Advertisement

DIY लाईफ हॅक्स

#MoneyTips : या सोप्या ideas ने वाचवा तुमचे पैसे (Tips To Save Money In Marathi)

Aaditi DatarAaditi Datar  |  Sep 16, 2019
#MoneyTips : या सोप्या ideas ने वाचवा तुमचे पैसे (Tips To Save Money In Marathi)

Advertisement

महिन्याभराच्या पगारातून पैसे वाचवणं हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. कारण वाढत्या महागाईसोबतच महिन्याचं बजेटही वाढतंय. त्यामुळे महिन्याच्या शेवटच्या दिवसात खिशात आणि अकाउंटमध्ये पैसेच उरत नाहीत. पण हीच समस्या जाणून आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहेत काही सोप्या आयडियाज. ज्यांचा वापर करून तुम्ही कमी उत्पन्नातही चांगलीच बचत करू शकता. जाणून घ्या बचत करण्यासाठी काही खास युक्त्या या #POPxoMarathi च्या लेखात.

1. बचत करण्यासाठी करा खर्चांमध्ये बदल (Tips To Save Money In Marathi)

 

घरातील किराणा माल आणि अन्य वस्तूंचा खर्च केल्याावर वाचणारे पैसे लगेच वेगळे ठेवा. हवंतर यासाठी वेगळी पिगी बँक बनवा. तुम्हाला कदाचित हसायला येईल पण हा उपाय निश्चितच तुम्हाला उपयोगी पडेल. फक्त असं करूनही तुमचे बरेच पैसे सेव्ह होतील. जे तुम्हाला ऐनवेळी उद्भवणाऱ्या खर्चांसाठी कामी येतील

2. घरचा नाश्ता आणि पाणीही

अनेकांना घराबाहेर पडताच काही ना काही खाण्याची सवय असते. हा खर्च टाळण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे नाश्त्याचा डबा घरूनच घेऊन जा. एवढंच नाहीतर बाहेरचं पाणीही विकत घेऊ नका. त्यापेक्षा घरातून बाहेर पडताना पाण्याची बाटली कॅरी करा. यामुळे तुमचा दुहेरी फायदा होईल पैसेही वाचतील आणि आरोग्यही चांगलं राहील. 

3. पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर

घरचं एखादं महत्त्वाचं काम असो वा ऑफिसला जाणं असो. बाहेर जाताना कारऐवजी वापर करा शेअर ट्रान्सपोर्ट किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा. काहीजणांना पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केल्यास काही कंपनीजकडून विशेष अलाऊन्ससुद्धा देण्यात येतात. तुम्हीही याचा फायदा नक्की घेऊ शकता.

4. हा खर्च टाळाच

बरेचदा आपण सुंदर दिसण्यासाठी किंवा मेंटेन राहण्यासाठी दर आठवड्याला किंवा दर महिन्याला पार्लर किंवा सलोनमध्ये जाऊन पैसे खर्च करतो. पण शक्य असल्यास त्याऐवजी घरच्या घरी एपिलेटर किंवा इतर सौंदर्य उत्पादन घेऊन तुम्ही हा जास्तीचा खर्च टाळू शकता. एकदा एपिलेटर घेतल्यावर किंवा स्ट्रेटनर घेतल्यावर तुम्ही ते अनेक वेळा वापरू शकता आणि पैश्यांची बचत करू शकता.

5. महागड्या हॉटेलऐवजी…

स्टारबक्स किंवा इतर महागड्या हॉटेल्स/ फूड जॉईंट्समध्ये जाऊन कॉफी पिण्याऐवजी घरच्याघरीच कॉफी डेट प्लॅन करा. तुमच्या आवडीच्या कॉफी बीन्स किंवा कॉफी पावडर घरी आणा. मग मनासारखी कॉफी घरच्या घरी बनवा.

6. महिन्याभराच्या किराणामालाची आधीच बनवा लिस्ट

 

जेव्हा तुम्ही घराचा महिन्याभराचा किराणामाल खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा त्याची यादी आधीच बनवून घ्या. तुमच्या यादीत त्याचा गोष्टींचा समावेश करा ज्यांची खरंच गरज आहे. यामुळे तुमच्या सेव्हिंग्जमध्ये बराच फरक पडेल आणि कॅशही वाचेल.

7. डेटा प्लॅन बदला

मोबाईलवरील खर्च वाचवण्यासाठी स्वस्तातला कॉम्बो प्लॅन वापरा. अनेक मोबाईल प्लॅन्स आज बाजारात उपलब्ध आहेत जे तुम्हाला अनेक ऑफर्स देतात. तसंच पेमेंट एप्सचा वापर करून रिचार्ज करा म्हणजे तुम्हाला कॅशबॅक मिळेल. 

मग महिन्याची बचत वाढवण्यासाठी वरील सुचवलेले उपाय नक्की करून पाहा.