सफरचंद हे असं एक फळ आहे जे निरोगी आरोग्यासाठी दररोज खायला हवं. असं म्हणतात की, “An Apple a Day Keeps the Doctor Away” दररोज सफरचंद खाण्यामुळे अनेक आजार तुमच्यापासून दूर राहतात. थोडक्यात तुमचे आरोग्य तंदरुस्त होते आणि शरीराला पुरेसे पोषण मिळते. मात्र काही जणांना नेहमी सफरचंद सोलून खाणं फार आवडतं. असं करणं फार चुकीचं आहे कारण सफरचंदाच्या सालीत अनेक प्रकारची पोषक मुल्यं असतात.
फायबरयुक्त पदार्थ आणि फळं खाल्ल्यामुळे होणार फायदे (List of Fiber Rich Foods In Marathi)
लोक सफरचंद सोलून का खातात
आजकाल अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते. फळं आणि भाज्या टिकवण्यासाठी त्यांच्यावर केमिकल्सचा मारा केला जातो. सफरचंदावर ती टिकण्यासाठी मेणाचा थर लावला जातो. शिवाय कधी कधी कीटकनाशके मारलेली असतता. त्यामुळे अनेक लोक सफरचंद सोलून खाणं योग्य समजतात. मात्र सफरचंद सोलून खाणं म्हणजे त्यामधील सर्व पोषकमुल्य काढून मग ते खाण्यासारखं आहे. यासाठी सफरचंद सालीसकट खाणंच आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. मग मनातील शंका दूर करून सफरचंद खाण्याची योग्य पद्धत कोणती ?
कसं खावं सफरचंद
सफरचंद खाताना ते सालीसकट खाणं गरजेचं आहे. मात्र त्यावरील मेणाचा थर आणि कीटकनाशके जर तुमच्या पोटात गेली तर आरोग्य सुधारण्यापेक्षा बिघडण्याची शक्यता अधिक आहे. यासाठी सफरचंद खाण्याचा सोपा मार्ग म्हणजे ती स्वच्छ धुवा आणि कमीत कमी एक तास कोमट पाण्यात बुडवून ठेवा. ज्यामुळे सफरचंदावरील जीवजंतू आणि मेणाचा थर निघून जाईल आणि सफरचंद सालीसकट खाण्यासाठी योग्य होईल. सफरचंदामध्ये अधिक प्रमाणात फायबर्स, व्हिटॅमिन ए आणि सी, अॅंटि ऑक्सिडंट, फ्लेवोनाईड, अर्सेनिक अॅसिड, पोटॅशिअम, कॅल्शिअम, फॉलिक अॅसिड , लोह, फॉस्फरस असतात. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते, तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते, अनेक आजारापासून तुम्हाला मुक्ती मिळते. सहाजिकच दररोज आम्ही सांगितल्याप्रमाणे धुवून सालीसकट सफरचंद खा आणि निरोगी राहा.
हेल्दी लाईफसाठी प्या हे व्हेजीटेबल ज्युस (Vegetable Juice Recipes In Marathi)