महाराष्ट्राची लाडकी शीतली अर्थात शिवानी बावकर लवकरच एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येते आहे. सोनी मराठी वाहिनीवर ‘कुसुम’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याचा प्रोमो पाहायला मिळाला. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या ‘शीतली’ या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली गेली. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी वाहिनी नवीन मराठी मालिका, कुसुम घेऊन येत आहेत. आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कुसुम यातून प्रेक्षकांना दिसणार आहे. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे.
अधिक वाचा – 26 वर्षानंतरही डेब्यू लुकमध्ये दिसतोय हॉट मिलिंद सोमण!
जबाबदाऱ्या पार पाडणारी कुसुम
आत्तापर्यंत या मालिकेचे तीन प्रोमो आले आहेत. माहेरचं लाईट बिल भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी कुसुम या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसली. दुनियेसाठी खपायचं आणि आई बापाला नाही जपायचं, असं कसं चालेल, असं म्हणत कुसुम सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम पार पाडतानाही या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसली आहे. त्यामुळे आता या मालिकेचा प्लॉट जरी कळला असला तरीही शिवानी बावकर कुसुमची ही व्यक्तिरेखा नक्की कशी साकरणार आणि याची कथा पटकथा नक्की काय असणार याचीही आता प्रेक्षकांना आणि चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. तसंच शिवानी बावकरसह अन्य सहकलाकार कोण असणार आणि हिंदीप्रमाणे या मालिकेला वळण मिळणार की, यामध्ये काही बदल करण्यात येणार आहेत, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. प्रोमोवरून तरी सध्याच्या वातावरणानुसारच ही मालिका असेल असे वाटत आहे.
दरम्यान या मालिकेबाबत निर्माती एकता कपूरने सांगितले की, “21 वर्षानंतर ‘कुसुम’ प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येते असून मी खूप आनंदी आहे. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांसमोर ‘कुसुम’ आणण्याची संधी मला मिळाली. ‘कुसुम’ ही मालिका माझ्या खूप जवळची आहे. 21 वर्षांआधी या मालिकेने सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले होते आणि 21 वर्षांनंतर मराठीमध्ये जेव्हा कुसुम येते आहे, तेव्हाही रेकॉर्ड ब्रेक करेल, अशी मला खात्री आहे. मी मराठीमध्ये याआधीही काम केले आहे, पण खूप काळानंतर मी मराठीमध्ये पुन्हा येते आहे. प्रादेशिक भाषेमध्ये आणि खासकरून मराठीमध्ये खूप काही करण्यासारखे आहे आणि मी खूश आहे की सोनी मराठी वाहिनीने मला ही संधी दिली”
अधिक वाचा – Bigg Boss मराठी: दुसऱ्या आठवड्यात रंगणार ‘जोडी की बेडी’ टास्क
हिंदी मालिकेचा हा मराठी अवतार
2001 साली हिंदीमध्ये ‘कुसुम’ नावाची मालिका प्रसारित झाली होती. नौशाद अली सरदारने ही व्यक्तिरेखा साकारली होती आणि या व्यक्तिरेखेमुळे ती घराघरात पोहचली होती. त्या मालिकेचा हा मराठी अवतार आहे. तेव्हाही ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती. कसुम दोन दशकाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा तिने त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता जेव्हा कुसुम येतेय तेव्हा ती आताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते आहे असं सांगण्यात आलं आहे. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल अशी आशाही व्यक्त करण्यात येत आहे. बालाजी टेलिफिल्न्स आणि सोनी मराठी वाहिनी यांनी मिळून ‘कुसुम’ या मालिकेतून आजच्या काळातल्या मुलींच्या मनातले प्रश्न मांडले आहेत. सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न कुसुम या प्रोमोमधून बोलून दाखवला आहे आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्याली एक वाटते असंही आता प्रेक्षक म्हणून लागले आहेत. येत्या 4 ऑक्टोबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अधिक वाचा – सारा अली खानचं ‘साडीप्रेम’ आलं उफाळून, फोटो पोस्ट करत म्हणाली…
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक