ADVERTISEMENT
home / मनोरंजन
shreyas-talpade-to-play-former-prime-minister-atal-bihari-vajpayee-in-kangana-ranauts-emergency-in-marathi

मराठमोळ्या श्रेयसने पटकावली ‘इमर्जन्सी’ मध्ये अटलबिहारी वाजयपेयींची भूमिका

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranuat) सध्या आपला आगामी चित्रपट इमर्जन्सीच्या चित्रीकरणात व्यस्त आहे आणि या चित्रपटासाठी तिचा इंदिरा गांधीचा लुक हा अत्यंत चर्चेचा विषय बनला आहे. तर नुकताच या चित्रपटामध्ये मराठमोळ्या श्रेयसचीदेखील (Shreyas Talpade) दमदार एन्ट्री झाली असल्याचे दिसून येत आहे. श्रेयसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत या चित्रपटामध्ये अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची भूमिका साकारत असल्याचे घोषित केले आहे. तर कंगनानेदेखील श्रेयसचा हा लुक शेअर केला आहे, ‘श्रेयस तळपदे इमर्जन्सीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेतून प्रस्तुत करत आहोत. एक खरे राष्ट्रभक्त, ज्यांचे राष्ट्रावर अत्यंत प्रेम होते आणि अभिमानही होता आणि इमर्जन्सीच्या वेळी एक प्रभावी तरूण नेता म्हणून नावाजले जात होते’ असे कॅप्शन लिहित ओळख करून दिली आहे. 

खऱ्या देशभक्ताची भूमिका करताना सन्मान झाल्यासारखे वाटत आहे

श्रेयसने आपल्या नव्या लुकचे पोस्टर शेअर करताना भावना व्यक्त केल्या आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले की,
‘बाधाएं आती हैं आएं
घिरें प्रलय की घोर घटाएं,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएं,
निज हाथों में हंसते-हंसते,
आग लगाकर जलना होगा।
कदम मिलाकर चलना होगा।
– अटलजी.
सर्वात प्रसिद्ध आणि लोकांचे आवडते असे नेते, दूरदर्शी, खरे देशभक्त आणि लोकांचे नेते असणाऱ्या अशा अटलजींची भूमिका साकारताना मला सन्मान मिळाल्यासारखे वाटत आहे आणि मी खूपच आनंदी आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी, मला आशा आहे की, मी अपेक्षा पूर्ण करू शकेन’

तर आपल्याला हा चित्रपट दिल्याबद्दल श्रेयसने कंगनाचेही आभार मानले आहेत, ‘कंगना रनौत मला अटलजींची भूमिका देण्यासाठी धन्यवदा. तुम्ही नक्कीच आपल्या देशातील सर्वात प्रतिभाशाली आणि वैविधत्या दाखवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहात. पण तुम्ही एक चांगल्या दिग्दर्शिकादेखील आहात. इमर्जन्सीची ही वेळ आहे. गणपतीबाप्पा मोरया’. श्रेयसचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहत्यांनाही आवडत आहे. सध्या श्रेयस ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत काम करत असून प्रेक्षकांना ही मालिका खूपच आवडत आहे. 

जेपी नारायण साकारणार अनुपम खेर 

याशिवाय जे पी नारायण यांच्या भूमिकेत अनुपम खेर दिसणार आहेत. याचेही पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. कंगना आणि अनुपम खेर यांचे लुक खूपच व्हायरल झाले आहेत. तर श्रेयसचा हा लुकही प्रेक्षकांना प्रभावित करत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आता प्रेक्षक वाट पाहात आहेत. 25 जून, 2023 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर कंगना या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. इतकंच नाही तर कंगनाचे प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिकाच या चित्रपटाची निर्मिती करत आहे. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणासह अन्य पोस्टर आणि प्रॉडक्शनची तयारीही चालू असल्याचे दिसून येत आहे. मात्र या पोस्टरनंतर नक्कीच प्रेक्षकांच्या अपेक्षा या चित्रपटाकडून उंचावल्या आहेत. तर अटल बिहारी वाजयपेयींच्या भूमिकेत श्रेयस काय कमाल करणार हेदेखील पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

27 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT