ओठ हा चेहऱ्यावरील असा भाग आहे ज्याकडे सगळ्यात आधी लक्ष जाते. ओठांचा रंग, ओठांचा आकार किंवा ओठ सुंदर असतील तर तुमचा लुकही चांगला उठून दिसतो. लिपस्टिक लावणे हे सगळ्या महिलांना आवडत असले तरी देखील ओठ खराब होऊ नये यासाठीही आपण विशेष काळजी घेतो.पण बाहेर जाताना नुसते लिप बाम लावून जाता येत नाही. अशावेळी तुमच्या ओठांसाठी जर काही परफेक्ट हवे असेल तर तुम्ही कॉम्बो लिप बाम वापरण्यास काहीच हरकत नाही. हल्ली बाजारात असे काही लिप बाम मिळतात. ज्यामुळे तुमच्या ओठांचे आरोग्य चांगलेही राहते आणि लिपस्टिकसारखी एक शेड्ही तुमच्या ओठांना मिळते. शिवाय आम्ही निवडलेले हे प्रॉडक्टही ऑर्गेनिक आहेत. चला जाणून घेऊया कॉम्बो लिप बाम जी आहेत आर्गेनिक
ORGANIC LIP CARE COMBO
कधी कधी ओठांना खूप काही लावून बाहेर पडायचं नसतं. थोडासा हलकासा ओलावा किंवा गुलाबी रंग हा पुरेसा असतो. अशावेळी तुम्हाला हा ऑर्गेनिक लिप केअर कॉम्बो (ORGANIC LIP CARE COMBO) वापरता येईल. हा एक कॉम्बो असून यामध्ये तुम्हाला तीन वेगवेगळ्या फ्लेवरचे लिप बाम मिळतात. लिची,शिआ बटर आणि हिबिसकरचे गुण असलेल्या या लिप बाममध्ये ऑर्गेनिक ऑईल्स असल्यामुळे ओठ कोरडे होत नाहीत. शिवाय ओठांवरील मॉईश्चर आणि रंग टिकून राहतो. विशेष म्हणजे हे केवळ महिलांसाठीच नाही तर पुरुषांनादेखील हे लिप केअर कॉम्बो वापरता येतात.
ORGANIC LIP BUTTER COMBO
लिप बाम साधारणपणे गोलाकार आकाराचे असतात. पण तुम्हाला जर लिपस्टिक स्वरुपात काही हवे असेल तर तुम्ही ऑर्गेनिक लिप बटर कॉम्बो वापरायला हवे. यामध्ये तुम्हाला रोझ, लिली, लव्हेंडर असे तीन सुंगध आणि गुणधर्म असलेले लिप बटर स्टिक मिळतील. हे लिप बटर लावणे खूपच सोपे जाते. अगदी लिपस्टिक लावल्याप्रमाणे याचा वापर करावा लागतो. हे प्रॉडक्ट तुमच्या ओठांना जास्त काळासाठी मॉईश्चराईज करण्यास समर्थ आहे. 100% ऑर्गेनिक असलेले हे प्रॉडक्ट ओठांना कोणतेही नुकसान करत नाही. उलट ओठांना अधिक सुदंर करते.
LAVENDER LIP BUTTER 4GM + STRAWBERRY LIP BALM 3GM
काही जणांना काही खास फ्लेवर किंवा सुंगध आवडतात. स्ट्रॉबेरी आणि लव्हेंडर असे फ्लेवर आवडणाऱ्यांसाठी हे कॉम्बो खूपच उत्तम आहेत. या दोन्ही लिप बामचे रंग अगदी कोणत्याही स्किनटोन असणाऱ्या व्यक्तिंन उठून दिसतात. स्ट्रॉबेरीचा हलकासा गुलाबी रंग आणि लव्हेंडरचा थोडी निळी पण ओठांवर लावल्यानंतर आलेला एक वेगळा शेड तुमच्या ओठांना खूप छान उठून दिसतो. प्रवासात कॅरी करण्यासाठी आणि सहज लावण्यासाठी हे कॉम्बो चांगले आहे. तुम्ही पटकन लिपस्टिकप्रमाणे याचा स्ट्रोक फिरवला की, तो ओठांवर सुंदरच दिसतो.
ORGANIC 5 IN 1 LIP BALM – 10GM
आपल्या आवडीनिवडींचे कधीही काहीही सांगता येत नाही. आपल्याला एकावेळ अनेक गोष्टी करण्याची सवय असते. त्यामुळे लिपस्टिक असो किंवा कपडे एखादा प्रकार आपल्याला कधीच पुरेसा होत नाही. (पुरेशा पडणाऱ्या व्यक्ती या विरळाच असतील) असांसाठी आहे हा ऑर्गेनिक हार्वेस्टचा हा बेस्ट कॉम्बो. यामध्ये एकाचवेळी पाच वेगवेगळे लिप बाम तुम्हाला मिळतील. तुमच्या ओठांची कोणतीही समस्या असली तरी देखील हे लिप बाम तुमची कोणतीही समस्या सोडवण्यासाठी फायदेशीर आहे. सुकलेले ओठ, फाटलेले ओठ, काळवंडलेले ओठ अशा सगळ्या समस्यांवरील हा लिप बाम समाधान आहे. यामध्ये तुम्हाला 5 शेड मिळतात. गुलाबी, गडद गुलाबी, कॉफी न्यूड, हाय ग्लॉस, लाल असे शेड मिळतात. जे तुमच्या प्रत्येक मूडसाठी एकदम योग्य आहेत.
LILY LIP BUTTER 4GM + STRAWBERRY LIP BALM 3GM
ओठांना अगदी हलकासा गुलाबी रंग लावायला तुम्हाला आवडत असेल तर ऑर्गेनिक हार्वेस्टचे हे प्रॉडक्ट तुमच्यासाठी उत्तम आहे. हा एक कॉम्बो किट असून यात एक लिली लिप बटर आणि स्ट्रॉबेरी लिप बाम आहे. हे दोन्ही प्रॉडक्ट तुमच्या त्वचेवर एक सुरक्षा कवच तयार करतात. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो. रंगासोबत तुमच्या ओठांची सुरक्षा यामध्ये राखली जाते. ओठांना मॉश्चराईज करण्यासोबतच तुमच्या ओठांवरील रंग टिकवण्याचे काम ते करते. त्यामुळेच हा लिप बाम कॉम्बो वेगळा ठरतो.
आत तुमच्या ओठांना थोडासा आपलेपणा दाखवण्यासाठी या प्रॉडक्टसना नक्की निवडा.