ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
skin-care-tips

कमी खर्चात घ्या त्वचेची सोप्या पद्धतीने काळजी

त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला नेहमीच पुढे असतात. महिला नेहमीच पँपर करत असतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकदा महिन्यातून किमान दोन वेळा तरी महिला पार्लरमध्ये जातात. त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारातील अनेक उत्पादनदेखील वापरले जातात. पार्लरमध्ये नियमित जाणं मात्र बरेचदा महागडे ठरू शकते. बऱ्याचदा महाग स्किन केअर ट्रिटमेंटमुळेदेखील (Skin care treatment) त्रास होतो. तुम्हाला कमी खर्चात जर तुमच्या त्वचेची काळजी सोप्या पद्धतीने घ्यायची असेल तर तुम्हाला आम्ही काही सोपे उपाय सांगत आहोत. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही हे सोपे उपाय करू शकता. 

फेस टूल ऐवजी करा चमच्याचा वापर 

तुम्ही घरच्या घरी असणाऱ्या चमचादेखील तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरू शकता. तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे. आजकाल महिला आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस टूल अर्थात जेड रोलर्स अथवा गुआ शा वापरताना दिसून येतात. पण हे सर्वांनाच वापरणं जमतंच असं नाही. त्वचेचा मसाज करण्यसाठी तुम्ही घरातील चमचा वापरू शकता. चमच्याने मसाज करण्याने तुमची त्वचा अधिक टाईट होऊ शकते. त्वचेचा मसाज करण्यासाठी तुम्ही आईस क्युब आणि तेलाचा वापर करू शकता. चेहऱ्यावर तेल लावा आणि मग चमच्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावर मसाज करा. चमचा घ्या आणि जॉ लाईनचा मसाज करा. 

शीट मास्क 

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही शीट मास्कचा (Sheet Mask) वापर करून पाहा. आजकाल मार्केटमध्ये शीटमास्क अगदी सहजपणाने मिळतो. तुम्ही 75 रूपयांपासून ते अगदी 100 रुपयांपर्यंत मास्कची खरेदी तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या त्वचेला पँपर करण्यसाठी विविध फ्लेवरचा उपयोग करू शकतो. शीट मास्कचा वापर करण्यामुळे त्वचेला अधिक चमक मिळते. तुम्ही कमीत कमी 15 मिनिट्स हा चेहऱ्यावर लाऊन ठेवायला हवा. चेहऱ्यावर हा शीट मास्क लावा आणि हा शीट मास्क लावलेला असताना कोणतेही इतर काम न करता तुम्ही शांत बसा. तुम्हालाही आराम मिळेल. 15 मिनिट्सनंतर शीट मास्क काढा आणि त्यातील जेल चेहऱ्याला राहिली असेल त्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि मग चेहरा पाहा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर चमक आलेली दिसून येईल. 

घरगुती स्क्रब आणि फेसमास्क 

कमी खर्चात जर तुम्हाला तुमची त्वचा अधिक चांगली राखायची असेल तर तुम्ही घरगुती स्क्रब आणि फेसमास्कचा (Homemade Scrub and Face Mask) वापर करावा. त्वचेच्या काळजीसाठी तुम्ही कॉफी अथवा नारळ तेलाच्या स्क्रबचा वापर करावा. कॉफी स्क्रब डेड सेल्स काढण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. तसंच स्क्रब केल्यानंतर घरगुती फेस मास्क लावल्यावर त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार होण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

घरगुती फेसमास्कमध्ये तुम्ही बेसन, हळद, कच्चे दूध, कोरफड, पपई अथवा कच्च्या पपईचा वापरदेखील करू शकता. तुम्हाला कोणत्याही पदार्थांची अलर्जी असल्यास याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही पॅच टेस्ट करून घ्या. तसंच यामुळे अगदी तुमची त्वचा संपूर्ण कोणत्याही समस्येपासून सुटेल असा आमचा दावा नाही. तुम्ही याचा वापर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारही करू शकता.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

05 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT