ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
तरुणांमध्ये या कारणामुळे वाढतोय निद्रानाशाचा त्रास

तरुणांमध्ये या कारणामुळे वाढतोय निद्रानाशाचा त्रास

 

साधारण वय झाले की, खूप जणांची झोप ही कमी होते. त्यामुळे म्हातारी माणसं ही अवघी 5 ते 6 तास किंवा त्याहून कमी झोपतात. ही फारच सर्वसामान्य अशी बाब आहे. वयोपरत्वे असे बदल हे होतच असतात. पण हल्ली कमी झोप किंवा निद्रानाशाचा हा प्रकार तरुणांमध्ये अधिक दिसू लागला आहे. तरुणांमध्ये निद्रानाशाची अनेक लक्षणे दिसून येत असून त्यामुळे त्यांचे आरोग्य खराब होताना दिसत आहे. पण तरुणांच्या या निद्रानाशासाठी काही गोष्टी या फारच परिणाम करु लागल्या आहेत. त्यापैकी काहींची तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना सवय लागली असेल तर तुम्ही आताच याकडे लक्ष द्यायला घ्या.

सतत पॉर्न पाहायची लागली आहे सवय? अशी सोडता येईल ही सवय (How To Stop Watching Porn)

वेबसीरिज

 

सध्या सगळ्यांना वेड लागले आहे ते म्हणजे वेबसीरिजचे. दिवस चांगला घालवण्यासाठी आणि उत्तम इंटरटेन्मेंट मिळवण्यासाठी वेबसीरिज हे सगळेच पाहतात. या सीरिज कधीकधी इतक्या चांगल्या असतात की, त्या पूर्ण पाहिल्याशिवाय उठावेसे वाटत नाही. खूप जणांना सीरिजचा फडशा पाडायची सवय झालेली आहे.  त्यामुळे त्यात कधी वेळ निघून जातो कळत नाही. या वेबसीरिजमध्ये मन गुंतायला लागते आणि त्यात खूप वेळ जातो. ज्यामुळे झोेपेचे गणित कधी बिघडते ते देखील कळत नाही. निद्रानाशासाठी वेबसीरिज देखील तितक्याच कारणीभूत आहेत.

दुपारी ऑफिसमध्ये येत असेल झोप तर करा अशी नियंत्रित, सोप्या टिप्स

ADVERTISEMENT

लेट नाईट चॅट्स

 

रात्री उशीरापर्यंत जागण्याचे आणखी एक कारण म्हणजे उशीरा चॅट करणे. खूप जणांना रात्र रात्र जागून चॅट करण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे फोन हा सतत हातात असतो. फोनमधील किरणं ही इतकी प्रखर असतात की, ती झोपू देत नाही. त्यामुळे हळुहळू झोप उडू लागते. झोपेच्या पॅटर्नमध्ये बदल होऊ लागला की, चिडचिड होऊ लागते. झोपेचा हा पॅटर्न बदलल्यामुळे नक्कीच निद्रानाशाचा त्रास हा वाढू लागतो.

दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स

जेवणाच्या वेळा

 

खूप जणांना चुकीच्या वेळी जेवायची सवय लागून गेली आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात खूप जणांनी आपल्या या लाईफस्टाईलमध्ये बराच बदल केला आहे. खूप जण नाश्ता करत नाहीत. थेट जेवतात. त्यामुळे जेवण पचायलाही अडथळा निर्माण होतो. अशावेळी तुम्ही जर खाण्यामध्ये सुधारणा केली तर तुम्हाला याचा त्रास होणार नाही. जेवणाच्या वेळा या देखील यासाठी कारणीभूत ठरतात. 

वाचा – मुंग्या येण्याची लक्षणे (Symptoms Of Mungya Yene)

ADVERTISEMENT

रिल्स पाहात बसणे

 

काही व्हिडिओ हे असे असतात जे सतत पाहण्याची इच्छा होत राहते. आता इन्स्टाग्रामवर असलेले रिल्स व्हिडिओच पाहा ना ते सतत पाहण्याची इच्छा होत राहते. त्यामुळे होतं असं की, अजून एक अजून एक व्हिडिओ करता करता आपण कधी सगळे व्हिडिओ पाहात राहतो हे आपल्याला देखील कळत नाही. त्यामुळेही डोळ्यांवरची झोप उडते. तुम्हीही असे सतत रिल्स पाहात असाल तर तुम्हाला हा असा त्रास होणे साहजिक आहे. 

तुमच्या निद्रानाशासाठी नेमके कोणते कारण कारणीभूत आहे ते लक्षात घ्या आणि त्यानुसार आपल्यात बदल करा.

07 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT