Advertisement

बॉलीवूड

‘हंगामा 2’ प्रदर्शित होण्याआधीच शिल्पा शेट्टीचा खुलासा, चित्रपट होणार सुपरहिट

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Jul 14, 2021
‘हंगामा 2’ प्रदर्शित होण्याआधीच शिल्पा शेट्टीचा खुलासा, चित्रपट होणार सुपरहिट

Advertisement

शिल्पा शेट्टीने नव्वदचा काळ तिच्या सौंदर्य  आणि अभिनयाने गाजवला होता. लग्नानंतर मात्र ती गेली चौदा वर्ष बॉलीवूडपासून काहिशी दूरावली होती. मात्र असं असलं तरी तिचा फिटनेस आणि इन्स्टाग्राम पोस्टमुळे ती सतत चाहत्यांच्या संपर्कात होती. सहाजिकच आजही शिल्पा शेट्टीचं स्टारडम कमी झालेलं नाही. आता चौदा वर्षांनी शिल्पा पुन्हा बॉलीवूडमध्ये कमबॅक करत आहे. त्यामुळे सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘हंगामा 2’ चं जोरदार प्रमोशन करताना ती दिसत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तो सुपरहिट होणार याची शिल्पाला खात्री आहे. जाणून घ्या यामागचं गुपित

‘हंगामा 2’ सुपरहिट होण्यामागचं हे आहे गुपित

हंगामा 2 मध्ये शिल्पासोबत मीजान जाफरी, प्रणिता सुभाष, परेश रावल यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातून कमबॅक करण्याबाबत एका मुलाखतील शिल्पाने एक खास खुलासा केला आहे.  शिल्पाच्या मते, ” मी चौदा वर्षांचा वनवास संपवत आता हंगामा 2 मधून बॉलीवूडमध्ये पुन्हा पदार्पण करत आहे. या गोष्टीसाठी मी खूप खूश आणि उत्साही आहे. दुसरी गोष्ट मी अशी नोटिस केली आहे की ज्या कोणत्याही चित्रपटात माझे नाव अंजली असतं तो चित्रपट हमखास सुपरहिट ठरतो. या चित्रपटात माझं नाव अंजली आहे त्यामुळे मला वाटतं हा चित्रपटदेखील नक्कीच सुपरहिट होईल. असं असलं तरी हंगामा 2 चित्रपटगृहात प्रदर्शित होत नसून डिजिटल प्लॅटफॉर्मवर होत आहे. मात्र मला विश्वास आहे की प्रेक्षक नेहमीप्रमाणेच या चित्रपटातून आमच्यावर प्रेम करतील. 

‘हंगामा 2’ मध्ये काम करण्याचा शिल्पाचा भन्नाट अनुभव

शिल्पाने हंगामा 2 मध्ये काम करण्याबाबतचे अनेक अनुभव या मुलाखतीत शेअर केले. तिच्या मते हा चित्रपट अतिशय कमाल आणि धमाल झालेला आहे. या चित्रपटासाठी प्रॉडक्शन आणि कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे. शिवाय चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांना खूप आवडला आहे. कोरोनाच्या काळात असा मनोरंजक चित्रपट प्रदर्शित होणे ही काळाची गरज आहे. त्यात तिचे ‘चुरा के दिल मेरा’ या गाण्याचे नवे व्हर्जनही प्रेक्षकांना खूप आवडले आहे. जेव्हा  तुमच्या मेहनतीचे अशा प्रकारे चीझ होते तेव्हा मनाला आनंद मिळतो.

चुरा के दिल मेरा गाण्याबाबत शिल्पाने शेअर केलं एक सिक्रेट

शिल्पाने या मुलाखतीत एक सिक्रेट शेअर केलं आहे. तिच्या मते तिचे पती राज कुंद्राबाबत तिला सर्वात आधी प्रेम तेव्हा वाटलं होतं जेव्हा त्याने तिचं चुरा के दिल मेरा हे जुनं गाणं पहिल्यांदा पाहिलं होतं. कारण त्यानंतर तो तिचा जबरदस्त चाहता झाला होता. मात्र मुलाबाबत सांगताना तिने शेअर तेलं की अयानने तिचा कोणताही चित्रपट आजवर पाहिलेला नाही. त्यामुळे या चित्रपटात चुरा के दिल मेरा या गाण्यातून त्याने पहिल्यांदा शिल्पाला एक अभिनेत्री म्हणून पाहिलं आहे.  थोडीशी विचित्र गोष्ट असली तरी मला याचा खूप आनंद  आहे. आता जर पुन्हा कमबॅक करत आहे तर मला अशा जनरेशनला इम्प्रेस करायला आवडेल ज्यांनी मला आधी अभिनेत्री म्हणून कधीच पाहिलेलं नाही.  

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा  –

अभिजीत खांडकेकर मराठीतला रणवीर सिंह, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

अर्जुन कपूर आणि तारा सुतारियाच्या ‘एक व्हिलेन रिटर्न्स’चं शूटिंग सुरू

अक्षय कुमारने ‘रक्षाबंधन’साठी वाढवलं पाच किलो वजन, सेटवरचे फोटो व्हायरल