गेल्या एक महिन्यापासून मालिकांचे चित्रीकरण विविध ठिकाणी सुरू आहे. मुंबईतील कोरोनाच्या () वाढत्या हाहाःकारामुळे अनेक निर्माते आणि अगदी कलाकारांनाही फटका बसला आहे. अनेक घरातील लोकांसाठी विशेषतः गृहिणींसाठी मालिका हा खरा विरंगुळा असतो. त्यामुळे परिस्थिती कोणतीही असो पण सध्या अनेक कलाकार ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अगदी कोरोना योद्ध्याप्रमाणेच काम करत आहेत असं म्हणावं लागेल. मालिका हा अनेक जणांसाठी सध्याच्या काळात विरंगुळ्याचा एक भाग झाला आहे. वर्क फ्रॉम होम, सतत घरात यामुळे नक्की करायचं काय असाही प्रश्न आहे. तर सगळेच घरात असल्यामुळे गृहिणींच्या डोक्याचाही ताप वाढलेला दिसून येत आहे. त्यांनाही विरंगुळ्याची आणि त्यांच्या आवडत्या मालिका बघायची गरज आहे.
‘आपल्या माणसांची काळजी घ्या’ मामाच्या निधनानंतर पुष्कर जोगचा भावूक व्हिडिओ व्हायरल
निर्मात्यांचा मुंबईबाहेर चित्रीकरणाचा निर्णय
या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच अनेक मालिकांच्या निर्मात्यांनी मुंबईतील चित्रीकरण बंद झाल्यानंतरही अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये अर्थात गोवा, बंगळूरू इथे जाऊन चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि अनेक कलाकारा यासाठी रवानाही झालेले दिसून आले होते. अनेक हिंदी मालिकांची स्टारकास्ट तर आधीच रवाना झाली होती. पण मराठी मालिकांच्या निर्मात्यांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत बाहेर चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. निर्माते आणि कलाकार यांचे नुकसान होणार ही एक गोष्ट आहेच. पण किती दिवस असंच काम थांबवणार हादेखील प्रश्न आहे. त्यामुळेच अनेक कलाकारही आपल्या जीवाची पर्वा न करता चित्रीकरणाला केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन कुठेही थांबू नये यासाठी अविरत काम करत आहेत. आपल्या माणसांपासून दूर राहून सध्या मालिकांचे चित्रीकरण पूर्ण करत आहेत.
कोरोना काळातील प्रेम’ म्हणत शिल्पाने हटके स्टाईलने केलं राज कुंद्राला किस
कोरोना काळातही तुफान मनोरंजन
कोरोना आहे म्हणून मालिका कुठेही थांबलेल्या नाहीत. सध्या प्रत्येक मालिकेमध्ये तुफान मनोरंजन आणि प्रेक्षकांसाठी रोज काही ना काही नवा मोड आणि कथानक, आशय या गोष्टी घडवून आणण्याचा निर्माते आणि लेखकांचा प्रयत्न दिसून येत आहे. कोणत्याही पहिल्या गोष्टींना धक्का न लावता अधिक धमाकेदार भाग घेऊन अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘आई कुठे काय करते’, ‘फुलाला सुगंध मातीचा’, ‘राजा रानीची गं जोडी’ या सगळ्याचा मालिकांचे कथानक सध्या मनोरंजक वळणावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक प्रकारे मनोरंजनाचा उत्सवच चालू आहे असं म्हणावं लागेल. या सर्व मालिकांमध्ये सध्या चाललेल्या घडामोडी या प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून सध्याच्या काळात मनोरंजनाचा हाच एक आधार प्रेक्षकांना उरला आहे. कारण सिरीज बघाणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. पण घरात काम करणाऱ्या आणि वरीष्ठ नागरिकांसाठी मालिका हाच मनोरंजनचा सध्याचा आधार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
काही जणांना आपण अजूनही किती बुरसटलेल्या विषयांच्या मालिका बघतो असं वाटत असलं तरीही घरातील अशी अनेक मंडळी असतात जी घरचे व्याप आणि डोक्याचा ताप बाजूला ठेऊन मालिकांमधील तापही आपलेच आहेत असं ओढवून घेत त्यांचेच एक होऊन जातात. मालिकांमधील कलाकारही घरातील एक व्यक्ती होऊन जाताना अनेक ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे सध्याच्या काळात ‘शो मस्ट गो ऑन’ हेच धोरण कलाकारांनी स्वीकारलेले दिसून येत आहे.
PUBG पुन्हा सुरु होणार, पण या नावाने
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक