ADVERTISEMENT
home / आरोग्य
उन्हाळ्यात अति प्रमाणात खाऊ नका कलिंगड, होतात दुष्परिणाम

उन्हाळ्यात अति प्रमाणात खाऊ नका कलिंगड, होतात दुष्परिणाम

उन्हाळा सुरू झाला की शरीराला सतत पाण्याची गरज लागते. पाणी पिण्याचा कंटाळा असणारे हायड्रेट राहण्यासाठी फळं, फळांचा रस घेतात. कलिंगड, स्ट्रॉबेरी, टरबूज अशा पाणीदार फळांमुळे तहान लगेच भागते. शिवाय या फळांमुळे तुम्ही उन्हाळ्यात हायड्रेटदेखील राहता. कलिंगडामध्ये नव्वद टक्के पाणी असतं. कलिंगड खाण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल (Watermelon Benefits In Marathi) मात्र असं असलं तरी अति प्रमाणात कलिंगड मात्र कधीच खाऊ नका. कारण या फळामधून जरी तुमच्या शरीराला अनेक पोषक घटक मिळत असले तरी अति प्रमाणात कलिंगड खाण्याचे काही दुष्परिणामही तुम्हाला भोगावे लागू शकतात. यासोबतच वाचा आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi

रक्तातील साखर वाढते

कलिंगड हे एक हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं फळ आहे. सहाजिकच जर तुम्ही तहान भागवण्यासाठी अति प्रमाणात कलिंगड खाल्लं तर तुमच्या रक्तातील साखर वाढण्याची शक्यता आहे. मधुमेंहींनी तर याबाबत विशेष काळजी घ्यायला हवी. कारण कलिंगडामधून जरी तुमच्या शरीराला नैसर्गिक साखर मिळत असली तरी त्याचे अति प्रमाण मधुमेहींचा त्रास वाढवू शकतात. 

त्वचेच्या समस्या 

कलिंगडामुळे तुमचे शरीर आणि त्वचा हायड्रेट राहते. मात्र एका संशोधनात यामुळे काही लोकांना त्वचेच्या समस्या झाल्याचं आढळून आलं आहे. कलिंगडाचा रंग लाल असण्यासाठी त्यातील लायकपीन कारणीभूत असतं. हे एक अॅंटि ऑक्सिडंट असून त्यामुळे फळाला रंग प्राप्त होतो. मात्र अति प्रमाणात लायकोमीन तुमच्या शरीरात गेलं तर त्याचा तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होतो. जाणून घ्या Ushnata Kami Karnyache Upay | शरीरातील उष्णता कमी करण्याचे उपाय

पचनसंस्था बिघडते 

अति प्रमाणात कलिंगड खाण्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर चुकीचा परिणाम होतो. कारण कलिंगडामध्ये जास्त प्रमाणात फ्रक्टोज असतात. यामुळे तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण वाढते आणि आतड्यांना सूज येते. पचनाच्या समस्या, गॅस अथवा जुलाब हे अति प्रमाणात कलिंगड खाण्याचे दुष्परिणाम असू शकतात. 

ADVERTISEMENT

वजन वाढते

कलिंगड चवीला छान लागतं शिवाय उन्हाळ्यात त्यामुळे तहानही भागते. त्यामुळे काही जण उन्हाळ्यात जेवण स्किप करून फक्त कलिंगड खातात. त्यांना वाटतं असं केल्याने तुमचं वजन कमी होईल. मात्र अति कलिंगड खाण्यामुळे तुमचं वजन वाढू लागतं. यामागे कलिंगडामधील नैसर्गिक साखर कारणीभूत ठरते. 

शरीरात पाण्याचं प्रमाण वाढतं

कलिंगडामध्ये नव्वद टक्के पाणी असल्यामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाणं लोक पसंत करतात. मात्र त्यामुळे ओव्हर हायड्रेशन अथवा वॉटर इनटॉक्सिकेशनचा त्रास जाणवू शकतो. या स्थितीत तुमच्या शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक होते. सोडियमचे प्रमाण कमी आणि पाण्याचे प्रमाण लेव्हलपेक्षा जास्त वाढल्याने, शरीरात रक्ताचे प्रमाणही वाढते. ज्यामुळे पायाला सूज येणं, थकवा, किडनीच्या समस्या वाढू शकतात. यासाठी कलिंगड अति प्रमाणात खाऊ नका.

कलिंगड हे चवीला उत्तम आणि पाणीदार असलं तरी ते प्रमाणात खावं. कारण अति प्रमाणात कलिंगड खाणं शरीरासाठी मुळीच हिताचं नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
11 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT