आजच्या काळात केवळ महिलाच नाही तर पुरुषांनाही वॅक्सिंग करवून घेणे आवडते. प्रत्येकाला नितळ केसविरहित त्वचा हवी असते. म्हणूनच शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वॅक्सिंग केले जाते. हल्ली चेहेऱ्यावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी चेहेऱ्याचेही वॅक्सिंग केले जाते. सध्या नाकाचे केस काढण्याचा ट्रेंडही खूप वाढला आहे. काही काळापासून नाकाच्या वॅक्सिंगचा ट्रेंड वाढू लागला आहे. ज्यामध्ये नाकपुडीवर वॅक्स लावले जातो आणि ते सुकल्यानंतर काढले जाते ज्यामुळे नाकपुडीतील केस निघतात. हे सामान्य बॉडी वॅक्स प्रमाणेच कार्य करते. पण ते तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. नाकातील केस मुळापासून उपटले की मेंदूला जीवघेणा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. नाकातील केस काढल्याने तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे जाणून घ्या –
नाकाचे वॅक्सिंग म्हणजे काय
नाकाचे वॅक्सिंग हे नियमित वॅक्सिंगसारखेच असते. ज्यामध्ये नाकाच्या नाकपुडीत वॅक्स टाकले जाते. जेव्हा काही सेकंदात वॅक्स सुकते तेव्हा ते बाहेर काढले जाते. ही एक अतिशय वेदनादायक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये नाकातील केस मुळापासून काढले जातात. मात्र, आजकाल वेदनारहित पद्धतीने नाकातील केस काढण्याचे किटही बाजारात उपलब्ध आहेत.

नाकातील केस काढून टाकण्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात
नाकातील केसांचे दोन प्रकार असतात – मायक्रोस्कोपिक सिलिया जे म्युकसच्या फिल्टरेशनचे काम करतात आणि व्हिब्रिसा म्हणजे मोठे केस जे मोठ्या कणांना नाकात जाण्यापासून रोखतात. नाकातील वॅक्सिंग दरम्यान व्हिब्रिसा केस बाहेर काढले जातात, तेव्हा सभोवतालचे जंतू नाकातून आत जाण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग नाकाच्या त्रिकोणी भागावर परिणाम करू शकतो. नाकातून रक्त वाहून नेणार्या रक्तवाहिन्या या मेंदूतून रक्त वाहून नेणार्या रक्तवाहिन्यांना थेट जोडलेल्या असतात. त्यामुळे हे जंतू तुमच्या नाकातून थेट मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. तसेच मेंदूच्या मागच्या भागात जंतू पोहोचले तर त्यामुळे मेंदूवर सूज येऊ शकते. जरी असे होण्याची शक्यता कमी असली तरी जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर तुम्हाला अनेक गंभीर दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय नाकातील केसांना वॅक्स लावल्यास तेथील केस वाढण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे नाकपुडीतील संवेदनशील टिश्यूजचे नुकसान होऊ शकते.

नाकातील केस का महत्त्वाचे आहेत
जरी नाकातील केस दिसणे आपल्याला आवडत असले तरी ते आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. नाकातील केस हे संरक्षक थर म्हणून काम करतात कारण ते allergens ना नाकात प्रवेश करण्यापासून रोखण्यास मदत करतात. नाकातील केस काढल्याने सिझनल ऍलर्जी किंवा दमा असलेल्या व्यक्तीला ऍलर्जी होण्याची अधिक शक्यता असते. म्हणूनच नाकातील केस काढण्यासाठी चुकूनही हेअर रिमूव्हिंग क्रीम वापरू नका. हे हेअर रिमूव्हल क्रीम नाकपुड्यांमधील नाजूक त्वचा आणि श्लेष्मल पडद्याची हानी करू शकते. अशा क्रीममधून हानिकारक वायू उत्सर्जित होतात. ते जर आपल्या शरीरात गेले तर त्याने त्रास होऊ शकतो. नाकातील केस काढण्यासाठी वॅक्सिंग आणि प्लकिंग देखील टाळले पाहिजे. हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. जर तुम्हाला नाकातील केस आवडत नसतील तर तुम्ही बाहेर दिसणारे केस काळजीपूर्वक ट्रिम करू शकता. मात्र यादरम्यान धारदार कात्री वापरणे टाळावे. यामुळे नाकाला संसर्ग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो.
म्हणूनच नाकाचे वॅक्सिंग करणे किंवा इतर पद्धतीने नाकातील केस काढणे शक्यतोवर टाळायला हवे.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक