ADVERTISEMENT
home / मनोरंजन
पाकिस्तानी पावरी व्हिडिओपेक्षा स्मृती इराणींना आवडला शहनाजचा टॉमी

पाकिस्तानी पावरी व्हिडिओपेक्षा स्मृती इराणींना आवडला शहनाजचा टॉमी

सध्या सगळ्या सोशल मीडियावर पाकिस्तानी पावरी व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याचा एक मीम म्युझिक व्हिडिओ बनल्यानंतर त्यावर आणखी बरेच व्हिडिओ अनेकांनी तयार केले. पण केंद्रीय मंत्री स्मृति इराणींना मात्र या पावरी व्हिडिओपेक्षा शहनाजचा व्हिडिओ भलताच आवडलेला दिसत आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शहनाजचा तो टॉमीवाला व्हिडिओ शेअर करत त्यांनी पुन्हा एकदा शहनाजकडे वळा असे सांगितले आहे. यशराज मुखातेने बनवलेला हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी सगळ्यांना हे आवाहन केले आहे. दरम्यान, यशराजचा पाकिस्तानच्या पावरी गर्लचा व्हिडिओ नुकताच आला आहे जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. जाणून घेऊया का स्मृती इराणींना पावरी गर्लपेक्षा शहनाजचा व्हिडिओ आवडला.

खुशखबर! नीति मोहन होणार आई,शेअर केले फोटो

पावरी छोडो शहनाज को सोचो

 स्मृती इराणी या इन्स्टाग्रामवर चांगल्या अॅक्टिव्ह असतात. नवंनवे ट्रेंड फॉलो करणे त्यांनाही आवडते. आता सध्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानातील पावरी गर्लचा व्हिडिओ वायरल होत आहे. त्याला भारतातूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण शत्रू देशातील या पावरी गर्लला प्रसिद्धी देण्यापेक्षा शहनाजच्या भावनाच जाणून घेणे अधिक चांगले असे त्यांना वाटत आहे. म्हणूनच की काय त्यांनी ‘देर आए दुरुस्त आए..पावरी गर्लपेक्षा  शहनाजच्या भावना जाणून घ्या’  पंजाबी भाषेतून शहनाज आपल्या भावना अगदी परफेक्ट मांडू शकते याचे हे उत्तम अदाहरण असलेला हा व्हिडिओ आहे. एकूणच शहनाजच्या या व्हिडिओ त्यांनी पसंती देत पावरी गर्लच्या व्हिडिओला एका अर्थी नाकारलेच आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. 

रसोडे मे कौन था?

यशराज मुखातेचा  ‘रसोडे मे कौन था? ’ हा साथ निभाना साथिया मधील व्हिडिओ आला त्यापैकी एकच धूम माजली. घरात राहून कंटाळलेल्या सगळ्यांना एक वेगळाच आनंद या व्हिडिओने दिला. हा व्हिडिओ स्मृती इराणींना आवडला होता. त्यांनी तो पोस्टही केला पण काहीच वेळात त्यांनी हा व्हिडिओ काढून टाकला. यशराजने या आधी देशाशी निगडीत काहीतरी अप्रिय असे पोस्ट केल्यामुळे यशराज मुखातेच्या त्या व्हिडिओवर बोलणे नंतर त्यांनी टाळले. पण आता मागच्या गोष्टी विसरत यशराजच्या टॅलेंटचे कौतुक करायला त्या मुळीच विसरल्या नाहीत. 

ADVERTISEMENT

या मराठी अभिनेत्यांनी साकारली शिवाजी महाराजांची भूमिका, प्रेक्षकांच्या मनावर सोडली छाप

शहनाजचा व्हिडिओ हिट

यशराज मुखातेने बनवलेल्या छोट्या छोट्या डायलॉग म्युझिकलची चर्चा सबंध बॉलिवूडमध्ये होते. आता या नव्या व्हिडिओच्या माध्यमातून ती देशातून बाहेरही गेली असे म्हणायला हवे. पण बिग बॉसच्या घरात गेलेली शहनाज गील आणि तिचा हा डायलॉग अशा पद्धतीने प्रसिद्ध होईल हे तिलाही कधी वाटले नसेल. पण शहनाजचा या व्हिडिओने रेकॉर्ड मोडला असे म्हणायला हवे. कारण परदेशातूनही अनेकांनी या व्हिडिओवरुन प्रेरित होऊन आणखी काही हिट व्हिडिओ बनवले जे लोकांना खूपच आवडले. 

दरम्यान अजूनही तुम्हाला त्वाडा कुत्ता टॉमी साडा कुत्ता कुत्ताचा हा विनोद माहीत नसेल तर हा व्हिडिओ बघा

शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांची गाणी आणि पोवाडा Shivaji Maharaj Marathi Songs & Powada

ADVERTISEMENT
16 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT