ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
हेडफोनमुळे कानांसह मेंदूवरही होताहेत दुष्परिणाम

हेडफोनमुळे कानांसह मेंदूवरही होताहेत दुष्परिणाम

प्रवास मोठा असो किंवा छोटा, हल्ली प्रत्येकाच्या कानात तुम्हाला हेडफोन दिसणारच. कारण तास-न्-तास हेडफोनचा वापर करणं सवयीचा भाग झाला आहे. तुम्हालाही हेडफोन वापराची सवय झाली असल्यास वेळीच सावध व्हा. दीर्घ काळापर्यंत हेडफोनचा वापर केल्यास तुमच्या कानांवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. शिवाय, शरीराच्या अन्य अवयवांसाठीही ही सवय हानिकारक ठरू शकते. 

कानांमध्ये होऊ शकतो संसर्ग 

मेट्रो, बस, गाडीमधून प्रवास करताना तास-न्-तास हेडफोनचा वापर केल्यास कानांमध्ये संसर्ग (Infection) होण्याची भीती असते. हेडफोन मित्रांनाही वापरण्यास देत असाल तर आपण संसर्ग एकमेकांना देत आहोत हे देखील लक्षात येऊ द्या. एखादी व्यक्ती 40 तासांपेक्षा अधिक वेळ हेडफोनवर 90 डेसिबलवर आवाज करून काही ऐकत असल्यास त्यांच्या कानातील मज्जातंतू मृत होण्याची शक्यता असते. 

(वाचा : उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी या पाच अन्नपदार्थांचं करा सेवन)

ADVERTISEMENT

मेंदूवर वाईट परिणाम 

सलग काही तास हेडफोनचा वापर केल्यास केवळ कानावरच नाही तर मेंदूवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. हेडफोनमधून उत्सर्जित होणाऱ्या चुंबकीय लहरींमुळे थेट मेंदूच्या पेशीवर वाईट परिणाम करू शकतात. हेडफोनच्या अधिक वापरामुळे डोके दुखणे, झोप कमी होणे, कान दुखणे, मानेच्या एखाद्या भागातून वेदनादायी कळा येण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

(वाचा : प्रेग्नेंसीदरम्यान ‘या’ मेकअप प्रॉडक्टचा चुकूनही करू नका वापर)

कमी ऐकू येणे

ADVERTISEMENT

हेडफोनच्या अधिक वापरामुळे कानांच्या ऐकण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते. सामान्यतः 90 डेसिबलपर्यंत आवाज ऐकण्याची कानांची क्षमता असते. पण हेडफोनच्या अधिक वापरामुळे हळूहळू श्रवणयंत्रांची क्षमता 40 ते 50 डेसिबलपर्यंत येऊन घसरते. काही प्रकरणांमध्ये बहिरेपण येण्याचीही शक्यता असते. 

हेडफोन सिंड्रोममुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होतात.

कानाला हादरे बसणे, कान जड होणे, कानातून आवज येणे, मोठ्या आवाजामुळे कानांवर ताण येणे अशा समस्या उद्भवल्यास तातडीनं डॉक्टरांकडे जाऊन कानांची तपासणी करून घ्यावी.

कान सुन्‍न होणे

ADVERTISEMENT

दीर्घ काळ हेडफोन लावून गाणी ऐकल्यास कान बधिर होऊ शकतात. त्याचबरोबर ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.

कानांची योग्य प्रकारे घ्या काळजी : 

– प्रवास किंवा एखाद्या वेळेस आवश्यकता नसल्यास हेडफोनचा वापर करणं टाळावे.

– सलग काही तास हेडफोनचा वापर करणं गरजेचं असल्यास 5 मिनिटे ते 10 मिनिटांचा विश्रांती देखील घ्यावी. 

ADVERTISEMENT

– चांगल्या क्वालिटीच्या हेडफोनचा वापर करावा. 

(वाचा : अतिविचार करण्याच्या सवयीमुळे आहात हैराण, करा ‘हे’ उपाय)

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

11 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT