काही लघुपट अतिशय कमी वेळात पूर्ण लांबीच्या चित्रपटांपेक्षाही प्रभावी संदेश देत मनामनांत घर करतात. नात्यांच्या धाग्यांची वीण जितकी घट्ट असते, तितकं ते नातं अधिक दृढ आणि विश्वासपात्र ठरतं. गुढीपाडव्यानिमित्त अशाच नाजूक नात्यांच्या प्रेमाची कथा कॉटनकिंगच्या सहाय्यानं प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अद्भुत क्रिएटीव्हजच्या मोनिका धारणकर लिखित आणि वैभव पंडित दिग्दर्शित ”कम्फर्ट नात्यांचा” हा लघुपट नात्यांची सांगड घालत एक महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. तर याशिवाय प्रथमच पाहायला मिळणार यशोमन आपटे (Yashoman Apte), मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh), सुयश टिळक (Suyash Tilak), निवेदिता सराफ (Nivedita Saraf) आणि भरत जाधव (Bharat Jadhav) यांचं अफलातून समीकरण.
बाप लेकीच्या नात्याची हळवी बाजू

कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये बाप लेकीच्या नात्याची (Father Daughter Relation) बात काही औरच असते. अशी बाप लेकीची कथा ‘कम्फर्ट नात्यांचा” या लघुपटात सांगण्यात आली आहे. मुलीसोबत आलेलं नवं नातं स्वीकार करताना वडिलांच्या मनातील भाव अत्यंत सुरेखपणे सादर करण्यात आले आहेत. दोन पिढ्यांमधला फरक विनोदी ढंगात मांडून इतर नात्यांचे पदर यातून अलगद उलगड्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या लघुपटाच्या निमित्तानं भरत जाधव आणि निवेदिता सराफ ही जोडी एकत्र आली आहे. इतकंच नाही तर सगळ्यांची लाडकी मयुरी देशमुखदेखील या लघुपटामध्ये काम करत आहे. भरत जाधवचे काम म्हणजे नेहमीप्रमाणे धमाल तर निवेदिता सराफ यांनी नेहमीप्रमाणे सहज अभिनयाची छाप सोडली आहे. अनेक वर्षांनंतर आता पुन्हा एकदा निवेदिता सराफ काम करून लागल्या असून त्यांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच आहे. मालिकेतून घराघरात पुन्हा पोहचलेल्या निवेदिता सराफ या सध्या नाटक, लघुपट या सगळ्याच प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचा चाहतावर्गही नक्कीच आनंदी आहे. तर बरेच दिवसानंतर भरत जाधवही प्रेक्षकांसमोर लघुपटात येत असल्यामुळे मराठी प्रेक्षकवर्ग नक्कीच सुखावला आहे.
नाती सुटसुटीत राहिल्यास, कुटुंबही सुदृढ राहील

आजकाल नात्यांची फारच गुंतागुंत पाहायला मिळते. कोणालाही कोणाहीसाठी वेळ नाही. प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त. तर काहींना नात्यात गुंतून राहणं म्हणजे योग्य वाटत नाही. याच धर्तीवर हा सुंदरसा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या लघुपटात भरत जाधव, निवेदिता सराफ, यशोमन आपटे, मयुरी देशमुख, सुयश टिळक हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार आहेत. प्रत्येकाने आपापली भूमिका चोख बजावली आहे. ‘मद्रास कॅफे’, ‘लुका छिपी’ या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणारे मिलिंद जोग या लघुपटाचे डिओपी आहेत. तर या लघुपटाबाबत कॉटन किंगचे कौशिक मराठे यांनी सांगितले की, कपड्याप्रमाणे जर नाती ही जरा सुटसुटीत राहिली तर कुटुंब सदृढ राहील. खरं तर या वाक्यातच या लघुपटाचा सारांश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा या वेगळ्या लघुपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद लाभतो हे लवकरच कळेल. दरम्यान यातून नात्यांचा गुंता सुटायला मदत झाली तर नक्कीच या लघुपटाला यश मिळाले असं म्हणायला हरकत नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक