क्विंलिंग हा क्राफ्टचा एक प्रकार आहे. क्विलिंग म्हणजे कागदी पट्टीचा वापर करूनन विविध आकाराच्या डिझाईन तयार करणे. क्विलिंग करणं अतिशय सोपं आहे. फक्त सुरूवातीला ही कला अवगत नसल्यामुळे तुम्हाला ते थोडं कठीण जाऊ शकतं. एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून अथवा युट्यूब वर पाहून तुम्ही घरच्या घरी क्विलिंग करू शकता. क्विलिंगच्या दागिन्यांची क्रेझ काही दिवसांपासून वाढत चालली आहे. विविध रंगाच्या साध्या सोप्या आणि आकर्षक डिझाईन्सचे हे दागिने अगदी तरूण मुलींपासून अगदी वयोवृद्ध महिलांना भुरळ घालत आहेत. क्विलिंगचा वापर करून कानातले, नेकपीस, बांगड्या, अंगठी असे विविध दागिने तुम्ही करू शकता. शिवाय नवरात्रीत नऊ रंगाच्या साड्यांवर हे दागिने अतिशय खुलून दिसू शकतात. यासाठी आम्ही क्विलिंगच्या काही आकर्षक डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर करत आहोत. ज्या तुम्ही घरी देखील तयार करू शकता. शिवाय सणासुदीला शहराशहरांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या प्रदर्शनांमध्ये क्विलिंगच्या दागिन्यांचे स्टॉल असतात. ज्या ठिकाणी तुम्ही हे दागिने खरेदी करू शकता.
क्विलिंग दागिन्यांचे विविध प्रकार
1.कानातले –
क्विलिंगचे झुमका डिझाईन्स अनेकींकडे असतील. कारण कोणत्याही पारंपरिक पेहरावावर झुमके नक्कीच चांगले दिसतात. मात्र या व्यतिरिक्त तुम्ही क्विलिंगचा करून अनेक प्रकारचे कानातले तयार करू शकता. खाली दिलेला कानातल्याचा अगदी साधा आणि सोपा आहे. सुरूवातीला हा प्रकार स्वतः तयार करणं अगदी सोपं देखील आहे. शिवाय ऑफिस अथवा इतर कोणत्याही कार्यक्रमात घालण्यासाठी ही एक छान डिझाईन आहे.
2.कानातल्याचा आणखी एक प्रकार
यंदा नवरात्रीसाठी पॉमपॉम आणि टॅसल कानातल्यांचा ट्रेंड आहे. त्यामुळे टॅसल आणि क्विलिंगचं कॉम्बिनेशन असलेलं ही कानातल्याची डिझाईन तुम्ही नक्कीच वापरू शकता. या कानातल्यांवर सोनेरी रंगाचे मणी लावलेले आहेत.ज्यामुळे तुम्ही ते कोणत्याही ट्रेडिशनल साडी अथवा पंजाबी सूटवर ट्राय करू शकता.
3.नेकलेस –
काळ्या आणि पांढऱ्या रंगाची रंगसंगती असलेला हा नेकपीस तुमच्यावर कोणत्याही पेहरावासोबत खुलून दिसेल. या नेकलेससोबत त्यावर मॅच करणारे कानातलेदेखील आहेत. तुम्हाला क्विलिंग येत असेल तर तुम्ही यात निरनिराळे रंग वापरून ते तयार करू शकता.
4.अंगठी –
आजकाल मोठ्या आकाराच्या आणि कलरफुल अंगठ्यांचा ट्रेंड आहे. क्विलिंग करून तुम्ही अशा अंगठ्या तयार करू शकता. हातामध्ये अशी अंगठी घातल्यावर आपसूकच तुमचा लुक आपोआप बदलेल. तुम्ही यामध्ये विविध रंग आणि कॉम्बिनेशन ट्राय करू शकता. नवरात्रीसाठी नऊ रंगाच्या अंगठ्या तुम्ही क्विलिंग करून वापरू शकता.
5. साडीपिन –
साडीपिनची महिलांना नेहमीच गरज असते. साडी, दुपट्टा पिन अप करण्यासाठी साडीपिन वापरली जाते. नेहमीच्या मेटल साडीपिनचा कंटाळा आला असेल तर तुम्ही क्विलिंगचा वापर केलेली ही अशी साडीपिन वापरू शकता. जी दिसायला तर अगदी हटके आहे शिवाय त्यामुळे तुम्ही ट्रेंडीदेखील व्हाल. तुम्ही अशा प्रकारच्या साडीपिन घरी तयार करू शकता.
क्विलिंगमध्ये दागिन्यांचे विविध प्रकार करता येतात. कानातले, नेकलेस, अंगठीप्रमाणे तुम्ही बांगड्या, ब्रेसलेट, पैंजण, साडीपिन, हेअरबॅंड असे अनेक दागिने यातून तयार करू शकता. तेव्हा या नवरात्रीत दिसायला आकर्षक आणि असायला हलकेफुलके दागिने घालून सणाचा आनंद घ्या.
फोटोसौजन्य – इन्साग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
अशी घ्या मोत्यांच्या दागिन्यांची काळजी
नववधूसाठी ‘पर्ल पर्ल’ दिल के पास, मोत्यांच्या साजात खुलतं सौंदर्य!