ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
ड्रग्ज संदर्भात अभिनेत्रींनी केले हे धक्कादायक खुलासे

ड्रग्ज संदर्भात अभिनेत्रींनी केले हे धक्कादायक खुलासे

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने ड्रग्जकडे वळण घेतल्यानंतर आता बॉलिवूडमध्ये ड्रग्जची प्रकर्षाने चौकशी होऊ लागली आहे. अनेक अभिनेत्रींची नावे पुढे आल्यानंतर NCB कडून अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये दीपिका, सारा, रकुल प्रीत, श्रद्धा कपूर यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात या सगळ्यांना समन्स पाठवल्यानंतर NCB कडून यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. या चौकशी दरम्यान काही सेलिब्रिटींनी ड्रग्ज संदर्भातील काही गोष्टी मान्य केल्या असून काही गोष्टींवर धक्कादायक खुलासे केल्याचेही कळत आहे. यांच्या चौकशीतून नेमके काय समोर आले ते जाणून घेऊया.

अनुराग कश्यपविरोधात या अभिनेत्रीची अखेर पोलिसात तक्रार, बलात्काराचा आरोप

काय म्हणाली दीपिका ?

दीपिका पदुकोण हिने देखील ड्रग्जची मागणी केल्याचे चॅट काही दिवसांपूर्वी वायरल झाल्यानंतर दीपिकाकडेही संशयाची सुई फिरली होती. जया साहासोबत तिने एक व्हॉटसअॅप चॅट केले होते. ज्यामध्ये तिने हशची मागणी केली होती. विशेष म्हणजे या ग्रुपची दीपिका अॅडमिन होती. या चॅटनंतर दीपिकाला समन्स बजावण्यात आला होता. दीपिकाची चौकशी करण्यात आल्यानंतर मीडिया रिपोर्टने दिल्यानुसार तिने NCB च्या प्रश्नांना उत्तर देताना दीपिका रडली. तिला ज्यावेळी हश कशापद्धतीने घेतले असे विचारण्यात आले त्यावेळी दीपिका थोडी गडबडली. ती NCB च्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे म्हणावी तितकी समाधानकारक देऊ शकली नाही. त्यामुळे तिचा फोन ताब्यात घेणार आहे. त्यामुळे दीपिकाच्या डोक्याचा ताप आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

Big Boss 14: या कारणासाठी सलमान खान करणार स्वतःच्या बिग बॉसमधील मानधनात कपात

ADVERTISEMENT

काय म्हणाली सारा?

ड्रग्ज प्रकरणात आणि सुशांत सिंह राजपूतच्या खासगी आयुष्यात सारा अली खानचा काय रोल होता हे अनेकांना जाणून घ्यायचे होते. सारा अली खान सुशांतच्या आयुष्यात ‘केदारनाथ’ या चित्रपटापासून आली होती. साराने तिचे आणि सुशांतचे रिलेशनशीप होते. याची कबुलीही दिली होती. त्याच्यासोबत ती एकदा थायलंडलाही जाऊन आल्याचे तिने सांगितले. पण ड्रग्ज संदर्भात विचारणा केल्यावर तिने मी ड्रग्ज घेतले नाही असे सांगितले. पुढे सारा म्हणाली की, सुशांतला ड्रग्ज घेण्याची आधीपासूनच सवय आहे. केदारनाथ चित्रपटाच्या सेटवरही त्याने ड्रग्जचे सेवन केले होते. पण मी अद्याप कोणत्याही ड्रग्जचे सेवन केले नाही. 

काय म्हणाली श्रद्धा ?

तर दुसरीकडे श्रद्धानेही NCB समोर आपण निर्दोष असल्याचे सांगत सुशांतवर ड्रग्ज घेण्याचे आरोप केले आहेत. सुशांतला शूट दरम्यान वॅनिटी वॅनमध्ये ड्रग्ज घेताना पाहिल्याचे तिने NCB ला सांगितले आहे. ज्या एका ड्रग्ज पार्टीची सातत्याने चर्चा होत आहे. या पार्टीचा भागही श्रद्धा होती याची कबुली तिने दिली आहे. या पार्टीमध्ये ड्रग्ज होते. पण श्रद्धाने त्याचे सेवन केले नाही असे सांगितले आहे. चौकशीअंती श्रद्धाचा फोनदेखील NCB ने जप्त केला आहे. 

काय म्हणाली रकुलप्रीत सिंह ?

रिया चक्रवर्तीसोबत चॅट केल्याची कबुली अभिनेत्री रकुल प्रीतने केली आहे. तिने 2018 साली रियासोबत ड्रग्जसंदर्भात चॅट केले होते हे सांगत मी अद्याप ड्रग्जचे सेवन कधीही केले नाही हे देखील तिन सांगितले आहे. रकुलसोबत साधारण 3 तास चौकशी केल्यानंतर तिला सोडण्यात आले. रियाने चौकशीदरम्यान रकुलचे नाव घेतल्यामुळे ती आधीपासूनच  चौकशीच्या यादीमध्ये होती.   दरम्यान, रकुलप्रीतने दिल्ली हायकोर्टात धाव घेऊन मीडिया ट्रायल आणि या संदर्भात होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याचीही मागणी तिने केली आहे.

आता या चौकशीमध्ये आणखी कोणाचा नंबर लागतो आणि काय सत्य समोर येते हे लवकरच कळण्याची अपेक्षा आहे.

ADVERTISEMENT

NCBने समन्स बजावल्यानंतर दीपिका, सारा आणि रकुल प्रीत मुंबईत दाखल

 

फोटो क्रेडिट: Instagram

27 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT