ADVERTISEMENT
home / मनोरंजन
वरूण धवननंतर आता श्रद्धा कपूर अडकणार लग्नाच्या बंधनात

वरूण धवननंतर आता श्रद्धा कपूर अडकणार लग्नाच्या बंधनात

वरूण धवन आणि नताशा दलाल 24 जानेवारीला लग्नाच्या बंधनात अडकले. ज्यामुळे चाहत्यांना खूप दिवसांनी बॉलीवूडमध्ये सेलिब्रेटीजच्या लग्नाची धूम पाहायला मिळाली. वरूणच्या लग्नाचा थाटमाट अलिबागच्या एका मोठ्या रिसॉर्टमध्ये घालण्यात आला होता. कोरोनामुळे लग्नासाठी अतिशय कमी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र लग्नाच्या शाही थाटात कोणतीही कमतरता करण्यात आली नव्हती. लग्नानंतर लगेचच मीडियावर वरूणच्या लग्नाचे फोटो व्हायरल होऊ लागले. या फोटोंवर शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरने एक पोस्ट शेअर केली. ज्यामुळे आता श्रद्धाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

लग्नाच्या शुभेच्छांवर वरूणने रोहनला दिला हा रिप्लाय

श्रद्धा कपूरने वरूण धवन आणि नताशाला लग्नासाठी शुभेच्छा देत एक इन्सा स्टोरी शेअर केली होती. ज्यावर तिचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठ याने कंमेट केलं होतं की, “वीडी आणि नट्सला लग्नासाठी शुभेच्छा,जेव्हा तुम्हाला कळतं आणि समजू लागतं तुम्ही भाग्यवान आहात, वीडी तू खूप भाग्यवान आहेस” वरूणनेही या शुभेच्छा स्वीकारत रोहनला रिप्लाय दिला होता की, “मी खरंच भाग्यवान आहे! मला आशा आहे की तुही यासाठी तयार आहेस” वरूणने रोहनच्या या कंमेटवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आता बॉलीवूडमधलं पुढचं लग्न श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ यांचं असणार अशी चर्चा सुरू झाली आहे. मागच्या वर्षीदेखील या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं मात्र या कंमेटमधून आता चाहत्यांना एक हिंट नक्कीच मिळाली आहे. वरूण धवन, श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ हे तिघंही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. वरूण आणि श्रद्धा तर एकमेकांना शालेय जीवनापासून ओळखतात. दोघांनी एकत्र अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. ज्यामुळे त्यांच्या मैत्रीचं बॉडिंग चित्रपटात आणि खऱ्या आयुष्यात असं दोन्हीकडे पाहायला मिळतं. एखाद्या जीवलग मित्राच्या लग्नानंतर मित्रमैत्रीणीही त्यांच्या लग्नाचा निर्णय घेण्यासाठी तयार होतात असं नेहमीच पाहायला मिळतं. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता वरूणची बेस्ट फ्रेंड श्रद्धाकडे लागल्या आहेत. शिवाय जर वरूण धवनने कंमेटमध्ये खुलेआम असा रिप्लाय दिला आहे ज्यामुळे श्रद्धाच्या लग्नाची चर्चा खरी असण्याची शक्यता आहे. 

Instagram

ADVERTISEMENT

लग्नाबाबत काय म्हणाली श्रद्धा कपूर

श्रद्धाने मात्र याबाबत अजूनही कोणता खुलासा केलेला नाही. तिने तिचं रोहनसोबत असलेले नातं खूपच खाजगी  ठेवलं आहे. मात्र ती बऱ्याचदा रोहनसोबत बाईक राईड आणि इतर कार्यक्रमात दिसत असते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा अजून लग्नासाठी तयार नाही. कारण मागे तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिच्याकडे खूप चित्रपट आहेत. कामात बिझी असल्यामुळे तिच्याकडे लग्नासाठी सध्या वेळ नाही. शिवाय तिला आता तिच्या अभिनय, डान्स यावर फोकस करायचं आहे. ज्यामुळे श्रद्धा कपूरचं लग्न ही एक अफवा असण्याचीही शक्यता आहे. श्रद्धाचे वडील आणि अभिनेता शक्ती कपूर यांनीही एका मुलाखतीत त्यांच्या मुलीच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. ते म्हणाले होते की प्रत्येक वडिलांना त्यांच्या  मुलीचं लग्न थाटामाटात आणि एका चांगल्या कुटुंबात व्हावं असं वाटतं. ज्यामुळे त्यांना रोहन श्रेष्ठबाबत नेमकं काय वाटतं हे समजू शकलं नव्हतं. आता वरूणची प्रतिक्रिया खरी असेल तर श्रद्धाच्या लग्नाची धामधुम पाहायला मिळेल नाहीतर ही एक अफवा आहे असंच समजावं लागेल. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

अंकिता लोखंडेने गुपचूप केला मेंदी सोहळा, लवकरच करणार लग्न

ADVERTISEMENT

#tinypanda – सिद्धार्थ – मितालीच्या लग्नाची धूम, खास क्षण

चाहत्यांना धक्का, लवकरच बंद होणार ‘दी कपिल शर्मा शो’

27 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT