गायक श्रेया घोषाल ही लवकरच आई होणार आहे. नुकताच तिचा डोहाळ जेवण सोहळा पार पडला. पण सध्याची परिस्थिती पाहता तिने तिचा हा डोहाळ सोहळा ऑनलाईन पद्धतीने साजरा केला आहे. श्रेयाच्या खास मैत्रिणींनी तिच्यासाठी हा सोहळा खूपच चांगला केला आहे असे दिसत आहे. कारण श्रेयाने हे फोटो शेअर करत तिच्या आनंदाची पोचपावती शब्दांच्या रुपातून मांडली आहे. काही दिवसांपूर्वीच श्रेयाने तिच्या प्रेग्नंसीची माहिती दिली होती आणि आता डोहाळजेवणाचे फोटो टाकल्यामुळे ती लवकरच आई होणार याचा आनंद तिच्या चाहत्यांनीही झाला आहे. तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो एकदम खास असून तुम्हालाही ते नक्की आवडतील.
प्रीती झिंटाही आई होणार असल्याची चर्चा
ऑनलाईन पद्धतीने झाले डोहाळ जेवण
सध्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे बऱ्याच सोहळ्यांवर बंदी आणि निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे श्रेयाने घरीच राहून ऑनलाईनपद्धतीने हा सोहळा पार पडला. श्रेयाला तिच्या मैत्रिणींनी चांगलेच सरप्राईज दिले आहे असे तिच्या पोस्टवरुन दिसत आहे. श्रेयाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, जेव्हा तुमची मैत्रिणी दूर असूनही तुमचे लाड करण्याची एकही संधी सोडत नाही आणि त्यांनी हाताने बनवलेल्या वस्तू जेव्हा थाळीत येतात. तेव्हा आनंद होतो. ऑनलाईन असलो तरी आम्ही खूप धमाल केली. तिने तिच्या मैत्रिणीलादेखील या पोस्टमध्ये टॅग केले आहे. तिच्या या पोस्टलाही सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महात्मा जोतीराव फुलेंचा ‘सत्यशोधक’ रुपेरी पडद्यावर
श्रेयाने ऑनलाईन स्क्रिनशॉट केले शेअर
श्रेयाने ही पोस्ट शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या मैत्रिणींसोबत बोलताना दिसत आहे. श्रेयाच्या ताटात बंगालीपद्धतीचे जेवण ताटात वाढलेले दिसत आहे. बंगालीपद्धतीचे हे जेवण श्रेयाने तिच्यापुढे ठेवले आहे. त्यामध्ये वेगवेगळे जिन्नस दिसत आहेत. हे काही पदार्थ ओळखता येत नसेल तरी देखील ते चमचमीत दिसत आहेत यात काही शंका नाही. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये हातात मॉम टू बी अशी पाटी हातात घेतली होती. तिने मॉम टू बीचा सॅश घातला असून तिच्या चेहऱ्यावर तेज पाहायला मिळत आहे.
आयुष्यात आला आनंद
श्रेयाने नवीन वर्षातील मार्च महिन्यात ही गोष्ट तिच्या फॅन्सपर्यंत पोहोचवली होती. तिने तिच्या बेबी बंपसह फोटो शेअर केला होता. त्यावेळी तिच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.सगळ्या सेलिब्रिटींनी तिच्या आनंदात सहभागी होऊन तिला कमेंटसमधून शुभेच्छा दिल्या होत्या. श्रेया घोषाल 2015 साली शैलादित्य मुखोपाध्याय याच्यासोबत विवाहबंधनात अडकली. लग्नाच्या तब्बल 6 वर्षानंतर या दोघांच्या आयुष्यात आनंद आला आहे.
या मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईला ‘बाय बाय’
संगीतात अव्वल कामगिरी
श्रेया घोषाल ही संगीत क्षेत्रातील मातब्बर असे नाव आहे. तिने अनेक भाषांमधील प्रसिद्ध अशी गाणी गायली आहेत. तिची गाणी जगभरात प्रसिद्ध आहे. तिने मराठी, इंग्रजी, हिंदी, बंगाली, तेलगु अशा विविध भाषेत गाणी गायली आहेत. तिला तिच्या संगीतासाठी अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. त्यामुळे श्रेया घोषाल हे नाव प्रसिद्ध आहे.
आता श्रेया घोषालचा बेबी शॉवरचे हे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या तान्हुल्याची सगळ्यांना प्रतिक्षा आहे