बॉलिवूडला अलविदा करत अध्यात्माकडे वळणाऱ्या सना खानचा निकाह नुकताच पार पडला. कोणालाही न सांगता हा निकाह सनाने केला असला तरी तिचे कितीतरी फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आणि ही बातमी सगळ्यांना कळली. धर्मासाठी केलेला त्याग पाहता तिच्यावर मुस्लिम धर्मातील अनेक धर्मगुरु आणि लोकं स्तुतीसुमने उधळत असताना काहींनी या प्रकरणात सोफिया हयातला ओढले आहे. अंगप्रदर्शन करुन धर्माचे वाभाडे काढते असे म्हणत सोफिया हयातची तुलना सना खानसोबत केल्यामुळे ती चिडली असून तिने इस्लाम धर्माबाबतच्या अध्यात्मिकतेबाबत आपले हे विधान व्यक्त केले आहे. ती नेमंक काय म्हणाली ते आता जाणून घेऊया.
भारती आणि हर्षला मिळाला जामिन, ड्रग्जप्रकरणी झाली होती अटक
यामुळे होत आहे तुलना
सोफिया हयात ही तिच्या बोल्ड फोटोजमुळे नेहमीच चर्चेत असते. 2016 साली तिने बॉलीवूडला रामराम केला. त्यानंतर तिने अध्यात्माची कास धरली. पण इंडस्ट्री सोडल्यानंतर अगदी काहीच काळात तिच्या सोशल मीडियावर तिचे अनेक बोल्ड पिक्चर दिसून आले. न्यूड फोटोशूट करुन तिने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. अल्लाहच्या सेवेसाठी इंडस्ट्री आणि मोहपाशातून बाहेर जाणाऱ्या सोफियाचा धर्माविषयीचा आदर कळून येत नाही असे अनेकांचे म्हणणे होते. तशा कमेंटसही तिल्या दिल्या जातात. नुकतीच सना खानही इंडस्ट्रीतून बाहेर पडली आहे. तिने तिचे पूर्ण रुप बदलले असून तिने सगळ्याचा त्याग केला आहे. पण असे असले तरीदेखील तिचे काही फोटो आणि कपडे अनेकांना खटकतात. पण सध्याच्या घडीला तिचा इस्लाम धर्माकडील ओढा पाहता अनेकांनी सोफिया आणि सना खानची तुलना केली आहे.
गौहर – झेद करणार 25 डिसेंबरला निकाह, प्री वेडिंगसाठी निवडले पुण्यातील रॉयल लोकेशन
सोफियाने दिले उत्तर
सोफियाची सतत सना खान सोबत होणारी तुलना सोफियाला सहन न झाल्यामुळे तिने एका इंटरव्ह्यू दरम्यान या सगळ्या बाबतीत एक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, माझी तुलना सतत सना खानसोबत होते. याचे मला फार वाईट वाटते. ज्यावेळी मी इंडस्ट्री सोडली आणि अध्यात्माकडे वळले त्यावेळी मी 18 महिने सेक्स केले नव्हते. मी नन सारखे कपडे रोज घालू शकत नाही. माझे कपड्यांविषयी विचार फार वेगळे आहेत. सना खानचे कपड्यांशी निगडीत वेगळे विचार असू शकतात. माझे वेगळे. माझ्या कपड्यांवरुन माझा धर्माबद्दलचा आदर किंवा सन्मान तुम्हाला नक्कीच कळणार नाही. त्यामुळे तुम्ही मला त्या तराजूमध्ये मुळीच तोलू नका. तिचे विचार तिच्यापाशी आणि माझे विचार माझ्यापाशी राहू द्या. अनेकांच्या छोट्या आणि खोट्या विचारामुळेच हे अशा गोष्टींना उगाचच चालना मिळते.
सोनाक्षी सिन्हा मालदिव्ज वेकेशनवर, बिकिनी लुक झाला व्हायरल
सना खानने केले लग्न
सना खान आणि मेलविन लुईसच्या लग्नाची चर्चा सुरु असताना अचानक त्यांचे ब्रेकअप झाले आणि त्यानंतर तिच्या इस्लाम धर्माच्या अनेक पोस्ट येऊ लागल्या. तिने एका रात्रीत तिचे सगळे आयुष्य बदलून टाकले. जुन्या आठवणींना काढून टाकत तिने इस्लाम धर्माकडे झोकून दिले. तिने सोशल मीडियावरुन इस्लाम धर्माविषयी बऱ्याच पोस्ट टाकते. ती नुकतीच विवाहबद्ध झाली असून तिने सुरतच्या मफ्ती अनससोबत लग्न केले आहे.
आता सोफियाचे विचार पाहता तिची बाजू तिच्या दृष्टिकोनातून नक्कीच बरोबर आहे.