ADVERTISEMENT
home / Fitness
मुलांसारखं बसणं ठरतं मुलींसाठी फायदेशीर, कसं ते घ्या जाणून

मुलांसारखं बसणं ठरतं मुलींसाठी फायदेशीर, कसं ते घ्या जाणून

लहानपणीपासूनच मुलींनी कसं बसायचं हे सतत घरातून सांगण्यात येत असतं. एका विशिष्ट पद्धतीतच मुलींनी बसायला हवं. मुलांसारखं पाय फाकवून बसणं योग्य नाही असे अनेक सल्ले आपल्याला लहानपणापासून मिळत असतात. पण आपण आपल्या सवयीप्रमाणेच बसतो. खरं तर मुलांसारखं बसणं हे मुलींसाठी फायदेशीर ठरतं असं जर तुम्हाला सांगितलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. होय हे खरं आहे. मुलींसारखं बसणं म्हणजे नक्की काय तर पाय क्रॉस करून बसणं. पण प्रत्येक मुलीला हे जमतंच असं नाही. पाय पसरून बसणं योग्य नाही असा सल्ला नेहमीच देण्यात येतो. पण असा सल्ला जर तुम्हाला कोणी देत असेल तर हे वैद्यकीयदृष्ट्यादेखील योग्य नाही हे लक्षात घ्या. कदाचित तुम्हाला हे वाचून नक्कीच धक्का बसला असेल. पण हे खरं आहे. सतत पाय क्रॉस करून बसणं योग्य नाही. खरं तर मुली मुलांसारख्या बसल्या तर त्यांना नक्कीच शारीरिक फायदा मिळतो. कसा ते आपण या लेखातून पाहूया. 

एकाच ठिकाणी बसून काम करणं आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक

सतत क्रॉस बसल्याने होते सांधेदुखी

Shutterstock

ADVERTISEMENT

महिलांच्या कंबरेचा भाग हा पुरुषांच्या अपेक्षेपेक्षा मोठा असतो आणि त्यामुळेच मांडीची हाडं ही आतल्या बाजूला हिपच्या सांध्याच्या बाजूला झुकतात. या रोटेशनमुळे सतत क्रॉस बसल्याने महिलांच्या हिप्स आणि गुडघ्यांमध्ये दुखायला लागतं. त्यामुळे सतत क्रॉस बसणं हे मुलींसाठी त्रासदायक ठरतं. एका विशिष्ट वयानंतर हा त्रास सुरू होतो. पण तुम्ही जर पुरूषांसारखे बसलात तर तुम्हाला हा त्रास जाणवणार नाही. कारण तुमच्या शरीराच्या काही भागांवर जोर येत नाही आणि तुम्हाला बरं वाटतं. त्यामुळे तुम्ही सतत मुलींसारखं क्रॉस बसण्यापेक्षा पाय पसरूनदेखील बसणं गरेजचं आहे. यामध्ये कोणतीही वाईट गोष्ट नाही. 

ऑफिसमध्ये बसल्याजागी करा ‘हे’ स्ट्रेचिंग एक्सरसाईज

काय असावी बसण्याची पद्धत

Shutterstock

ADVERTISEMENT

सतत आपल्या डोक्यावर मुलींसारखं बस असं बिंबवलं जातं. पण तुम्ही पुरूषांसारखं बसल्यास, तुम्हाला कमी त्रास होईल. तुम्हाला गुडघ्याच्या त्रासापासून वाचायचं असेल तर ही योग्य पद्धत आहे. नक्की बसण्याची योग्य पद्धत काय असा मग प्रश्न निर्माण होतो. तर तुम्ही कम्फर्टेबल पद्धत जाणून घ्या. तुमच्या डाव्या पायावर तुमचा पाय जर 11 वाजता ठेवला असेल तर थोड्यावेळाने किमान दोन तासाने उजवा पाय हा डाव्या पायावर ठेवायला हवा. सतत एकच पाय तुम्ही वापरलात तर तुम्हाला ते त्रासदायक ठरू शकतं. तसंच उठताना तुम्ही गुडघे हे पॉईंटेड ठेवा. अन्यथा त्यामध्ये लचक भरण्याची शक्यता असते. तुम्ही बसताना दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेऊन बसा. पाय असे पसरून बसल्यास तुम्हाला जास्त त्रासदायक ठरणार नाही. 

तुम्हाला पोटावर झोपायची सवय असल्यास, त्वरीत बदला ही सवय

पाय पसरून बसल्याने कंबरदुखी होते कमी

पाय पसरून बसल्याने तुमच्या कंबरेवरचा जोरही कमी होतो आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही. सतत तुम्ही पाय क्रॉस करून बसल्यास, सर्वात जास्त जोर येतो तो तुमची कंबर आणि हिप्सवर. पण तुम्हाला हा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही नक्की पाय पसरून बसायची सवय करा. कारण एका विशिष्ट वयापर्यंत तुम्हाला हा त्रास जाणवत नाही. पण साधारण तिशीनंतर मात्र तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतात. सतत कंबरेतून कळा येत राहणं अथवा हिप्स दुखणं या कॉमन समस्या तुम्हाला महिलांमध्ये दिसून येतात. त्याचं कारण नक्की काय असा विचार करत राहतो. पण त्याचं कारण हे सतत पाय क्रॉस करून बसणं आहे. हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. पण हे जाणून घेणं आणि त्यावर योग्यरित्या बसणं हाच एकमेव उपाय आहे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

ADVERTISEMENT

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

07 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT