ADVERTISEMENT
home / मनोरंजन
sisters-become-enemy-new-trend-in-marathi-and-hindi-tv-serials-in-marathi

बहिणी झाल्या वैरीणी, मालिकांमधील बहिणी ठरत आहेत व्हिलन

घरात आपल्याला लहान अथवा मोठी बहीण असणं म्हणजे बरेचदा मैत्रिणीची कमतरता कधीही न भासणं असं दिसून येतं. मात्र सध्या मालिका पाहताना सर्वच उलट दिसून येतंय. आतापर्यंत घराच्या बाहेरचे व्हिलन अर्थात कटकारस्थान रचणारी मंडळी दिसून येत होती. मात्र आता घरातील सख्ख्या असो वा सावत्र असोत, बहिणीच आपल्या बहिणीचं घर उद्धस्त करताना दिसून येत आहे. हिंदी असो वा मराठी असो अनेक मालिकांमध्ये सध्या हा ट्रेंड दिसून येतो आहे, ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Zala), ‘नागिन 6’ (Naagin 6), ‘जीव माझा गुंतला’ (Jeev Maza Guntala), ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla), ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli), ‘कुमकुम भाग्य’ (Kumkum Bhagya) या सगळ्याच मालिका पाहायला गेल्या तर एक बहीण चांगली आणि दुसरी बहीण तितकीच वाईट असं दिसून येत आहे. त्यामुळे मालिकांमध्ये बहिणी झाल्या वैरीणी असंच सध्याचं चित्र आहे. 

आवडती – नावडती

लहानपणापासून आपण गोष्टी वाचतो, त्यामध्ये आवडती मुलगी आणि नावडती मुलगी, कधी कधी सावत्र मुलगी आवडती तर सख्खी नावडती, बहिणींचं न जमणारं नातं अथवा एकमेकांवर कुरघोडी करणारं नातं हे गोष्टीमधून दिसून आलं आहे. मात्र आता मालिकांमध्येही अनेक ठिकाणी बहिणींना नकारात्मक दाखवून आवडती आणि नावडती असं दाखविण्यात येत आहे आणि अर्थातच प्रेक्षक या मालिकांना आपला पाठिंबा दर्शवत असल्यामुळेच या मालिकांना चांगला टीआरपीदेखील मिळत आहे. नाही म्हटलं तरी मालिकेमध्ये दाखविण्यात येणारी पात्र आणि त्यांच्या भूमिका या लेखक समाजातील काही माणसांवरूनच घेत असतो. त्यामुळे हे कथेतील ट्रॅक अनेकांना आवडतात. कदाचित आपल्याबरोबर घडलेल्या काही घटनांवरून मालिकेतील पात्रांशी संबंध जोडला जातो. 

अशा या बहिणी आणि त्यांच्या कुरघोडी 

सध्या गाजत असणारी मन उडू उडू झालं ही मालिका वेगळ्याच वळणार पोहचली आहे. सानिका (Reena Madhukar), दिपू (Hruta Durgule) आणि शलाका (Sharvari Kulkarni) अशा तीन बहिणी. मात्र त्यातील सानिका ही दिपूच्या चांगुलपणावर खार खाऊन आहे आणि तिला सतत त्रास देतेय, स्वतःच्या स्वार्थीपणासाठी दिपूच्या जीवाचे बरंवाईट करण्यासाठीही सानिकेने मागेपुढे पाहिले नाही असं मालिकेत दाखविण्यात आले आहे. तर कुमकुम भाग्यमधील रियाने नेहमीच आपल्या बहिणीला पाण्यात पाहिलं आहे. एकाच व्यक्तीशी लग्न करण्याचा अट्टाहास आणि सतत आपल्या बहिणीला त्रास देणं हे गेले कित्येक भागात दाखविण्यात येत आहे. 

टीआरपीच्या रेसमध्ये सध्या असणारी मालिका म्हणजे ‘नागिन 6’. शेषनागिन असणाऱ्या आपल्या बहिणीसाठी प्रथासाठी (Tejasswi Prakash) आपला जीव पणाला लावणारी मेहक अचानक तिच्या विरोधात उभी राहाते आणि तिला मारण्याचा प्रयत्न करते. इतकंच नाही तर शेषनागिन होण्यासाठी आपण कायम चांगले वागलो आणि संधी आल्यावर प्रथाला मारून टाकलं असा पवित्रा सध्या मेहकने (Mahek Chahal) घेतला आहे.  त्यामुळे पुन्हा एकदा सतत काही ना काही घडत असल्याने ही मालिका टीआरपीमध्ये वर आली आहे. 

ADVERTISEMENT

तर रंग माझा वेगळा या मालिकेतील दीपा आणि तिची सावत्र बहीण यांचे नातेही असेच काहीसे दाखविण्यात आले आहे. सतत दीपाच्या आयुष्यात कुरघोडी करणे याशिवाय तिच्या बहिणीला कोणतेही काम नाही, श्वेताला हव्या असणाऱ्या गोष्टी सहजासहजी दीपाला मिळतात आणि यामुळे तिने तिचं आयुष्य खराब केलं आहे आणि हे प्रेक्षकांनी स्वीकारले आहे. 

या सगळ्याचा अर्थ काढायला गेला तर साधं – सरळ बघण्यात प्रेक्षकांनाही स्वारस्य नाही असंच म्हणावं लागेल. रंजक वळण आल्यावर आणि विशेषतः बहिणीचं नातं हे सर्वात जवळचं असल्याने ते सहज स्वीकारलं जातं आणि त्यामुळेच प्रेक्षकांना हा मालिकांमधील बहिणींना व्हिलन ट्रेंड नक्कीच आवडत असल्याचे दिसून येत आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT