाहत्यांना आहे. या शो मधील मुले अत्यंत प्रतिभावान असून नेहमीच आपल्या नृत्याने प्रेक्षकांचे आणि परीक्षकांचेही मन जिंकतात. त्यामुळे आता येणाऱ्या भागात नक्की काय घडणार आणि हा शो कशा प्रकारे निर्माते चालवणार आहेत याचीच चिंता चाहत्यांनाही सतावत आहे. मात्र सर्व स्पर्धक आणि शिल्पाचे सहकलाकार तिची नक्कीच आठवण काढत आहेत. तिच्या ‘सुपर से ऊपर’ या कमेंट्सची सर्वांनाच सवय झाली आहे. तर उत्तम डान्सनंतर शिडीवर चढून मानवंदना देण्याची तिची पद्धतीही सर्वांनाच आवडते. प्रेक्षकही शिल्पाची खूपच आठवण काढत आहेत. तर तिचे चाहते ती लवकर या संकटातून बाहेर येवो यासाठीही प्रार्थना करत आहेत. 

अधिक वाचा – या ट्रेडिंग गाण्याने उडवली सगळ्यांची झोप

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

30 Jul 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT