चांगला मित्र अथवा चांगली मैत्रीण फक्त नशीबवान लोकांचानच मिळते असं म्हणतात. नातेसंबधांमध्ये मैत्री हे एकच असं प्रेमाचं नातं असतं जे तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा स्वतःहून निवडता. सहाजिकच त्यामुळे तुमचे अगदी लहानपणीचे फ्रेंडही आयुष्यभर तुमची साथ देतात. मात्र आजही लोकांना एका मुलाची आणि एका मुलीची मैत्री होऊ शकते हे मान्य नाही. कारण एक मुलगा आणि मुलगी सहवासात आले की त्यांच्यात मैत्री पलिकडचे नाते निर्माण होते अशी समजूत आहे.मात्र असं मुळीच नाही आज अनेक अशी उदाहरणं पाहता येतील ज्यामध्ये मुलं आणि मुलींची फक्त चांगली मैत्री असू शकते. पण तरिही आयुष्यभराचा जोडीदार निवडण्याची वेळ येते तेव्हा तुमच्या मनात अनेक शंकाकुशंका येतात. एखाद्या नव्या आणि अनोळखी व्यक्तीसोबत संसार थाटण्यापेक्षा जुन्या आणि जीवलग मित्रमैत्रीणीसोबत सहजीवनाचा विचार करणं त्यामानाने सोपं असतं. या भावनेतूनच बऱ्याचदा बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात आपण कधी पडलो हेच अनेकांच्या लक्षात येत नाही. मनातल्या भावना यासाठीच वेळीच न समजल्यामुळे प्रेम असूनही ते व्यक्त केलं जात नाही. यासाठीच वेळीच ओळखा तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडला आहात आणि व्यक्त करा तुमचे प्रेम…यासाठीच ओळखा हे प्रेमात पडल्याचे संकेत
तुम्ही इतर मित्रमैत्रिणींपेक्षा बेस्ट फ्रेडला जास्त प्राथमिकता देता
तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडला आहात याचा पहिला संकेत म्हणजे तुम्ही तुमच्या इतर मित्रमैत्रिणींपेक्षा जास्त प्राथमिकता म्हणजेच लक्ष तुमच्या बेस्ट फ्रेंडकडे देऊ लागता. मैत्रीसाठी खास स्टेटस ठेवता. तुम्ही तुमच्या बेस्ट फेंडसाठी ती सर्व कामे करता जी तुम्ही कधीच कुणासाठी केली नसतील. तुम्हाला इतर फ्रेंड्सपेक्षा त्याच्याजवळ अथवा तिच्याजवळ वेळ घालवणं जास्त आवडू लागतं. त्याच्याशी बोलल्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही. अचानक तु्म्ही त्याच्या आवडीनिवडींचा विचार करू लागता. ते सर्व काही करता ज्यामुळे त्याला आनंद मिळेल.
विनाकारण तुम्हाला त्याला भेटावसं वाटू लागतं
जर तुम्ही तुमच्या बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडला असाल तर त्याचा हा ही एक संकेत आहे की कारण नसतानाही तुम्हाला त्याला अथवा तिला सतत भेटावसं वाटू लागतं. त्याला अथवा तिला भेटण्यासाठी तुम्ही काहीतरी कारण सतत शोधत राहता. त्याच्याशी बोलणं, त्याच्याशी तासनतास गप्पा मारणं, त्याच्यासोबत वेळ घालवणं हा तुमचा आवडता छंद असतो. तुम्हाला त्याला सतत काहीतरी सांगायचं असतं.
गरजेच्या वेळी तुम्हाला तुमची बेस्ट फ्रेंड सर्वात आधी आठवते
जर तुम्ही तिचे सगळे नखरे सहन करू शकता तर ओळखा तुम्ही तिच्या प्रेमात पडला आहात. सुखाप्रमाणेच दुःखातही तुम्हाला ती जवळ हवी असं वाटू लागतं. मनातील नकोशा झालेल्या भावनादेखील तुम्ही तिच्यासोबत शेअर करता. तिच्याशी बोलण्यामुळे तुमच्या मनाला बरं वाटतं. कोणत्याही क्षणी ती तुमची काळजी घेईल याचा तुम्हाला विश्वास असतो असं असेल तर तुम्ही तुमच्या बेस्टच्या प्रेमात पडला आहात.
अचानक त्याच्यासमोर जाण्याआधी तुम्हाला सुंदर दिसावसं वाटतं
मित्रमैत्रिणीसोंबत असताना तुम्ही तुमचे कपडे, सौदर्य याचा फार विचार करत नाही. मात्र जर तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्र अथवा मैत्रिणीसमोर जाताना नीटनेटकं आणि आकर्षक दिसावं असं वाटू लागलं तर याचा अर्थ तुम्ही तिच्या अथवा त्याच्या प्रेमात आहात. तुम्ही कितीही सुंदर असला तरी सौंदर्याबाबत चिंता वाटणं हा एक प्रेमात पडल्याचा संकेत असू शकतो.
त्याचा स्पर्श हवाहवासा आणि आकर्षक वाटणं
मित्रमैत्रिणी म्हटल्यावर बऱ्यातदा एकमेकांना टाळी देणं, हात हातात घेणं, आनंदाने मिठी मारणं हे आलंच. पण जर अचानक तुम्हाला त्याचा स्पर्ष वेगळा जाणवत असेल. हवाहवासा असलेला हा स्पर्श म्हणजे तुमचं त्याच्या प्रेमात पडणं आहे हे ओळखा. त्याचा स्पर्श झाल्यावर याआधी तुम्हाला असं नक्कीच वाटलं नसेल मात्र आता तुम्हाला त्याच्या स्पर्शामुळे रोमांचक अनुभव मिळू लागेल. तुम्ही त्याच्या प्रेमात पडल्याचे हे एक प्रमुख लक्षण असू शकतं.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
नात्यामध्ये अंतरही महत्वाचे, जाणून घ्या कारण