देसी गर्ल प्रियांका चोप्रानंतर तिची लहान बहीण परिणितीनेही बॉलीवूडचा मार्ग धरला. 2011 साली लेडीज व्हर्सेज रिकी बहल या चित्रपटापासून परिणीतीने तिच्या बॉलीवूड करियरला सुरूवात केली. याच बबली गर्ल परिणिती चोप्राचा आज वाढदिवस आहे. परीचा लीड अभिनेत्री म्हणून पहिला सिनेमा हा ‘इश्कजादे’ होता. हरियाणातील अंबालामध्ये जन्म झालेल्या परिणितीकडे सध्या अनेक बॉलीवूड प्रोजेक्ट्स आहेत. जाणून घेऊया तिच्याबाबतच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी ज्या कळल्यावर तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
अभ्यासात परिणितीची उत्तम कामगिरी
परिणिती चोप्रा ही अभ्यासात हुशार होती. तिने 12 वी मध्ये संपूर्ण देशात टॉप केलं होतं आणि तिचा यासाठी राष्ट्रपतींकडून सन्मानही करण्यात आला होता. परीने बिझनेस, फायनान्स आणि इकोनॉमिक्समध्ये डिग्री घेतली आहे. अभ्यास आणि अभिनयासोबत परिणीतीमध्ये गायनाचंही टॅलेंट आहे. परिणिती खऱ्या आयुष्यात एक उत्तम गायिकाही आहे. परिणिती एक ट्रेन्ड क्लासिकल सिंगर आहे. परीने तिचा चित्रपट ‘मेरी प्यारी बिंदू’ मध्ये गायलेल्या गाण्यातून बॉलीवूडमध्ये तिचं सिंगिंग डेब्यू केलं होतं. परिणीतीचं हे गाणं तिच्या फॅन्सना फारच आवडलं होतं.
मंदीमुळे गमवावी लागली होती नोकरी
परिणितीने परदेशात इन्व्हेस्टमेंट मॅनेजरचा जॉबही केला होता. 2009 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे तिची नोकरी गेली आणि तिला भारतात परत यावं लागलं. इथे येऊन तिने यशराज फिल्म्समध्ये काम केलं. परिणितीने साल 2015 मध्ये 28 किलो वजन कमी केलं. परिणितीला जंक फूड आवडतं त्यातही खासकरून तिला पिझ्झा आवडतो. पण वेट लॉसकरण्यासाठी तिला सर्वात आधी पिझ्झा सोडावा लागला.
बॉलीवूडमधील कामगिरी
परिणितीचोप्राला चित्रपट ‘इश्कजादे’ साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटामध्ये परिणितीने अभिनेता अर्जुन कपूरसोबत काम केलं होतं. परीने तिच्या आठ वर्षांच्या करियरमध्ये आत्तापर्यंत 10-11 चित्रपट केले आहेत. ज्या मधील फक्त 3 सिनेमा हिट ठरले आहेत. परिणितीयेत्या काळात भारताची उत्तम बॅडमिंटनपटू फुलराणी सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
सैफची दिवानी परिणिती
प्रत्येक बॉलीवूड कलाकाराचा एक तरी आवडता कलाकार असतोच. तसंच परिणीतीच्याबाबतीतही आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये परिणीतीने सांगितलं होतं की, मी सैफ अली खानबाबत खूपच क्रेझी आहे. इतकी क्रेझी की, एका ब्रँडची चिप्सची पाकिट ती जमा करायची कारण त्यावर सैफचे फोटो होते.
परिणितीचं लव्हलाईफ
परिणितीची मोठी प्रियांका चोप्रा तर आता मिसेस निक जोनास होऊन भारताबाहेर सेटल झाली आहे. पण परिणितीमात्र अजूनही सिंगल आहे. बॉलीवूडच्या काही सूत्रानुसार परिणितीचोप्रा असिस्टंट डिरेक्टर चरित देसाईला डेट करत आहे. या दोघांचीही भेट 2016 साली अमेरिकेत एका ड्रीम टूरदरम्यान झाली होती. दोघांचीही मैत्री इतकी घट्ट झाली की, त्याचं रूपांतर आता प्रेमात झाल्याची चर्चा होती आणि 2017 साली त्यांच्या अफेयरची बातमीही समोर आली होती. चरितबाबत सांगायचं झाल्यास त्याने प्रियांका चोप्रा आणि ऋतिक रोशनचा सुपरहिट ठरलेला चित्रपट ‘अग्निपथ’मध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा –
सायना नेहवाल बायोपिकमधून श्रद्धा कपूर आऊट, परिणिती साकारणार सायना
परिणीतीही आता बहीण प्रियांका चोप्राच्या मार्गावर