सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्रने आत्तापर्यंत तब्बल सहा म्हणजेच मराठी, गुजराती, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडा अशा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गाऊन बहुभाषिक रसिकांची मनं जिंकल्यावर आता ती बंगालीमध्ये आपलं पहिलं ‘सिंगल’ गाणं घेऊन आली आहे. सावनीचं ‘शोन रे शोखी’ हे पहिलंवहिलं बंगाली गाणं रिलीज झालंय.
सावनीची बांगलातही एंट्री
बांगला गाणं गाण्यासाठी सावनीने बांगलाचे धडे गिरवले. या अनुभवाबाबत सांगताना ती म्हणाली की, “गाणं गाताना शब्द उच्चारणही महत्वाचं असतं. प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो. तो ही यायला हवा. त्यामुळे गाण्यावर अर्थातच खूप मेहनत करावी लागली. हे गाणं आपली स्वप्नं साकार करण्यासाठी निघालेल्या मुलीचं मनोविश्व सांगणारं गाणं आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना मनोबल देणारं आणि सकारात्मक दृष्टीकोन देणारं गाणं आहे.”
गोवा आणि सावनीचा सुंदर लुक
या गाण्याचं चित्रीकरण गोव्यात करण्यात आलं आहे. गाण्याच्या मूडनूसार, गोव्यासारख्या शांत आणि रम्य ठिकाणाची निवड करण्यात आलीय. या गाण्यात सावनीचा लुक अगदी सुंदर आहे. गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्यावर गाण्याचं शूटिंग करण्यात आलं आहे. त्यामुळे सुमधूर गाण्यासोबतच याचा व्हिडिओसुद्धा तितकाच व्हिज्युअल ट्रीट ठरतो.
गाण्यामागचा अर्थ
नवीन शहरात एकटीने राहणं, वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देणं आणि करियर करणं हे कठीण जरूर असतं, पण अशक्य नसतं हेच या व्हिडीओतून दर्शवण्यात आलं आहे. खरंतर सावनीच्या खऱ्या आयुष्यातही ती मुंबईत एकटीने राहून आपलं करियर घडवते आहे. त्यामुळे या गाण्याशी रिलेट करणं तिला नक्कीच अवघड गेलं नसेल. हे गाणं सावनीच्या फॅन्ससाठी सुरेल मेजवानी ठरेल यात शंका नाही.
सावनीने गायलेल्या या गाण्याचं गीत लिहिलं आहे नाबरून भट्टाचारजी या गीतकाराने. तर शुभंकर शेंबेकरने गाण्याला संगीत दिलं आहे. डॉ. आशिष धांडे यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. नवीन वर्षात सावनीचं नव्या सिनेसृष्टीतलं हे पहिलं पाऊल निश्चितच वाखाणण्याजोगं आहे.
सावनी रविंद्रचे नवरात्री स्पेशल गुजराती गाणे रिलीज
मग तुम्हीही सावनी ओरिजिनल्समधलं हे सुंदर बांगला गाणं ऐका आणि पाहा. सावनीचं हे गाणं तुम्हाला आवडलं का हेही आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला संगीताबाबत अजून काय वाचायला आवडेल हे आम्हालाही जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
ऐकलीत का गायिका सावनी रविंद्रची नवी म्युझिकल सीरिज
POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.