किचन म्हटल्यावर सगळीच काम वेळेवरच होतील याची काही गॅरंटी नसते. प्रत्येक गृहिणीला घर सांभाळून किचनची जवाबदारीही पार पाडायची असते. या सगळ्यांमध्ये कधी कधी बदलत्या हवामानामुळे किंवा कामाच्या गडबडीत एखाद्या पदार्थाकडे आपलं दुर्लक्ष होतं. मग तो खराब होतो किंवा टाकून द्यावा लागतो. पण आम्ही सांगणार आहोत काही अशा टीप्स आणि ट्रीक्स ज्यामुळे तुम्ही टाकाऊपासून टिकाऊ याप्रमाणे ती वाया जाणारी वस्तू वाचवू शकता.
शिळा ब्रेड
संध्याकाळी घरी अचानक सँडविच बनवायचा प्लॅन झाल्यावर ब्रेड आणला जातो. मग त्याबाबतचा नीट अंदाज न आल्यामुळे काही ब्रेड स्लाईस उरतातच. कधी त्या लगेच खाल्ल्या जातात तर कधी राहून गेल्यामुले कडक होतात. तुम्ही या राहिलेल्या स्लाईसेसना पुन्हा सॉफ्ट करून शकता. या स्लाईसेस फक्त 30 सेकंड्स करता मायक्रोवेव्हमध्ये गरम करा. त्या पुन्हा अगदी पहिल्यासारख्या फ्रेश आणि सॉफ्ट दिसतील आणि खाताही येतील.
वर्किंग वुमन्ससाठी खास किचन टीप्स
आंबट दही
उन्हाळ्याच्या दिवसात नेहमीच दही 1 ते 2 दिवसातच आंबट होऊन जातं. आता प्रत्येकवेळी या आंबट झालेल्या दह्याची कढी तर करू शकत नाही. अशावेळी तुम्ही आंबट दह्यात 1 ते 2 चमचे साय घालून त्यासोबत 1 चमचा साखर घालून 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवा. पाहा दही पुन्हा खाण्यालायक होईल. मग तुम्ही या दह्याचं ताक किंवा अगदी कोशिंबीरही करू शकता. दही-साखर पोळी खायला आवडत असल्यास तोही चांगला पर्याय आहेच.
हिरव्या मिरच्या
बाजारातून हिरव्या मिरच्या घरी आणल्यावर आपण नेहमी त्याची देठ काढून एअरटाईट डब्यात ठेवून देतो. जर तुम्हीही असं करत असाल तर मिरच्या कधीच वाया जाणार नाहीत आणि बरेच दिवस टिकतील.
मायक्रोवेव्हमध्ये होणाऱ्या 5 चविष्ट भारतीय रेसिपीज (5 Delicious Indian Microwave Recipes)
कापलेल्या भाज्या
आजकाल बरेचदा नोकरीला जाणाऱ्या गृहिणी वेळेअभावी कापलेल्या भाज्या बाजारातून विकत आणतात. पण या भाज्या आणल्यावर त्या लगेच करणं दरवेळी शक्य होत नाही. नो टेन्शन अशा वेळी ती भाजी आणल्या आणल्या एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवून द्या. आता हा कंटेनर फ्रिजमध्ये ठेवून द्या. जेव्हा लागले तेव्हा ती भाजी वापरा. अशी ठेवलेली कापलेली भाजी किमान 4 ते 5 दिवसांपर्यंत फ्रेश राहते.
डाळ
जेव्हा जेव्हा हवामान बदलतं तेव्हा अनेकदा डाळीला किड लागल्याचं दिसून येतं. आता तर उन्हाळा संपून पावसाळा येतोय म्हणजे ओल लागण्याचीही भीती आहेच. अशावेळी डाल चांगली राहावी म्हणून डाळीच्या डब्यात दालचिनी आणि 2-3 लवंग घालून ठेवा. असं केल्यास डाळीला किड लागणार नाही.
जेवणाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही करा या रेसिपीज
उरलेल्या पोळ्या
एखाद्या दिवशी पोळ्या जास्त झाल्या की, त्या संपायची जवाबदारी हमखास गृहिणीवरच असते आणि गृहिणीलाही त्याच काही विशेष वाटत नाही. पण शिळ्या पोळ्यांचा एक खास पदार्थ आम्ही तुम्हाला सांगत आहोत. जो तुम्ही केल्यास शिळ्या पोळ्या अगदी पटकन संपतील आणि तुम्हाला एकटीलाही त्या संपव्याव्या लागणार नाहीत. उरलेल्या पोळ्यांचे करा कुरकुरे. हो..हा अगदी सोपा पदार्थ आहे. उरलेल्या पोळ्यांचे उभे काप करून ते तळून घ्या. कुरकुरीत झाल्यावर ते थंड करा आणि त्यावर आवडीनुसार तिखट-मीठ किंवा चाट मसाला घाला. तुमची मुलं काही मिनिटातच या पदार्थाचा फडशा पाडतील. संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणून किंवा डब्यात सुकं देण्यासाठीही हा चांगला पर्याय आहे.