ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Sonakshi Sinha stars in brother Kussh Sinhas directorial debut movie in Marathi

सोनाक्षी सिन्हाच्या भावाचा पहिला चित्रपट, सोनाक्षी साकारणार मुख्य भूमिका

दंबग गर्ल सोनाक्षी सिन्हा गेल्या तीन वर्षात मोठ्या पडद्यावर झळकली नाही.  2019 मध्ये तिने सलमान खानसह दबंग 3 केला. त्यानंतर ओटीटीवरील भुज: दी प्राइड ऑफ इंडियामध्ये ती दिसली होती. मात्र चित्रपटगृहातील मोठ्या पडद्यावर तिचा चित्रपट पाहायला मिळाला नाही. चित्रपटात काम न करताही मालदिव्ज वेकेशनवरील बोल्ड फोटो आणि जहीर इकबालसोबत असलेल्या अफेअरमुळे ती सतत चर्चेत होती. आता तीन वर्षानंतर ति पुन्हा मोठ्या पडद्यावर कमबॅकसाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन तिचा भाऊ कुश सिन्हा करत असून या चित्रपटातून तो बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.  

सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका 

सोनाक्षी सिन्हा तिचा भाऊ कुश सिन्हा दिग्दर्शित करत असलेल्या ‘निकिता रॉय अॅंड दी बुक ऑफ डार्कनेस’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला असून. पोस्टरमधून चित्रपट गुढ आणि रहस्यमय असेल असं वाटत आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हासह परेश रावल, सुहेल नय्यर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. भावाच्या पहिल्याच चित्रपटात सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असणार आहे. यात सोनाक्षी सिन्हाचा अंदाजही काहीसा निराळा वाटत आहे. पोस्टरमध्ये तिचा साइड फोटो दिसत असून चित्रपटाची गुढता वाढवणारा लुक आहे. या चित्रपटाची निर्मिती निकी भगनानी, विकी भगनानी आणि अंकुर टकरानी करत आहेत. एनवीबी या बॅनरखाली हा चित्रपट तयार केला जाणार आहे. 

सोनाक्षीने शेअर केली पोस्ट

सोनाक्षी सिन्हाने तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरसोबत तिने शेअर केलं आहे की, “लवकरच येणार ‘निकिता रॉय अॅंड दी बुक ऑफ डार्कनेस’… या चित्रपटातून कुश सिन्हा डायरेक्शनमध्ये डेब्यू करत आहे आणि मी दिग्गज परेश रावल आणि सुहेल नय्यरसह स्क्रीन शेअर करणार आहे” सोनाक्षीच्या चाहत्यांनी या पोस्टरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोनाक्षी सिन्हा तीन वर्षानंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने चाहते खूप खूष आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
27 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT