सचिन पिळगावर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी अशी केवळ ओळख न ठेवता आपल्या मेहनतीने आणि आपल्या अभिनयाने अनेक वेबसिरीजमधून ओळख निर्माण करणारी श्रिया पिळगावकर आता अॅक्शन स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. श्रियाने आतापर्यंत अनेक वेबसिरीजमधून काम केले आहे. तसंच श्रिया नेहमीच सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. श्रियाचा मोठा फॅन फॉलोईंग आहे. श्रियाने खरंतर आपल्या अभिनयाने आतापर्यंत एंटरटेनमेंटच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर आपली ओळख निर्माण केली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘द गॉन गेम’ मधील श्रियाच्या कामाची खूपच प्रशंसा होत आहे. इतकंच नाही तर याचं चित्रीकरण हे लॉकडाऊनदरम्यान घरातूनच करण्यात आले आहे. लॉकडाऊनदरम्यानही श्रियाने एका वेगळ्या प्रोजेक्टवर काम करायला सुरूवात केली आणि आता अचंबित करणारे स्टंट्स करताना श्रियाला प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
दोन वर्षांच्या आत ‘कसौटी जिंदगी की’ मालिका गुंडाळणार गाशा
लवकरच होणार ‘क्रॅकडाऊन’ प्रदर्शित
लॉकडाऊनदरम्यानही श्रिया या सिरीजसाठी खास प्रशिक्षण घेत होती. ‘क्रॅकडाऊन’ मध्ये श्रिया खतरनाक स्टंट्स करताना दिसणार आहे. हा शो एक थ्रिलर मिस्ट्री असून यासाठी श्रियाला खास तयारी करावी लागली. एका मुलाखतीमध्ये श्रियाने सांगितले की, ‘क्रॅकडाऊनचा मी एक भाग आहे त्यामुळे मी खूपच उत्साहित आहे. कारण मला अॅक्शन थ्रिलर खूपच आवडतात आणि मला अशा जॉनरमध्ये काम करण्याची मनापासून इच्छा होती. मी एक महिना अॅक्शन टीमसह प्रशिक्षण घेत होते आणि या सगळ्या मूलभूत गोष्टींवर लक्ष देणे माझ्यासाठी खूपच गरजेचे होते. या शो मध्ये जास्त सीनमध्ये अॅक्शन करताना दिसेन त्यामुळे मला प्रशिक्षणावर जास्त लक्ष केंद्रीत करावं लागलं.’ श्रियाने पुढे असंही सांगितलं की, ‘माझ्यासाठी हे अजिबातच सोपं नव्हतं. अपूर्वा आणि अॅक्शन दिग्दर्शक जावेद सर यांचे मला मनापासून आभार मानायचे आहेत की, त्यांनी माझ्याकडून हे सहजतेने करून घेतलं. मी पहिल्यांदाच असे काम करत असल्याने मला यावर जास्त काम करावं लागेल हे मला माहीत होतं. कारण मला यामध्ये कुठेही चुकायचं नव्हतं. मला अभिनय खूपच आवडतो कारण यामध्ये स्वतःला बदलण्याचा आणि नव्या गोष्टी शिकण्याची संधी सतत मिळत असते.’ श्रियाच्या या शो ची सगळेच आतुरतेने वाट बघत आहेत. कारण आतापर्यंत काम केलेल्या सिरीजमध्ये श्रियाने आपल्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकून घेतली आहेत.
दीपिका पादुकोण गोव्याला रवाना, या आगामी चित्रपटाचं शूटिंग होणार सुरू
साकिब सलीमसोबत श्रिया दिसणार
अपूर्वा लाखियाच्या या थ्रिलरमध्ये साकिब सलीमसह श्रियाने काम केले आहे. ही सिरीज एका मिशनसंदर्भात आहे जे एका मोठा राष्ट्राच्या सुरक्षेविरुद्ध करण्यात आलेल्या कटाविरुद्ध खुलासा करण्याबाबत आहे. या सिरीजमध्ये श्रिया एका महाराष्ट्रीयन दिव्या नावाच्या मुलीची भूमिका साकारत असून तिला एका मिशनमध्ये सामावून घेतलं जातं अशी कथा आहे. पहिल्यांदाच श्रिया अशा तऱ्हेच्या अॅक्शनमध्ये दिसणार आहे. त्यामुळे श्रिया आणि तिचे चाहते दोघेही यासाठी अत्यंत उत्साही आहेत. याआधी श्रियाने वेगवेगळ्या भूमिका केल्या असून ‘मिर्झापूर’ मधील भूमिकेसाठी तिची खूपच प्रशंसा झाली होती. त्यामुळे दुसऱ्या भागातही श्रियाने असायला हवं असं प्रेक्षकांना वाटत होतं. पण आता ही ‘क्रॅकडाऊन’ सिरीज लवकरच प्रदर्शित होणार असून श्रियाला यामधून कसा प्रतिसाद मिळत आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
रियाच्या जामिनावर आज विशेष कोर्टात सुनावणी, एक रात्र काढली तुरुंगात
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा