अभिनेत्यासाठी वर्क फ्रॉम होम काय असतं ते दाखवून दिलं आहे अभिनेता सिद्धार्थ जाधवने. कोरोनामुळे सिद्धार्थ आपल्या घरात राहून आपल्या कुटुंबाला वेळ देत आहे. शिवाय तो त्याच्या जुन्या आठवणींनाही उजाळा देत आहे.पण घरी राहून सिद्धार्थ आपल्यातले टॅलेंट तरी कसे लपवेल. विनोदाचा भाग म्हणून आणि त्याच्या सोशल मीडियाची एक पोस्ट म्हणून त्याने त्याच्या फॅन्ससाठी एक मस्त रापचिक रॅप गायले. घरात बसूनच त्याने हे रॅप रेकॉर्ड करुन त्याच्या फॅन्ससाठी पोस्ट केले. हा रॅप व्हिडिओ आता वायरल होऊ लागला आहे.
काय आहे सिद्धार्थचा रॅप
सिद्धार्थने साधारण जून महिन्यामध्ये ही पोस्ट शेअर केली आहे. साऊथ इंडियन बीट्सवर मराठी लिरीक्सचा तडका दिला आहे. हे रॅप मोठे नसले तरी मजेशीर आहे. मुळात सिद्धार्थने त्याला मजेशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्धार्थने हे रॅप स्वत: लिहिले नाही तर त्याला हे लिहून दिलेले आहे. पण या व्हिडिओमध्ये त्याने केवळ एकच कडवं गायलं आहे. त्यामुळे याचा पुढील भाग येणार का? किंवा हा त्याच्या प्रोजेक्टचा भाग आहे हे अद्याप कळलेले नाही. पण हे रॅप गाताना पाहून सिद्धार्थ फारच मजेशीर दिसत आहे यात काही शंका नाही.
सलमान खान फार्महाऊसवर करत आहे शेती, भर पावसात चालवला ट्रॅक्टर
सिद्धार्थ करत असतो मस्त व्हि़डिओ
सिद्धार्थ आणि त्याची बायको तृप्ती लॉकडाऊनमध्ये मस्त मजेशीर व्हिडिओ बनवत आहेत. टिकटॉक बॅन करण्यापूर्वी हे कपल टिकटॉकवर अॅक्टिव्ह असायचे. त्यांनी टिकटॉकवर अनेक विनोदी व्हिडिओ केलेले आहेत.ते देखील सिद्धार्थच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतात.
टीव्ही जगत गाजवलेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री सध्या आहेत गायब
सिद्धार्थ संगीताची आहे विशेष आवड
सिद्धार्थने रॅप सादर केल्यानंतर वर्ल्ड म्युझिक डेच्या निमित्तानेही एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सिद्धार्थ चक्क रोमँटिक गाणं गात आहे.त्याचा हा व्हिडिओ त्यांने धुरळा चित्रपटाच्या प्रमोशनवेळी केला असावा असे दिसत आहे.पण या व्हिडिओमध्ये सिद्धार्थचा सूर छान जुळला आहे.
लग्नानंतर परदेशात स्थायिक झाले ‘हे’ मालिकांमधील कलाकार
हिंदीतही मिळाली संधी
अनेकदा मराठी कलाकारांना हिंदीत चांगली संधी मिळाली की, त्यांना अधिक प्रसिद्धी मिळते. सिद्धार्थ आधीच मराठीतील सुपरस्टार आहे. पण त्याच्या प्रसिद्धीत आणि फॅन्समध्ये भर पडली ती, रणवीर सिंहसोबत केलेल्या ‘सिंबा’ या चित्रपटामुळेही. त्याच्या पाठीवर उत्तम अभिनयाची थाप पडली. सिद्धार्थ या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्यामुळे सगळ्यात मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट होती.
आता सिद्धार्थचा हा रापचिक रॅप ऐकून तुम्हालाही ती ऐकायची इच्छा असेल तर असं काहीतरी क्रिएटिव्ह तयार करा.