शिल्पा शेट्टीने मागच्या वर्षी हंगामा 2 या चित्रपटातून पदार्पण केलं. जवळजव अकरा वर्षांनंतर शिल्पा पुन्हा अभिनयाकडे वळली होती. मात्र हा चित्रपट काही विशेष चालला नाही. आता शिल्पा शेट्टी तिच्या आगामी ‘निकम्मा’ या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या ट्रेलरमधून तिचा सुपरवुमन अवतार प्रेक्षकांसमोर आला आहे. यामुळे चित्रपटात तिची कोणती भूमिका असेल याबाबत चाहते नक्कीच उत्सुक झाले आहेत.
निकम्मामध्ये शिल्पा शेट्टी साकारणार का सुपरवुमन
‘निकम्मा’ चित्रपटाचा ट्रेलर काही तासांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. त्यापूर्वी शिल्पाने तिचा सुपरवुमन अवतार सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामुळे तिच्या या नव्या लुकची सगळीकडे चर्चा सुरू झाली. निकम्मामध्ये शिल्पासोबत अभिनेत्री भायश्रीचा मुलगा अभिमन्यु दासानी मुख्य भूमिकेत असणार आहे. चित्रपटात त्याच्यासोबत शिर्ले सेतिया ही अभिनेत्री स्क्रीन शेअर करत आहे. हिरोपंती चित्रपटाचा दिग्दर्शक शब्बीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या चित्रपटातून अभिमन्यु दासानीचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. सुपरफिट बॉडी आणि भन्नाट अॅक्शन पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. मात्र ट्रेलरमध्ये शिल्पा शेट्टीची एन्ट्री प्रेक्षकांना जास्त भावलेली दिसत आहे. तिच्या सुपरवुमन अवतारामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली जात आहे.
काय आहे निकम्मा
निकम्माच्या ट्रेलर आणि शीर्षकावरून चित्रपटाचा हिरो अभिमन्यु अतिशय आळशी मुलगा असल्याचं वाटत आहे. दिवसभर मस्ती करत लोळत पडणाऱ्या मुलाच्या आईच्या भूमिकेत शिल्पा शेट्टी असण्याची शक्यता आहे कारण ट्रेलरमध्ये त्या दोघांचे काय नातं आहे हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्याच्या मते त्याची आई सुपरवुमनपासू अगदी मंजुलिकाप्रमाणे थंडरवुमन अशी सर्व काही आहे. ती त्याच्या आयु्ष्यातील एक सुंदर व्हिलन आहे असं त्याचं मत आहे. मात्र तिला घाबरणारा हा मुलगा जेव्हा तिच्या तिच्या जीवावर बेततं तेव्हा कसा अॅक्शन बॉय होतो ते दाखवम्यात आलेलं आहे. या चित्रपटात नव्वदीच्या काळातील निकम्मा किया इस दिलने या गाण्याच्या ट्रॅक पुन्हा एकदा नव्या स्टाईलमध्ये वापरण्यात आलेला आहे. त्यामुळे नव्वदीच्या काळातील प्रेक्षकांनाही तो आकर्षित करणारा आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक