आपल्यापैकी बऱ्याच जणांना कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. कारण बऱ्याच जणांना खाल्ल्यानंतर घशात घास अडकतो. मग अशावेळी आपण पटकन पाणी पितो. पण तुम्हाला माहीत आहे का? कधीही फळं आणि सलाड खाल्ल्यानंतर पाणी पिणं हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. वाचून थोडं आश्चर्य वाटत असेल ना? पण हे खरं आहे. खरं तर हे पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला बऱ्याचदा पोट खूप भरल्यासारखं वाटतं किंवा फुगल्यासारखं वाटतं त्याला कारणीभूत ठरतं ते तुमचं लगेच पाणी पिणं. आयुर्वेदानुसारदेखील कच्ची भाजी अथवा फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं हे योग्य नाही. असं करण्याची सवय असल्यास ब्लोटिंगची समस्या निर्माण होते हे लक्षात घ्या. याव्यतिरिक्त तुमच्या आरोग्यासाठी हे कसं योग्य नाही हेदेखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्ही त्वरीत पाणी प्यायल्यास नक्की कोणकोणत्या त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागतं हे आपण पाहूया –
जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कोणते पदार्थ ठरतात फायदेशीर आणि घातक
1. पोटात गॅस निर्माण होतो
Shutterstock
तुम्हाला फळं आणि कच्च्या भाज्या खायला आवडत असतील तर हे चांगलंच आहे. पण त्यावर पाणी पिणं मात्र टाळा. कारण फळांमध्ये जास्त प्रमाणात फ्रूक्टोज आणि यीस्ट असतं. त्यामुळे फळांवर पाणी प्यायल्यास, पाणी आणि अॅसिड असा घोळ पोटात होतो आणि तुमच्या शरीरात यीस्टचा विस्तार होण्यास मदत होते. ज्यामुळे पोटामध्ये अधिक गॅस निर्माण होत आणि परिणामी तुमचं पोट फुगून दुखायला लागतं. आपण आतापर्यंत असं बऱ्याच वेळा केलंही असेल आणि पोटात दुखल्यानंतर नक्की का दुखलं याचं कारणही तुम्हाला माहीत नसेल. त्यामुळे आता हे कारण तुम्हाला कळलं आहे. तेव्हा सहसा फळं आणि कच्च्या भाज्या खाऊन पाणी पिण्याचा मोह आवरा. त्याने तुमच्या चांगल्या आरोग्यासाठीच फायदा होईल.
2. अतिसाराचा धोका उद्भवतो
आपल्या शरीराला साधारण दिवसभरात 8 ग्लास पाणी लागतं. आपण ते पितच असतो. पण फळामध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे फळं खाल्ल्यानंतर तुम्ही त्यावर पाणी प्यायलात तर अति पाण्याने तुम्हाला अतिसाराचा धोका उद्भवण्याची शक्यता असते. फळ खाल्ल्यानंतर किमान 10 मिनिट्स तरी तुम्ही पाणी पिऊ नये. कारण फळं पटकन पचतात. त्यामुळे थोडा अवधी जाऊ द्यावा आणि त्यानंतर पाणी प्यावं. या लहानसहान गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे कारण त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर लगेच होत असतो.
संध्याकाळी कधीही खाऊ नका हे पदार्थ नाहीतर वाढेल वजन
3. अतिप्रमाणात खाणं टाळा
Shutterstock
कोणतीही गोष्ट आवडते म्हणून ती अतिप्रमाणात खाणं हे नेहमीच टाळायला हवं. फळ अथवा कच्च्या भाज्यांच्या बाबतीही हे महत्त्वाचं आहे. हे पदार्थ खाऊन तुम्ही घटाघटा पाणी प्यायलात तर तुमचं पोट अधिक फुगतं, त्यात अधिक गॅस निर्माण होऊन तुम्हाला त्रास होतो. त्यामुळे अतिरेक करणं अर्थात फळं अथवा कच्ची भाजी अतिप्रमाणात खाणं टाळा.
4. पोट होतं जड
तुम्ही जेव्हा फळं खाता तेव्हा तुमच्या पोटात असणारे बॅक्टेरिया हे अधिक वेगाने कार्बनडाय ऑक्साईड निर्माण करतात. त्यामुळे जर फळांवर तुम्ही पाणी प्यायलात तर तुमचं पोट अधिक जड होतं आणि त्याचा तुम्हाला त्रास व्हायला लागतो. त्यामुळे हे शक्यतो टाळावं. पाणी हे शरीराला आवश्यक असेल तितकंच प्यावं. अन्यथा त्याचा तुमच्या शरीराला त्रासही होतो हे नेहमी लक्षात ठेवा.
उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ खाल्ले तर होऊ शकतो आरोग्यावर उलट परिणाम
5. चावून खाणं आवश्यक
Shutterstock/instagram
विज्ञानामध्ये आपल्याला लहानपणापासून एक घास 32 वेळा चावून खावा असा नियम शिकवण्यात आला आहे. पण सध्याच्या लाईफस्टाईलनुसार कोणालाच निवांत बसून खायला वेळ नसतो. पण असं करणं योग्य नाही. 32 वेळा चावणं शक्य नाही. पण किमान व्यवस्थित चावून तरी खाणं आवश्यक आहे हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवं. फळं आणि कच्च्या भाज्या विशेषतः व्यवस्थित चावूनच खायला हव्यात. कारण न चावता खाल्ल्यास, पोटात गॅस निर्माण होऊन तुम्हाला त्रास होतो. त्याशिवाय तुम्ही न चावता खाता आणि त्यावर पाणी पिता त्याचा अधिक दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होतो. पचायलादेखील जड जातं. त्यामुळे योग्य प्रमाणात फळं खावीत आणि त्यावर पाणी पिणं टाळावं.
POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन… त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल.
तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.