खरंतर पिंपल्स येण्यासाठी एक असे कारण असूच शकत नाही. अनेक कारणांमुळे पिंपल्सचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. पण अशीही काही क्षुल्लक कारणं असतात की, ज्यामुळे तुम्हाला पिंपल्सचा त्रास होतो. अनेक अभ्यासांती आणि स्वअनुभावने आम्ही हे तुम्हाला सांगू शकतो. तुम्हालाही मध्येच कधीकधी पिंपल्स येत असतील आणि ते जाता जाता नाकी नऊ होत असेल तर तुमच्या अचानक पिंपल्स येण्यामागे काही कारणे असू शकतात. ही इतर कारणे कोणती हे आज आपण जाणून घेणार आहोत.
सतत होणारी ॲसिडिटी

खूप जणांना सतत ॲसिडिटी होण्याचा त्रास असतो. त्यांना सतत काहीही उशीरा खाल्ले की हा त्रास बळावण्याची शक्यता असते. अशा त्रास ज्यांना होत असेल त्यांना कधी कधी काही कारणास्तव त्वचेवर ॲलर्जी होण्याचा त्रास होतो. जर तुमच्या शरीराला असा त्रास होत असेल तर तुम्हाला या कारणामुळे तर तोंडावर पुरळ येत नाही ना! हे एकदा तपासून घ्या. ॲसिडिटीच्या त्रासानंतर तुम्हाला ही समस्या उद्धभवत असेल तर तुम्ही या समस्येकडे दुर्लक्ष करुन नका. त्याची योग्य औषधे केली तर पुरळ येण्याची समस्या नक्कीच कमी होईल.
मसालेदार खाणे
खरंतरं असे अजिबात सिद्ध झालेले नाही की, तेलकट किंवा तिखट पदार्थांमुळे आपल्याला पिंपल्स येतात. पण तुमच्या आहारात गरम मसाला खूप मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्हाला तसा त्रास होणे हे अत्यंत स्वाभाविक आहे.कारण मसाल्यामुळे पोटात आग आग झाल्यासारखे होते. सतत असे केल्यामुळे पोटाच्या अनेक समस्या उद्धभवतात. पोट साफ झाले नाही की, त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येण्याची शक्यता असते. त्यामुळे मसालेदार जेवण हे तुम्ही प्रमाणात घ्यायला हवे. त्यामुळे पिंपल्सचा त्रास कमी होईल.
चुकीचे प्रॉडक्ट
पिंपल्सचा त्रास होण्यामागे हे देखील एक कारण असू शकते. खूप जण कोणतेही प्रॉडक्ट चेहऱ्याला लावतात. काही प्रॉडक्टमधील घटक हे त्वचेला अजिबात शोभणारे नसतात. त्यातच तुम्ही पोअर्स ओपन असताना ते त्वचेला लावले तर त्याचा त्रास अधिक होतो. त्यामुळे तुम्ही त्वचेला त्रास होत असलेले प्रॉडक्ट चेहऱ्याला अजिबात लावू नका.
पिरेड्स चुकणे
पिरेड्सच्या दरम्यानही खूप जणांना पिरेड्स येण्याचा त्रास होत असतो. कधी कधी प्रवासादरम्यान मासिक पाळीच्या तारखा अनेकदा बदलल्या जातात. असे तुम्हालाही होत असेल तर अशावेळी पुढच्या महिन्याची तारीख येताना खूप त्रास होतो. पुढच्या महिन्यात पिरेड्स येताना काहीतरी संकेत म्हणून तुम्हाला पिंपल्स येतात. कधी कधी पिंपल्स मोठे येतात. ते जाता जात नाहीत. तुम्हाला या कारणामुळेही पिंपल्स येऊ शकता.
आत तुम्हाला नेमकं कोणत्या कारणामुळे पिंपल्स येतात ते घ्या जाणून