ADVERTISEMENT
home / Eye Make Up
देसी लुकसाठी या आयशॅडो पॅलेटने करा ग्लॅमरस स्मोकी आइज

देसी लुकसाठी या आयशॅडो पॅलेटने करा ग्लॅमरस स्मोकी आइज

फेस्टिव्ह सीझनमध्ये कधीही ग्लॅम लुक करावा लागू शकतो यासाठी कोणत्या पारंपरिक ड्रेसवर तुम्ही कोणता लुक करणार आहात हे आधीच ठरवावं लागतं. अशा वेळी माझी पहिली पसंती स्मोकी आइजलाच असते. कारण हा आय मेकअप कोणत्याही ड्रेसवर सूट होतो आणि बोल्डही दिसतो. 

स्मोकी आइजसाठी गरज असते योग्य प्रमाणात शिमर शेड असलेल्या आय पॅलेटची…यासाठी आम्ही तुम्हाला सल्ला देऊ की तुम्ही असं कॉम्पॅक्ट आय पॅलेट निवडावं ज्यामध्ये  सर्व प्रकारच्या शेड असतील. तुम्ही लकी आहात कारण आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत POPxo Makeup चं चार शेड असलेलं आयशॅडो पॅलेट ज्यामध्ये तुम्हाला सापडतील हव्या त्या शेड्स. आमच्या The Drama Queen Eyeshadow Kit मध्ये तुम्हाला त्या सर्व शेड्स मिळतील ज्या आकर्षक स्मोकी आइजसाठी गरजेच्या आहेत. फेस्टिव्ह सीझनसाठी परफेक्ट असलेल्या या ट्रव्हल फ्रेंडली कीटमध्ये तुम्हाला हवं ते सारं मिळू शकतं.

POPxo Makeup Drama Queen 4 Eyeshadow Kit

या आकर्षक पॅलेटची खासियत ही आहे की यात तुम्हाला हायली पिगमेंटेड ब्राऊन आणि काळ्या रंगाची डार्क शेड मिळेल जी तुम्ही आय लायनरप्रमाणे वापरू शकता. यातील बेस शेड तुम्ही पापण्यांवर वापरू शकता तर शिमर शेड हायलाईटसाठी वापरू शकता. त्यामुळे इतर मेकअप प्रॉडक्टच्या लिस्टमध्ये हे कीट एखाद्या विजेत्याप्रमाणे शोभून दिसतं. विशेष म्हणजे तुम्हाला हे कीट फक्त 299 रू. मध्ये मिळेल.

या मेकअप कीटने करा तुमचा फेस्टिव्ह स्मोकी आय मेकअप

आता या मेकअप कीटचा वापर करून तुम्हाला हवा असलेला फेस्टिव्ह स्मोकी आइज लुक कसा मिळेल ते पाहू या.

ADVERTISEMENT

स्टेप 1 –  बेस तयार करा

सर्वात आधी डोळ्यांच्या पापणीचा स्किन टोन मॅच करण्यासाठी यातील मॅट फिनिशच्या न्यूड शेड पापणीवर ब्लेंड करा. संपूर्ण पापणी आणि डोळ्याच्या टोकापर्यंत ही शेड व्यवस्थित ब्लेंड करा.

स्टेप 2 – कौन्टोर आणि उठाव

डोळे आकर्षक आणि नैसर्गिक दिसण्यासाठी ब्राऊन शेडने डोळ्यांच्या शेपला कौंटोर करा. यासाठी पापण्यांच्या कडांवर ब्राऊन शेड लावा आणि व्यवस्थित ब्लेंड करा. डोळ्यांना उठाव येण्यासाठी पापणीच्या उंचवठ्यावरून बाहेरच्या दिशेला ही शेड पसरवा. आता लॅश लाईनला ती शेड जोडा ज्यामुळे शेप टोकदार दिसेल. यामुळे तुमच्या डोळ्यांना कॅट आयचा इफेक्ट दिसेल.

स्टेप 3 –  थोडीशी चमक

आता तुमचे डोळे मस्त उठावदार आणि सुरेख झालेले आहेत. त्यामुळे पॅलेटमधील डार्क शेडचा वापर करा. यातील काळ्या आयशॅडो टोकदार आयलायनर ब्रशने पापणीच्या कडांना लावा. पेन्सिल ब्रशचा वापर करून तुम्ही डोळ्यांना आता स्मोकी इफेक्ट देऊ शकता. लक्षात ठेवा सुरुवातीला नेहमी थोडंच प्रॉडक्ट वापरा लागलं तर पुन्हा त्यात तुम्ही ते अॅड करू शकता.

स्टेप 4 – स्मोकी इफेक्ट द्या

पॅलेटमधील काळ्या शेडचा तुम्ही आय लायनर सारखा वापर करू शकता. जसं की फॉक्सी इफेक्टसाठी ते उत्तम ठरेल. मस्कारा लावून तुम्ही मेकअप सेट करू शकता. 

ADVERTISEMENT

स्टेप 5 – जस्ट टच अप

आय मेकअप आणखी आकर्षक दिसण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो आहोत.

आमच्यासाठी हा ग्लॅमरस स्मोकी आय लुक करणं खूपच रोमांचक होतं. तुम्हाला तो कसा वाटला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

फोटोसौजन्य – Eden Noronha

मच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!

ADVERTISEMENT
28 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT