ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सिमी ग्रेवालचा शो पुन्हा येणार, रणवीर आणि दीपिकाची असणार पहिलीच दिलखुलास मुलाखत

सिमी ग्रेवालचा शो पुन्हा येणार, रणवीर आणि दीपिकाची असणार पहिलीच दिलखुलास मुलाखत

लहान पडद्यावर बॉलीवूड कलाकारांचे मुलाखत घेणारे अनेक शो येतात आणि जातात पण त्यामध्येही काही शो प्रेक्षकांच्या खूपच आवडीचे असतात. त्यामधून आपल्या आवडत्या कलाकारांना खरी आणि अगदी मनापासून उत्तरं देताना पाहणं प्रेक्षकांना आणि त्यांच्या चाहत्यांना आवडत असतं. असाच एक शो म्हणजे सिमी ग्रेवालचा चॅट शो. सिमी ग्रेवालचा हा शो बऱ्याच जणांना आवडत होता. पण गेल्या कित्येक वर्षात हा शो आला नाही. पण आता खुद्द सिमीने पुन्हा एकदा शो घेऊन येत असल्याचं निश्चित केलं आहे. इतकंच नाही तर आपल्या शो चा पहिला भाग हा रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण करणार असल्याचंही तिने सांगितलं आहे. रणवीर आणि दीपिकाचे अनेक चाहते आहेत. ही जोडी बऱ्याच जणांच्या यादीत अगदी पहिल्या नंबरवर आहे. लग्नानंतर या दोघांना एकत्र मुलाखत देताना पाहणं ही चाहत्यांसाठी नक्कीच पर्वणी असेल. 

सिमी ग्रेवालनी दिली पुष्टी

सिमी ग्रेवालचा शो पुन्हा सुरु होणार असून त्याची पुष्टी खुद्द सिमीने दिली आहे. सिमीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, ‘एपिसोडचं चित्रीकरण सुरु होईपर्यंत मी कोणाचीही नावं सांगितली नव्हती. पण हे नक्की सांगेन की, दीपिका आणि रणवीरने या शो साठी पहिली मुलाखत देण्याचं वचन दिलं होतं आणि ते नक्की हा शो करत आहेत’ तसंच सिमीने इतर अनेक स्टार्स या शो मध्ये मुलाखत देणार असल्याचंही सांगितलं आहे. 

Instagram

ADVERTISEMENT

शो चं स्वरूप नक्की काय असणार

सिमी ग्रेवालला या शो च्या स्वरूपाबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी सिमीने सांगितलं, ‘मी या शो चं स्वरूप बदलण्याचं काही कारणच नाही. त्यामध्ये गॉसिप आणि गेम्सचा समावेश करण्यासाठी स्वरुप बदलण्याची गरज नाही. लोक गेमचा वापर करतात कारण त्यांना गप्पा मारता येत नाहीत. मुलाखत घेणं ही खूप सोपी पद्धत आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रिसर्चची गरज नाही. पण Rendezvous अर्थात एखाद्याला व्यक्तीला जाणून घेण्यासाठी आपण हा शब्द वापरतो. त्यामुळे शो चं स्वरुप बदलावं वाटत नाही. मला अनेक लोकांचे मेसेजही येतात की, आता सुरु असणाऱ्या काही शो च्या स्वरुपाने त्यांना अजिबातच मजा येत नाही अथवा आनंद मिळत नाही’. या शो ची तारीख अजून घोषित करण्यात आलेली नाही. पण याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे रणवीर दीपिका ही जोडी या शो ची सुरुवात नक्कीच धमाकेदार करेल असा सिमी आणि त्यांच्या चाहत्यांनाही विश्वास आहे. पण याव्यतिरिक्त आता अजून कोणते कलाकार या शो मध्ये येणार याचीही उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. 

दीपिका आणि रणवीर सध्या व्यग्र

Instagram

दीपिका आणि रणवीर सध्या चित्रपटांच्या चित्रीकरणांमध्येही व्यग्र आहेत. दीपिकाने नुकतंच मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं असून हा चित्रपट पुढच्या वर्षी 10 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तर याशिवाय कबीर खान दिग्दर्शित ‘83’ या वर्ल्ड कपवर आधारित चित्रपटामध्येही रणवीर सिंहबरोबर ती काम करत आहे. सध्या याचं चित्रीकरण लंडनमध्ये सुरु आहे. तर रणवीर सिंह या चित्रपटाबरोबरच धर्मा प्रॉडक्शनच्या ‘तख्त’ या ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम करत आहे. यामध्ये त्याच्याबरोबर आलिया भट, जान्हवी कपूर, विकी कौशल, अनिल कपूर, भूमी पेडणेकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

ADVERTISEMENT

हेदेखील वाचा

दीपिकाने रणवीरची का केली बॅटने ‘धुलाई’

कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिका, प्रियांका आणि कंगनाच्या फॅशनचा जलवा

दीपिका- रणवीरच्या लग्नाच्या कपड्यांची गोष्ट…

ADVERTISEMENT
17 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT