ADVERTISEMENT
home / मनोरंजन
मराठीतील ‘अप्सरा’ सोनालीने निवडला आपला जोडीदार, अभिनंदनाचा वर्षाव

मराठीतील ‘अप्सरा’ सोनालीने निवडला आपला जोडीदार, अभिनंदनाचा वर्षाव

सोनाली कुलकर्णी जेव्हा मराठी इंडस्ट्रीमध्ये आली तेव्हा तिची तुलना मोठ्या सोनाली कुलकर्णीशी करण्यात आली. पण या सगळ्यावर आपल्या मेहनतीने मात करत सोनालीने आपला एक ठसा उमटवला. मराठीची ही ‘अप्सरा’ लवकरच आता लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोनालीने स्वतः आपल्या जोडीदाराबरोबरचे काही व्हिडिओ पोस्ट करत ही बातमी शेअर केली आहे. कुणाल बेनोडेकर असं त्याचं नाव असून याचवर्षी सोनाली आणि कुणाल लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सोनालीने ही बातमी शेअर केल्यानंतर काहींनी तर त्यावर आपला विश्वासच बसत नाही असंही म्हटलं आहे तर तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींने सोनालीचं अभिनंदन केलं आहे. 

सुर्यवंशीच्या सेटवर कतरिना सैफकडून करून घेतलं जात आहे ‘हे’ काम

सोनालीचे कॅप्शनसह केली घोषणा

सोनालीने दोन दिवसांपूर्वीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत. हे व्हिडिओ शेअर करताना आपण आपल्या जोडीदाराबरोबर जीवनाच्या चढउतारासाठी तयार आहोत असंही तिने म्हटलं आहे. सोनालीने त्यासाठी लिहिलेली कॅप्शन तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडली आहे. सोनालीने म्हटलं आहे की, ‘माझ्या जोडीदारासह मी एका नव्या प्रवासाला सुरूवात करत आहे. जीवनातील चढ-उतार आणि या साहसासाठी मी तयार आहे’. यामध्ये तिने कुणाल बेनोडेकरलादेखील टॅग केले आहे. सोनालीचे अनेक चाहते आहेत आणि त्याशिवाय तिला इंडस्ट्रीमध्ये खूप मित्रमैत्रिणीही आहेत. सोनालीने ही बातमी शेअर केल्यानंतर सोशल मीडियावरच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव चालू झाला आहे. क्रांती रेडकरने ‘वाव मज्जा’ असं म्हटलं आहे तर रीना अगरवालने ‘ऑल द बेस्ट’ अशा शुभेच्छा दिल्या आहेत. तर स्वप्नील जोशीने ‘बेस्ट विशेस मितवा, नेहमीच आनंदी राहा’ असं म्हटलं आहे. रसिका सुनील,  प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, क्षितीज पटवर्धन या सगळ्यांनीच सोनालीचं मनापासून अभिनंदन केलं आहे. 

सायलीच्या लग्नाचा रंगतदार ‘बस्ता’, सिनेमाचं पोस्टर लाँच

ADVERTISEMENT

सोनालीने नात्यात असल्याचं आधीही केलं होतं कबूल

सोनाली कुलकर्णीने आपण नात्यात असल्याचं याआधीही कबूल केलं होतं. मात्र ती व्यक्ती नेमकी कोण आहे याची कोणाला कल्पना नव्हती. मात्र कुणाल नक्की काय करतो हे अजूनही कोणाला माहीत नाही. सोनाली सध्या कुणालसह खूपच आनंदी असल्याचं नक्कीच या व्हिडिओमधून दिसून येत आहे. ही जोडी कधी लग्न करणार अर्थात लग्नाची तारीख नेमकी कोणती आहे याचीही कोणाला अजून माहिती नाही. व्हॅलेंटाईनचा महिना सुरु झाला आहे आणि सोनालीने आपलं प्रेम जगासमोर आणलं आहे यातंच तिच्या चाहत्यांना आनंद असल्याचंही दिसून येत आहे. सोनालीची मैत्रीण प्रार्थना बेहरेनेदेखील तिला शुभेच्छा दिल्या असून केवळ प्रार्थनाच कुणालला सोशल मीडियावर फॉलो करत असल्याचं दिसून आलं आहे. शिवाय ‘लव्ह यू बोथ’ अशी कमेंटही सोनालीच्या व्हिडिओवर प्रार्थनाने केली आहे. त्याशिवाय कुणालचं अकाऊंट हे प्रायव्हेट असल्यामुळे त्याचे जास्त फोटो सोशल मीडियावर नाहीत. 

तैमूरची बहीण इनाया बोलते ‘ही’ जगावेगळी भाषा

‘हिरकणी’ सोनालीसाठी अफलातून वर्ष

सोनाली कुलकर्णीसाठी मागचं आणि हे वर्ष कामाच्या दृष्टीने अफलातून आहे. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘हिरकणी’, ‘धुरळा’, ‘विकी वेलिंगकर’ या सर्व चित्रपटातून सोनालीच्या अभिनयाची प्रेक्षकांनी आणि अगदी समीक्षकांनीही वाहवा केली आहे. हिरकणीसाठी सोनालीला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. सोनालीने आता मराठीमध्ये आपला व्यवस्थित जम बसवला असून आयुष्याच्या या वळणावर ती लग्न करायला तयार असल्याचं तिने या फोटोमधून सांगितलं आहे. ‘अप्सरा आली’ या नटरंगमधील गाण्याने तिला महाराष्ट्राची अप्सरा केलं. आता सोनाली आणि कुणाल कधी लग्न करणार याकडेच तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

ADVERTISEMENT
04 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT