logo
Logo
User
home / स्टोरीज
Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi

100+ Chhatrapati Shivaji Maharaj Quotes, Status, Wishes In Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार आणि शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. तुम्हालाही शिवरायांची ही कामगिरी पुढील पिढीपर्यंत जावी असे वाटत असेल तर तुम्ही शिवाजी महाराजांवरील पुस्तकातून माहिती घ्या. या महानायकाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यापेक्षा त्यांचा आदर्श, त्यांचे विचार शिकवून करायला हवी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शिवाजी महाराजांचे विचार (shivaji maharaj thoughts), त्यांच्या जयंतीला पाठवता येतील असे शुभेच्छा संदेश (shivaji maharaj quotes), व्हॉटसअॅप स्टेटस (shivaji maharaj status in marathi), शिवाजी महाराज घोषवाक्य (shivaji maharaj slogan in marathi), शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (Shivaji Jayanti Wishes In Marathi) तुमच्यासोबत शेअर करत आहोत. शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा (chhatrapati shivaji maharaj quotes in marathi) देऊन तुम्ही हा दिवस साजरा करा. महाराज आणि शिवरायांची शान म्हणजे मराठी भाषा. मराठी भाषा दिन माहिती तर आपल्या सर्वांना आहेच.

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi – छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi

शिवाजी महाराजांचे विचारच (Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi) त्यांच्या स्वराज्याची प्रेरणा होती. त्यामुळे महाराजांचे हे विचार जाणून घेणे फार महत्वाचे आहेत.

– स्वातंत्र्य एक वरदान आहे,
जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

– कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन,
जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.

– सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी,
इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.

– एखादे झाड ज्याला उंचीही नाही व जिवंत अस्तित्वही नाही,
ते एवढे दयाळू आणि सहनशील आहे की,
ते दगड मारणाऱ्यालाही गोड फळं देते. 
तर मी राजा असल्याने वृक्षापेक्षा दयाळू आणि सहनशील का राहू नये.

– कधीही आपले डोके वाकवू नका,
नेहमी उंचावर ठेवा.

– ज्याचे विचार मोठे असतात.
त्याला भलामोठा मातीचा डोंंगरही
मातीचा गोळा वाटतो.

– असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात वीरता आहे,
खरी वीरता विजयात आहे.

– जर माणसाकडे आत्मशक्ती असेल
तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.

– सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक,
मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.

– शत्रूला दुर्बल समजू नका,
पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.

– लक्ष्य गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल
पुढे जाऊन मोठे लक्ष्य ही गाठू शकते.

– कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा
आणि नडला तर त्याला मराठ्याची जात दाखवा.

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi – छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस

Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi
Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi

सोशल मीडियावर शिवाजी महाराजांविषयीचा अभिमान आणि आदर करणारे स्टेटस (Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi) ठेवूनही तुम्ही हा आनंद व्यक्त करु शकता. यासोबतच तुम्ही संभाजी महाराज स्टेटस ही वाचू शकता.

– अंगात हवी रग… रक्तात हवी धग… छाती आपोआप फुगते….
एकदा जय शिवराय बोलून बघ.

– हे बघ भाऊ! महिलेची सुरक्षा असो किंवा आतंकवाद
राजे असते तर परिस्थिती वेगळी असती.

– ‘छत्रपती शिवराय’ हेच आमचे गुरु!

– शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी..
अरे! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा

– मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती..
तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’

– जिथे शिवभक्त उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती..
अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

– शूरता हा माझा आत्मा आहे…
‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे…
क्षत्रिय हा माझा धर्म आहे…
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे… जय शिवराय

– जाती धर्माच्या भिंती भेदून,
माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे
राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य

– मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे
ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल.
मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी
ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.

– लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र..
एकाकी लढला होता..
भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता.

– शिवबांचे रक्त आमचे,
जन्म आमुचा या जातीचा..
रगारगात आमच्या माणुसकी…
अभिमान आम्हाला मातीचा

– पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात.
पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे मराठेच असतात.

– जातीपेक्षा मातीला.. अन् मातीपेक्षा जास्त आम्ही छत्रपतीला मानतो.

– जिथे महाराजांचा घाम पडला,
तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…
जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या..
तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला.

– पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला…
पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला..
माझा शिवबा जन्माला आला.

Chhatrapati Shivaji Maharaj Status In Marathi

वाचाशिवराजमुद्रा माहिती मराठी

Shivaji Jayanti Wishes In Marathi – शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा - Shivaji Jayanti Wishes In Marathi
Shivaji Jayanti Wishes In Marathi

शिवाजी महाराजांचा जन्म हा मराठ्यांसाठी नवा सुर्योदय घेऊन आला. त्यांच्या या जन्म दिवसाच्या खास शुभेच्छा अर्थात शिवजयंतीच्या शुभेच्छा ( Shivaji Jayanti Wishes In Marathi) आप्तेष्टांना पाठवून हा दिवस साजरा करा.

– आशीर्वादासोबतच विचार घेऊया,
लोककल्याणकारी राज्य घडवूया…
शिवजयंतीच्या शुभेच्छा

– अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत,
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या
सर्वशिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा

– सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा….
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!!
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

– भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता….
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता…
जय भवानी…. जय शिवाजी…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

– श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,
देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

– प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली,
शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे.
शिवजयंतीच्या या शुभ दिनी
महाराजांना मानाचा मुजरा 

– इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर..
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर…
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

– एक विचार समतेचा… एक विचार नितीचा…
ना धर्माचा.. ना जातीचा..
माझा राजा फक्त मातीचा…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

– ‘भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात…
350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी..
तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

– मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले….
स्वराज्यस्वप्न तव साकारिले…
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा…
शिवराया तूज मानाचा मुजरा…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

– यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत,
वरदवंत, पुण्यवंत,
नीतीवंत जाणता राजा..
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

– विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला…
वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला…
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला.
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

– अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल शिवरायांची.. जय शिवराय!

– जगणारे ते मावळे होते..
जगवणारा तो महाराष्ट्र होता..
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन
जनतेवर मायेने हात फिरवणारा
‘आपला शिवबा’ होता..
जय शिवराय

– सिंहाची चाल… गरुडाची नजर.. स्त्रियांचा आदर…
शत्रूचे मर्दन… असेच असावे मावळ्यांचे वर्तन…
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण..
जय शिवराय.

Shivaji Jayanti Wishes In Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Caption In Marathi – छत्रपती शिवाजी महाराज कॅप्शन्स

shivaji maharaj thoughts in marathi
Chhatrapati Shivaji Maharaj Caption In Marathi

– प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी!

– जागविल्याशिवाय जाग येत नाही..
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही…
तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

– रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो,
पण आम्ही मराठी माणसांसाठी हे पवित्र मंदिर आहे,
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

– भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्याची आग आहे.
घाबरतोस काय कोणाला येड्या तू शिवबाचा वाघ आहे.
जय शिवाजी

– स्वातंत्र्याचा सूर्य शिवराय..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

– देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जाण पाहिले..
पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे
छत्रपती शिवराय माझे

– छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मासाठी जगले ना..
स्वत:साठी जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी!
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

– ताठ होतील माना, उंच होतील नजरा…
या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा! 

– शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला,
दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

– बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय,
रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…
शिवजयंतीच्या शुभेच्छा! 

– सह्र्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा…
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

– आले किती गेले किती, उडून गेले भरारा,
संपला नाही आणि संपणार नाही,
माझ्या शिवबांचा दरारा… शिवजयंतीच्या शुभेच्छा

– जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु…
धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

– एक राजा जो रयतेसाठी जगला,
एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला,
एक नेता जो लोकहितासाठी झटला,
एक असामान्य माणूस
ज्याने गुलामी नाकारुन स्वराज्याला जन्म दिला…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

– शब्दही पडतील अपुरे, अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती..
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

– शिबवा आमचा आधार, शिवबा एक विचार! 
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 

– तुझी किर्ती अशीच आसमानामंदी राहू दे,
तुझ्या संस्कारात साऱ्या पिढ्या घडू दे. जय शिवराय.

Chhatrapati Shivaji Maharaj Caption In Marathi

Shiv Jayanti Status For Whatsapp In Marathi – शिवजयंती व्हॉटसअॅप स्टेटस मराठी

शिवजयंती व्हॉटसअॅप स्टेटस मराठी - Shiv Jayanti Status For Whatsapp In Marathi
Shiv Jayanti Status For Whatsapp In Marathi

शिवजयंतीच्या निमित्ताने वॉट्सअप स्टेटसवर शेअर करण्यासाठी खास स्टेटस (Shiv Jayanti Status For Whatsapp In Marathi).

– लोकं म्हणतात हे विश्व देवानं बनवलं आहे…
पण मी म्हणतो….आम्हा मराठ्यांना छत्रपतींनी बनवले आहे.

– दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला…
आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला.

– एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही…
आमच्या राजाची शिकवण आहे…
अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

– जगणारे ते मावळे होते…जगवणारा तो महाराष्ट्र होता….
स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा फक्त शिवबा होता. 

– स्वराज्यात पेटवून मशाली शौर्याची.. निघाले शिवबा नाश करण्या शत्रूंचा,
लपला होता दुर्जन भगव्याच्या उडवला सडा…शिवबांनी त्याच्या रक्ताचा

– असा एकच राजा मिळाला आहे या महाराष्ट्राच्या मातीला….
मावळा म्हणून शोधले त्यांनी अठरा पगड जातींना.  

– कपाळी लावतो आम्ही भगवा गंध..
आम्हाला फक्त छत्रपतींचा छंद.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

– तुझ्या किर्तीच्या कथांना आम्ही पुसलं केव्हाच….
तुझ्या गडांचे दगड येऊन कधी तू वाच

– लहानपणापासून असे संस्कार मिळाले आहे की,
मंदिर आणि महाराज दिसले की,
आपोआपच नतमस्तक होते.

– ना चिंता ना भिती…ज्यांच्या मनात छत्रपतींची नीती

– चांगल्या विचारांचा धर्म केला की,
धर्माचा विचार उरत नाही…

– ज्यांचे आदर्श महाराज आहेत.
त्यांना लढायचे कसे हे शिकवावे लागत नाही.

– जो जो शिवरायांच्या विचाराने पुढे जाईल…
पुरा आसमंत त्याचा होईल.

– भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही…
भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य…
भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती

– माणसाने माणूस जोडावा हीच शिकवण आमच्या शिवबाची.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

– मी आहे मराठा, सिंहाचा छावा 

– मराठा आम्ही.. आम्ही शिवबाचे मावळे…
त्याच्या पावलावर चालूनी टिकवू संस्कार त्यांचे.

Shiv Jayanti Status For Whatsapp In Marathi

Shivaji Maharaj Slogan In Marathi – शिवाजी महाराज घोषवाक्य

शिवाजी महाराज घोषवाक्ये - Shivaji Maharaj Slogan In Marathi
Shivaji Maharaj Slogan In Marathi

शिवाजी महाराजांवर काही अशी घोषवाक्ये (Shivaji Maharaj Slogan In Marathi) लिहिण्यात आली आहेत ज्या तुम्हाला प्रेरणा देतील अशाच आहेत.

 • जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 • प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज…श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
 • हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!
 • शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
 • झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा… गर्जा महाराष्ट्र माझा… जय शिवराय
 • ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची
 • झाले बहू .. होतील बहू… पण शिवरायांसारखा कोणीच नाही
 • सह्याद्रीच्या कडेकपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो… तो म्हणजे छत्रपती
 • ना शिवशंकर…. ना कैलासपती… ना लंबोदर तो गणपती.. नतमस्तक तया चरणी .. ज्याने केली स्वराज्य निर्मिती… देव माझा तो राजा छत्रपती
 • सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
 • वैकुंठ रायगड केला… लोक देवगण बनला… शिवराज विष्णू झाला.. वंदन त्याला…
 • शौर्यवान योद्धा… शूरवीर… असा एकच राजा जन्मला …. तो आमुचा शिवबा. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 • निश्चयाचा महामेरु… बहुत जनांसी आधारु…अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती.
 • अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती
  जय भवानी.. जय शिवाजी! 
 • छत्रपती आमचा मान तोची आमुचा सन्मान. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 • औरंगजेबाचा कोथळा  निधड्या छातीने काढला… तो शिवबा आमचा कितीही काळ लोटला तरी आम्हा रयतेचा शिवबाच राजा छत्रपति शिवराय’… शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाचीकाळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा “शिवसुर्य “…!!!! 
 • प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर गो ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक, हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संघारक, श्रीमान योगी,योगिराज,बुद्धिवंत,कीर्तिवंत कुलवंत, नीतिवंत, धनवंत, सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत, महाराजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी। .. जय शिवाजी, हर हर महादेव.

Poems On Shivaji Maharaj In Marathi – महाराजांवरील उत्तम कविता

महाराजांवरील उत्तम कविता - Poems On Shivaji Maharaj In Marathi
Poems On Shivaji Maharaj In Marathi

आतापर्यंत अनेकांनी महाराजांची स्तुती कवितांच्या (Poems On Shivaji Maharaj In Marathi) माध्यमातून केली आहे. शिवाजी महाराजांवरील खास कविता तुमच्यासाठी.

 • विजेसारखी तलवार चालवुन गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.
 • ना शिवशंकर… तो कैलाशपती,ना लंबोदर… तो गणपती, नतमस्तक तया चरणी,ज्याने केली स्वराज्य निर्मिती देव माझा एकच तो.. राजा शिवछत्रपती. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
 • मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली….जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली….नगारा वाजला, शाहिरी साज चढला..डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार….!!!!
 • मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार….इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत…….शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 • दुर रहा पडु नका आमच्या फंदात..छत्रपति बाप आहे आमचा..सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..
 • जाऊन बघा ती औरंग्याची कबर मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते चळाचळा..मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा..आरं अजूनही वेळगेली नाही बाळा..सांभाळुन राहाआम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा…
 • पुन्हा सुदूर पसरवू,महाराष्ट्राची कीर्ति ।शिवरायांची स्मरुन मुर्ती,शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती ।एकच ध्यास,जपू महाराष्ट्राची संस्कृती! शिवजयंतीच्या शुभेच्छा
 • निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे,मनगटात हत्तीचे बळ अनमनात शिवतेजाची आग आहे…..भूतकाळाच्या छाताडावर पाय रोवून,वर्तमानकाळ उलटा टांगून ,भविष्य घडवायला शिकवणाऱ्याया पवित्र मातीतल्या राजाला रक्ताच्या प्रत्येक  थेंबाकडून….त्रिवार मानाचा मुजरा…..
 • किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं…..पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळातफिरावं लागतं………आणि शिवरायांचे लाख मोलाच स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं…..
 • काळजाने वाघ…डोळ्यात आग…छातित फौलाद…हि मराठ्याची औलाद…शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 • ताकद हत्तीची…चपळाई चीत्त्याची…भगवे रक्त…शरीराने सक्त…झुकते ईथेच दिल्लीचे तख्त…अन झुकवू शकतात फक्त मराठेच…हर हर महादेव….शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 • माता ज्याची थोर जिजाऊ शहाजी ज्याचेपिता..तो लढला ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता हिंदवी स्वराज्य..स्थापनेसाठी …तो संतापून पेटून उठला..जो किल्ला त्याने चढला..तेथे भगवा नेहमीच.. फडफडला तरुणांच्या हाती देऊनी समशेर घडविला त्याने मावळा स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी सोसल्या लाखो कळा धोक्यात आहे आजपुन्हा मराठी काढूनी टाका सुरांतून नाराजी उठा अन् शोधा स्वत:तच…तोच मावळा तोच शिवाजी…शिवजयंतीच्या शुभेच्छा

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे कोट्स आणि स्टेटस तुम्ही शिवजयंतीच्या निमित्ताने देण्यासाठी नक्कीच वापरू शकता. 

You Might Like These:

महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे

महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती

Maharana Pratap ki Kahani

आयुष्यावर व. पु. काळे यांचे कोट्स

29 Sep 2019

Read More

read more articles like this
good points logo

good points text