ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
sector 36

भयावह निठारी हत्याकांडावर आधारित असलेल्या ‘सेक्टर 36’ चे शूटिंग सुरु 

बदलापूर’चे निर्माते दिनेश विजन हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्मात्यांपैकी एक आहेत. आपल्या चित्रपटांतून वेगळे विषय मांडणारे आणि लोकांच्या मनाला भिडणारे दिनेश विजन लवकरच प्रेक्षकांसाठी आणखी एक क्राइम थ्रिलर चित्रपट घेऊन येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असणार आहे. ‘सेक्टर 36’ या चित्रपटात विक्रांत मॅसी आणि दीपक डोबरियाल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा करणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘सेक्टर 36’ची पहिली झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली आहे.

झुरळाच्या माध्यमातून दाखवली चित्रपटाची पहिली झलक

‘बदलापूर’, ‘स्त्री’ आणि ‘मिमी’च्या निर्मात्यांनी त्यांच्या नवीन प्रकल्प ‘सेक्टर 36’ ची घोषणा करताना ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करण्यासाठी झुरळाचा वापर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, मागून आवाज येतो की एक झुरळ स्वत: साठी लढण्याचा निश्चय करते आणि व्यवस्थेसमोर उभे राहण्याचा निर्णय घेते. पण शेवटी झुरळाचे काय होते हे बघितल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता खूप वाढली आहे. दिनेश विजनची निर्मिती कंपनी मॅडॉक फिल्म्सने त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, “दिनेश विजन सादर करत आहेत ‘सेक्टर 36’. सत्य घटनांवर आधारित एक क्राइम थ्रिलर चित्रपट. चित्रपटात विक्रांत मेस्सी आणि दीपक डोब्रियाल आहेत. दिनेश विजन यांनी निर्मिती आणि आदित्य निंबाळकर यांनी दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट बौधायन रॉय चौधरी यांनी लिहिला आहे. चित्रपटाचे शूटिंग आजपासून सुरू होत आहे.”

हा चित्रपट एका भीषण घटनेवर आधारित आहे

मॅडॉक फिल्म्स निर्मित, ‘सेक्टर 36’ ची कथा उत्तर प्रदेशातील नोएडा येथील निठारी गावात झालेल्या भीषण हत्याकांडावर आधारित आहे. विक्रांत मेस्सी स्टारर या चित्रपटाचे शूटिंग आजपासून म्हणजेच 13 जूनपासून सुरू झाले असून त्याची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. व्हिडीओच्या पार्श्वभूमीत चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे नाव देखील दिसत आहे.

काय आहे निठारी हत्याकांड 

देशाला हादरवून सोडणारे अत्यंत खळबळजनक निठारी हत्याकांड आजही अनेकांच्या स्मरणात असेल. डिसेंबर 2006 मध्ये घडलेल्या या घटनेने लोकांना हादरवून सोडले होते. ही एक अशी घटना होती जी जगासमोर येताच देशभरात खळबळ उडाली होती. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी देशाच्या कानाकोपऱ्यातून होऊ लागली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सीबीआयने तपास सुरू केला होता.

ADVERTISEMENT

मोनिंदरसिंग पंढेर याचे घर क्रमांक D-5 कोण विसरू शकेल. याच घरात मानवाच्या रूपात असलेल्या सैतानांना एक-दोन नव्हे तर 17 मुलांना मारून घरात पुरले होते, हे कोण विसरेल. या घरात राहणारे नरपिशाच्च  गावातील निरागस मुलांना कुठल्या ना कुठल्या बहाण्याने आपल्याकडे बोलावत असत. यानंतर त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्ये करून क्रौर्याची परिसीमा ओलांडून त्यांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून नाल्यात फेकून देत असत. या घराचा मालक आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली यांनी सैतानही लाजेल असे कृत्य केले. निष्पाप मुलांना घरात नेऊन त्यांच्याशी गैरवर्तन करणे, नंतर गळा आवळून त्यांची हत्या करणे. एवढ्यावरही त्यांचे समाधान झाले नाही, तर त्याच्या मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे शिजवून खाल्ल्यानंतर काही भाग घरामागील नाल्यात फेकून देणे असे भयावह कृत्य केले. हे भयानक हत्याकांड दीड वर्षांहून अधिक काळ सुरू होते. परंतु डिसेंबर 2006 मध्ये बेपत्ता झालेल्या एका मुलीच्या तपासादरम्यान कोलीने तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.

आता यावर आधारित असलेला हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट बघण्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

13 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT