हिवाळा सुरू झाला की वातावरणातील गारव्यामुळे आणि कोरड्या हवामानामुळे त्वचा रूक्ष आणि निस्तेज दिसू लागते. म्हणूनच थंडीला सुरूवात होण्यापूर्वीच त्वचेची निगा राखण्यास सुरूवात करायला हवी. कारण आधीच काळजी घेतली नाही अथवा योग्य ते स्किन केअर रूटिन फॉलो केलं नाही तर त्वचा कोरडी होऊन त्वचेवर ओरखडे अथवा तडे जाऊ लागतात. ज्यामुळे पुढे त्वचेच्या समस्या वाढत जातात. यासाठीच हिवाळ्याच्या सुरूवातीलाच योग्य स्किन केअर रूटिन पाळण्यास सुरूवात करणं गरजेचं आहे. जाणून घ्या हिवाळ्यात नेमकं कोणतं स्किन केअर फॉलो केल्यामुळे त्वचा कायमस्वरूपी मऊ आणि मुलायम राहू शकेल.
नियमित त्वचेची स्वच्छता राखणे –
त्वचेची निगा राखण्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्वचेची स्वच्छता. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी त्वचा नियमित स्वच्छ करायला हवी. या काळात त्वचा कोरडी होत असल्यामुळे त्वचा स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर न करता सौम्य क्लिंझर, फेसवॉश, बॉडी वॉश वापरावे. त्वचा स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रॉडक्टमधून तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. हिवाळ्यात साबणापेक्षा बेसन, मसूर डाळ अशा नैसर्गिक घटकांपासून त्वचा क्लिन करावी. ज्यामुळे त्वचेचं अधिक नुकसान होणार नाही.
Shutterstock
स्क्रबर चुकूनही वापरू नका –
स्किन केअर मध्ये स्क्रबिंग या स्टेपला जरी खूप महत्त्व असले तरी हिवाळ्यात शक्य असल्यास त्वचा स्क्रब करणे टाळावे. कारण या काळात तुमची त्वचा जास्तीत जास्त मॉईस्चराईझ करणं खूप गरजेचं आहे. स्क्रबरचा अती वापर केल्यामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ शकते. यासाठीच या काळात स्क्रबरचा वापर कमी करावा.
सनस्क्रिन न लावता घराबाहेर पडू नये –
हिवाळ्यात सुर्यकिरणे फार प्रखर नसली तरी घराबाहेर जाताना सनस्क्रिन लावणं खूप गरजेचं आहे. कारण यामुळे तुम्हाला उन्हामुळे होणारं टॅनिंग नक्कीच टाळता येईल. कारण हिवाळ्यात कोरडी झालेली त्वचा साध्या सुर्यप्रकाशातही लगेच टॅन होऊ शकते. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी कमीत कमी पंधरा मिनिटे आधी त्वचेवर सनस्क्रिन लावावे.
Shutterstock
मॉईस्चराईझ सतत ठेवावे जवळ –
हिवाळ्यात फक्त सकाळी अथवा रात्री त्वचा मॉईस्चराईझ करून चालणार नाही. कारण वातावरणातील थंडावा जसा असेल त्यानुसार तुमच्या त्वचेची मॉईस्चराईझरची गरज कमी जास्त होऊ शकते. यासाठीच अशा काळात सतत मॉईस्चराईझर जवळ ठेवावे. अशा मॉईस्चराईझरची निवड करावी ज्यामुळे तुमच्या त्वचेला खोलवर मऊपणा मिळेल. शक्य असल्यास क्रिम बेस्ड मॉईस्चराईझच वापरावे ज्यामुळे तुमची त्वचा मुलायम राहील.
मुबलक पाणी प्या –
थंडीच्या दिवसांमध्ये तहान कमी लागत असल्यामुळे पाणी कमी प्यायले जाते. मात्र याचा परिणाम तुमच्या त्वचेवर नकळत होत असतो. त्यामुळे जर तुमची त्वचा ड्राय असेल तर तुम्ही पुरेसे पाणी पिणे गरजेचं आहे. ज्यामुळे त्वचा योग्य प्रमाणात हायड्रेट राहील आणि त्वचेचं नुकसान कमी होईल.
Shutterstock
ओठांची घ्या विशेष काळजी –
शरीरावरील इतर त्वचेपेक्षा ओठांची त्वचा ही मऊ आणि नाजूक असल्यामुळे थंडीचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या ओठांवर दिसू लागतो. यासाठीच थंडीला सुरूवात होण्याआधीच ओठांची योग्य काळजी घेण्यास सुरूवात करा. ज्यामुळे ओठ फुटणार नाहीत आणि मुलायम दिसतील.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
चेहऱ्यावर का लावू नये बॉडीलोशन, जाणून घ्या दुष्परिणाम