ADVERTISEMENT
home / निरोगी जीवन
स्कॉट्स आणि दोरीच्या उड्या

दोरीच्या उड्या आणि स्कॉट्स मारुन करा वजन कमी

वजन कमी करण्याचे स्वप्न सगळ्यांचेच असते. पण सगळ्यांना जीम करणे, खूप व्यायाम करणे, डाएटचे असलेले पदार्थ खाणे जमेलच असे नाही. अशा लोकांनाही वजन कमी करता येऊ शकते. दोरीच्या उड्या आणि स्कॉट्स म्हणजेच बैठका मारल्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. पण हे दोन व्यायाम किती आणि कधी करावे. त्यामध्ये व्हेरिएशन कसे आणता येईल. शिवाय हे दोनच व्यायाम तुमचे वजन कमी कसे करतील हे आपण जाणून घेऊया.

दोरीच्या उड्या

दोरीच्या उड्या

दोरीच्या उड्या या लहानपणी आपण सगळ्यांनीच केल्या आहेत. शरीरासाठी हा एक उत्तम कार्डिओ आहे. ज्यांना वजन कमी करायचे असते. अशांसाठी कार्डिओ हा उत्तम व्यायाम आहे. सर्वांगाचा व्यायाम असल्यामुळे यामुळे तुम्ही लवकर बारीक दिसू लागता. दोरीच्या उड्यांसाठी हल्ली वेगवेगळ्या प्रकारच्या दोरीच्या उड्या मिळतात. तुम्हाला तुमच्या स्पीडनुसार कोणती दोरीची उडी निवडता येईल.

अशा मारा दोरीच्या उड्या

  • दोरीच्या उड्या कधी आणि कशा करायच्या असा विचार करत असाल तर ज्यावेळी तुम्हाला मोकळा वेळ आहे त्यावेळी तुम्ही दोरीच्या उड्या मारा. 
  • दोरीच्या उड्या मारताना त्या सलग असू द्या. कारण तसे केल्यामुळे तुम्ही जास्त कॅलरीज बर्न करता येतात. त्यामुळे सलग दोरीच्या उड्या मारा. 
  • साधारण 100 उड्या या कोणालाही मारता येतात. तुम्ही अगदीच हेवी वेट असाल किंवा व्यायाम करणारे नसाल तर 25-25-25-25 असा सेट मारला तरी चालू शकतो. याशिवाय तुम्हाला जर जास्त व्यायाम करता आला तर तुम्ही जास्त दोरीच्या उड्या मारु शकता. 
  • कोणताही हेवी वर्कआऊट करण्यापेक्षा हा एक उत्तम व्यायाम आहे.

स्कॉट्स

पायांसाठी केला जाणारा एक व्यायाम म्हणजे स्कॉट्स. हा व्यायाम केल्यामुळे पायांचा चांगलाच व्यायाम होतो. पण पायांसोबत त्याचा फायदा हा आपल्याला ग्लुट्स आणि मांड्यांना देखील होतो. त्यामुळे हा देखील एक चांगला व्यायाम आहे. स्कॉट्समध्ये वेगवेगळे प्रकार येतात. म्हणजेच त्यामध्ये व्हेरिएशन येते त्यामुळे हा व्यायाम केल्यामुळे चांगलाच फायदा मिळतो.

ADVERTISEMENT

शा मारा स्कॉट्स

  • स्कॉट्स हा व्यायाम तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही दोरीच्या उड्या मारताना हा देखील व्यायाम करु शकता. म्हणजे तुम्हाला एक सेट स्कॉट्स आणि एक सेट दोरीच्या उड्या अशा देखील मारता येतात. 
  •  तुम्हाला स्कॉट्स करताना त्यामध्ये व्हेरीएशन आणताना सुमो स्कॉट्स, क्लोज लेग स्कॉट्स असे देखील तुम्हाला करता येईल. त्यामुळे तुमच्या पायांना चांगला आकार मिळण्यास मदत मिळेल. 

आता हे दोन व्यायाम करुन नक्की तुमचे वजन कमी करा. 

28 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT