एकमेकांबद्दल प्रेम तर आहे पण एकमेकांबाबत आदरच नसेल तर त्या नात्याला काय अर्थ आहे बरं? आपण अशा कितीतरी जोड्या पाहतो ज्यांच्याबाबत आपल्याला ही भावना दिसून येते. प्रेम तर आहे पण या जोड्या एकमेकांचा सन्मान मात्र करत नाहीत असंही कळतं. आपल्या नात्यामधील एकमेकांबाबत आदर कमी झालाय हे कसं काय कळणार? नात्यात विश्वास आणि आदर हा असायलाच हवा. नुसतं प्रेम असून चालत नाही. संसाराचा गाडा हाकताना आपण एकमेकांच सन्मान करतो की नाही हे कधी कधी पाहिलंच जात नाही. पण हे नक्की कसे जाणवते. याचीही काही लक्षणे असतात, जी तुम्हाला याबाबत जाणवून देतात. याबाबत आपण अधिक जाणून घेऊया –
एकमेकांबाबत काहीच भावना नसणे
तुम्ही कितीही भावनात्मक त्रासातून जात असलात, तुम्हाला कितीही त्रास होत असेल तरीही तुम्ही सांगितल्याशिवाय तुमच्या जोडीदाराचे तुमच्याकडे लक्षच जात नसेल. तर तुमचा जोडीदार तुमचा अजिबात सन्मान करत नाही हे लक्षात घ्या. तुमच्या भावनांना जर त्यांच्या आयुष्यात महत्त्वच नसेल तर तुम्हालाही योग्य मान तुमचा जोडीदार देऊ शकत नाही. तुमच्या भावनेप्रती सन्मान असणे म्हणजेच तुमच्याप्रती सन्मान असणे होय.
शांत झाल्यास
इतर सर्व व्यक्तींबरोबर असताना तुमचा जोडीदार मजेत असेल आणि बडबड करत असेल पण तुम्ही समोर येताच अचानक शांत होत असेल अथवा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे गरजेचे आहे असे समजत नसेल तर त्या व्यक्ती तुमचा सन्मान नक्कीच करत नाहीत. तुमच्या बोलण्याला काहीच महत्त्व त्यांच्या लेखी नसते. तुमच्या बोलण्याला महत्त्व नाही याचाच अर्थ तुमच्या असण्यालाही त्यांच्या आयुष्यात काहीही महत्त्व नाही हे तुम्हाला वेळीच कळायला हवे. उगीचच जबरदस्तीने या नात्यामध्ये समोरची व्यक्ती आहे हे समजून जा.
तुमची मर्यादा
प्रत्येक माणसाची स्वतःची एक मर्यादा असते. त्याच्यापुढे कोणत्याही व्यक्तीला येण्यासाठी जागा नसते. असं म्हणतात प्रत्येक माणसांचं स्वतःचं असं एक जग असतं. त्या जगात कोणालाच जागा नसते. याशिवाय काही नियम असतात ज्याचे समोरच्या व्यक्तीने पालन करायला हवे. पण जर तुमचा वा तुमची जोडीदार या मर्यादांचा मान राखत नसेल तर तुम्ही या नात्यात नसणेच योग्य आहे. याबाबत तुम्ही पडताळणी करून घ्या.
फक्त स्वतःचा विचार
तुमच्याबाबत कोणताही विचार न करता केवळ स्वतःबाबत सुख आणि दुःख यातच जोडीदार रमत असेल. जेव्हा स्वतःला हवं तेव्हाच तुमच्याकडे लक्ष पुरवित असेल तर तुमच्या नात्यात कोणताही सन्मान नाही हे समजून जा. तुमच्या कोणत्याही गोष्टीत त्यांना रस नसतो. कितीही त्यांनी सांगितलं तरीही अशा व्यक्ती तुमचा सन्मान कधीही करत नाहीत हे लक्षात घ्या.
अशा गोष्टी ज्यामुळे तुम्ही दुःखी व्हाल
तुमचा जोडीदार जर जाणूनबुजून तुम्हाला दुःख पोहचेल अशा बाबींवर बोलत असेल अथवा सतत टोचून बोलत असेल तर तुमच्या नात्यात कोणताही सन्मान राहिलेला नाही हे समजून जा. जाणूनबुजून प्रत्येक गोष्टीत वाईटपणा शोधून काढणं अथवा त्रासदायक बोलणे यामुळे तुम्हाला होणाऱ्या त्रासाने त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्या मनात तुमच्याविषयी कोणताही सन्मान नसल्यामुळेच ही वागणूक दिसून येते.
तुम्हीही तुमच्या नात्यामध्ये ही पडताळणी करून पाहायला हरकत नाही. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमासह सन्मान आणि विश्वास मिळणंही गरजेचे आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक