ADVERTISEMENT
home / नातीगोती
घोरण्याचा नात्यावर असा होतो परिणाम

घोरण्याच्या सवयीचा रिलेशनशीपवर होतो का परिणाम

एखादी सवय ही असेल तर त्याचा त्रास हा घरातल्यांना होतोच असे नाही. पण तुमच्या आयुष्यात एखादी नवी व्यक्ती आली की, त्याच्या सवयी जाणून घेईपर्यंत थोडा वेळ तर जातोच. रिलेशनशीपमध्ये असताना जोडीदाराच्या काही सवयी या माहीत होतात. त्याच्या नात्यात असताना चांगल्या वाईट सवयी आपल्याला रोजच्या वाटू लागतात. पण घोरणे ही अशी सवय आहे ज्यामुळे बराच फरक पडतो. तुमचाही जोडीदार घोरतो का? घोरण्याची ही सवय तुमच्या रिलेशनशीपवर परिणाम करु शकते. तुमची घोरण्याची सवय ही तुमच्या रिलेशनशीपवर नेमका काय परिणाम करते ते जाणून घेऊया.

नात्यामध्ये अंतरही महत्वाचे, जाणून घ्या कारण

सेक्स लाईफवर होतो परिणाम

लाईफपार्टनरसंदर्भात प्रत्येकाच्या मनात काहीना काही फँटसी असतात. त्या सगळ्या फँटसी सेक्सच्या माध्यमातून पूर्ण करायच्या असतात. जोडीदारासोबत बेड शेअर करताना जर जोडीदार तोंड  उघडे टाकून घोरत असेल तर ते कोणालाच चालत नाही. त्यामुळे एकमेकांसोबत वेळ घालवण्याची इच्छा कमी होते. नात्याच्या सुरुवातीच्या काळात तरी  काही चांगल्या गोष्टींची अपेक्षा असते ती पूर्ण झाली नाही तर मात्र एकमेकांमधील रस कमी होऊ लागतो.रिलेशनशीपच्या पहिल्या टप्प्यात असे होणे मुळीच चांगले नाही. याकारणासाठी तरी तुम्ही ही सवय बदलणे गरजेचे असते.

 जोडीदारातील रस कमी होणे

Instagram

घोरणे ही सवय खूप जणांना वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकते. काही जणांचे घोरणे हे फारच भीतीदायक अशा स्वरुपातील होऊन जाते. तुमचे सतत घोरणे हे तुमच्यातील जोडीदाराचे स्वारस्य कमी करण्यास मदत करते. याचा परिणामपुढे जाऊन सेक्सलाईफवर होऊ शकतो. बाहेर जाताना किंवा कोणाकडे राहायला गेल्यानंतर आपला जोडीदार कसा घोरते हे त्यांना कोणाकडून ऐकून घ्यायला अजिबात आवडत नाही. यामुळेही नात्यामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. जर अशा प्रकारे तुमचा जोडीदार तुमच्या या सवयीमुळे तुम्हाला कुठेही घेऊन जाण्यास नकार देत असेल तर तुम्ही ही सवय कशी मोडता यईल याकडे अधिक लक्ष द्या. 

ADVERTISEMENT

अपेक्षांचे ओझे वाढवू शकते नात्यातील तणाव.. तुम्ही करत नाही ना ही चूक

 जोडीदारासोबत राहण्याची इच्छा कमी होणे

अनेकदा जोडीदाराच्या या सवयीचा परिणाम त्याच्यासोबत  राहण्याच्या इच्छेवर सुद्धा होतो. तुमची एखादी सवय खटकू लागली तर त्याच्यासोबत राहण्याची इच्छा कमी कमी होत जाते.  तुम्हाला किंवा जोडीदाराला ही सवय असेल तर तुमच्या सवयीची त्यांना कारण नसताना लाज वाटत राहते. जोडीदार उगाचच दुसऱ्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करु शकतो

सवयीमुळे होऊ नये परिणाम

सवय कोणतीही असली तरी देखील अशा काही सवयींमुळे नात्यावर अजिबात परिणाम व्हायला नको. नाते हे प्रेमावर आणि विश्वासावर अवलंबून असते. पण नात्यात जर तुम्ही अशा क्षुल्लक गोष्टींमुळे दुरावा आणला तर त्याचा दूरगामी परिणाम होऊ लागतो.

त्यामुळे नात्यात तुम्ही या कारणामुळे परिणाम होऊ देऊ नका.

ADVERTISEMENT

स्क्रीन टाईममुळे आला असेल नात्यात दुरावा तर फॉलो करा या टिप्स

14 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT